नकळत सारे घडले - भाग १६
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मितालीच्या सगळ्या घरच्यांना मल्हारच्या लग्नाची बातमी समजली. त्यांना हे ऐकून ना आनंद होतं होता आणि नाही दुःख.. यावर काय बोलावं हेच त्यांना कळत नव्हते. शेवटी मितालीचे आई वडील स्वतः हून बोलायला पुढे आले.
"पाहुणे, तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला. ह्याच मांडवात दोघांचे लग्न लावून द्या. इथे सर्व तयारी आहे आणि काही लागले तर आम्ही आहोतच. आमची मुलगी तर गेली, पण ह्या मुलीला मी स्वतः ची मुलगी समजून आनंदाने सर्व काही करायला तयार आहे. आणखी काही मदत लागली तर सांगा, माधवला सांगून ठेवतो तसे.. तो बघेन सगळे. तुम्ही काहीच काळजी करू नका."
मितालीचे वडील मल्हारच्या वडिलांशी बोलत होते.
"मी सांगणारच होतो तुम्हाला हे, आम्ही इथेच दोघांचे लग्न करण्याचे ठरवत आहोत. तुम्हाला काही अडचण तर नाही ना?"
मल्हारच्या वडिलांना वाटतं होते त्यांना हे सांगायला पाहिजे म्हणून त्यांनी विचारून घेतले.
"हो.. हो. चालेल म्हणून काय विचारताय तुम्ही! अहो उलट आम्ही मदतीला तयार आहोत. आम्हाला आनंद आहे, की मुलीच्या घरचे लगेच तयार झाले इतक्या लवकर निर्णय घ्यायला. नाहीतर, हे असे झाल्यावर लवकर कोणी तयार होत नाही लग्नासाठी."
मितालीचे वडील मनमोकळेपणे बोलत तर होते, पण त्यांना वाईटही वाटतं होते.
मितालीचे वडील मनमोकळेपणे बोलत तर होते, पण त्यांना वाईटही वाटतं होते.
मिताली आणि मीरा, ह्या दोन वेगळ्या मुली. एक स्वतः च्या स्वार्थासाठी आईवडिलांची इज्जत धुळीला टाकत पळून गेली तर दुसरीने तिथेच आई वडिलांचा मान राखावा म्हणून त्यांच्यासाठी लग्नाला तयार झाली. थोडी अतिशयोक्ती वाटेल, पण हे खरेच त्यांच्यासमोर घडत होते आणि ते काहीच करू शकत नव्हते.
मीराचे काका काकू तर घाईघाईने तयारीला लागलेले दिसत होते. अचानक मल्हार तिथे आला आणि आईसोबत काहीतरी बोलू लागला.
"आई, मला मीरासोबत थोडं बोलायचं आहे."
मल्हार आईला अगदी जोर देऊन बोलत होता.
मल्हार आईला अगदी जोर देऊन बोलत होता.
"अरे ती आता नाही बोलू शकत तुझ्यासोबत, तिला आतल्या रुममध्ये बसवले आहे."
आई शांतपणे त्याला समजवायला बघत होत्या, पण मल्हार काहीच ऐकून घेत नव्हता.
आई शांतपणे त्याला समजवायला बघत होत्या, पण मल्हार काहीच ऐकून घेत नव्हता.
"मला बोलायचं आहे. अगदी थोडा वेळ घेईन मी, पण मला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर तुम्ही जे म्हणाल ते सगळं मान्य करेन मी."
मल्हार अगदी निक्षून बोलत होता.
"बरं, थांब मी आधी वहिनीला सांगून येते. तोपर्यंत इथून जाऊ नको कुठेच."
आईने त्याला तिथेच थांब म्हणून सांगितले आणि त्या आतल्या रूममध्ये जाऊन लगेच बाहेर आल्या.
आईने त्याला तिथेच थांब म्हणून सांगितले आणि त्या आतल्या रूममध्ये जाऊन लगेच बाहेर आल्या.
"जा, मीरा आतमध्ये आहे."
आईने हसतच मल्हारला सांगितले, पण मल्हार अगदी शांत दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर ना आनंद ना दुःख. कसल्या तरी विचारात वाटतं होता. बाहेर वहिनी आणि मल्हारची आई दोघीही टेन्शनमध्ये बसलेल्या दिसत होत्या. आतमध्ये मल्हार मीरासोबत काय बोलणार? त्यांना काहीच समजत नव्हते, पण दोघांना थोडा वेळ द्यायला हवा असे नक्कीच वाटतं होते.
मल्हार आतमध्ये गेला तेव्हा मीरा पाठमोरी उभी होती. तिला माहिती होते मल्हार तिच्यासोबत बोलायला आलेला आहे. तिला खूप टेन्शन आलेले होते.
"मीरा, मला थोडं बोलायचं होतं."
मल्हारने बोलायला सुरुवात केली.
"मीरा.. ऐकतेस ना!"
मल्हार आतमध्ये जाऊन लांब उभा होता आणि मीरा पाठमोरी. त्याला वाटले की तिला बहुतेक ऐकू आले नसावे, पण तिने फक्त हम्म्म इतकेच केले.
काय बोलायचं असेल मल्हारला मीरासोबत? दोघांमध्ये बोलणे झाल्यावर निर्णय बदलणार तर नाही ना ते? असे अनेक प्रश्न बाहेर उभे असलेल्या त्यांच्या आई वडिलांना पडले होते.
आता बघुया पुढील भागात काय होईल ते.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा