नकळत सारे घडले - भाग १५
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मल्हारला हे सगळे अनपेक्षित होते. त्याला काहीच कळत नव्हते नेमके करावे तरी काय. आजच ज्या मुलीशी त्याचे लग्न होणार होते ती पळून गेली.. ते दुःख संपत नाही तोवर लगेच दुसरे लग्न जमवले सुद्धा. एका धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत घरातल्यांनी दुसरा धक्का दिला.
मल्हारचे वडील तयार झाले म्हंटल्यावर त्यांच्यापुढे कोणीच बोलू शकत नव्हते इतका दरारा होता त्यांचा. मल्हारला तर त्याचे दुःख पचवायला सुद्धा कोणी वेळ दिला नाही. कदाचित हेच त्याच्यासाठी योग्य असणार म्हणून सगळे घाई करत होते.
मीरा सोबत लग्न ठरवले असे समजल्यावर मल्हार आधी शॉक झाला. मीरा.. हे नाव ऐकताच त्याला थोडी शंका आली. लहानपणापासूनच दोघेही एकत्र वाढलेले; त्यामुळे त्याला माहिती होते की भविष्यात तिला काय करायचे आहे आणि तिचे स्वप्न काय आहे.
लहानपणी भाऊ बहिण म्हणून एकत्र खेळताना त्यांना काहीच वाटले नव्हते, पण मीरा ही शेवटी त्याच्या मामाचीच मुलगी; त्यामुळे तो नाही म्हणू शकत नव्हता.
लहानपणी भाऊ बहिण म्हणून एकत्र खेळताना त्यांना काहीच वाटले नव्हते, पण मीरा ही शेवटी त्याच्या मामाचीच मुलगी; त्यामुळे तो नाही म्हणू शकत नव्हता.
भर मांडवात लग्न मोडले, आता मुलगी द्यायला पण कोणी तयार होईल की नाही ही शंका आईने बोलून दाखवलेली; त्यामुळेच सगळे ह्या लग्नाला तयार झाले. दोन्ही घराकडून संमती मिळताच पुढे काय आणि कसे करायचे हे ठरवले. आधी सुपारी फोडायची मग लगेच एकमेकांना अंगठ्या घालायच्या आणि मग हळद लावायची. त्यानंतर लगेच लग्न लावून पाठवणी. असा सगळा कार्यक्रम आखण्यात आला. सगळे कार्यक्रम अगदी थोडक्यात होणार होते.
नवरीचे सर्व नवीन दागिने तर तयार होते, पण ते आधीच्या नवरीसाठी होते; म्हणून कल्पना ताईंनी ते सगळे न घेता वेळेवर मीरासाठी नवीन मंगळसूत्र आणि अंगठी आणले. सोबत नवरीच्या पाच साड्या. आणखी काय काय लागते त्याची सर्व यादी तयार करूनच घेतली होती. मीरासाठी सगळे नवे आणले होते. आधीची कोणतीच आठवण कल्पना ताईंना नको होती, कारण मल्हारला त्रास होईल अशी कुठलीच गोष्ट त्यांना आता ठेवायची नव्हती आणि म्हणूनच त्या सर्व जातीने लक्ष देऊन बघत होत्या.
बाहेरची कामे सगळे नाना बघत होते. काय खरेदी असेल ते दोघे काका काकू बघून घेत होते. इकडे कार्यालयात बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. मितलीच्या घरच्यांना देखील हे समजले.
मीराच्या जागी आज त्यांची मिताली असती असे त्यांना दिसत होते. मितालीने स्वतः च्या हाताने स्वतः चे वाटोळे केले असे त्यांचे म्हणणे होते. न जाणो तिच्या मनात तेव्हा काय चालू होते. ती गेली, पण तिच्यासोबत आई वडिलांची मान मर्यादा सर्वच ओलांडून गेली.
मिताली सोबत तर लग्न झाले नाही, पण मीरा सोबत त्याचा सुखाचा संसार होवो असे तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडावर हेच वाक्य होते. अगदी मितालीकडील पाहुणे सुद्धा हेच म्हणत होते. मुलगा स्मार्ट आणि देखणा आहे, त्याच्यासोबत त्या मितालीपेक्षा आपली मीरा शोभून दिसेल.. असे सगळ्या चुलत निलत बहिणींचे म्हणणे होते. त्या सगळ्या खूप खुश होत्या ह्या दोघांच्या लग्नासाठी.
काही क्षणांपूर्वी त्या मांडवात अगदी भकास वातावरण निर्माण झाले होते आणि आता पुन्हा नवचैतन्य फुलले होते. मितलीच्या वडीलांना ही बातमी कळली तेव्हा ते आतून दुखी होते, कारण त्यांच्या मुलीचे लग्न होणार होते, पण त्यांच्या मुलीने हाताने वाटोळे केले होते; त्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. मल्हार आज त्यांचा जावई झाला असता. नियती पण कसे फासे टाकत असते. ज्याला जे हवे ते त्याला कधीच मिळत नसते. आपल्या भाग्यात जे असेल तेच होणार आणि चांगल्यासाठीच होणार. असे म्हणून न थांबता पुढे जायचे.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा