नकळत सारे घडले भाग १७
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मल्हार मीरासोबत बोलायला हट्ट करत होता; त्यामुळे त्याला बोलायला वेळ दिला पाहिजे असे आईला आणि मामींना वाटले आणि म्हणूनच त्यांनी आतमध्ये बसलेल्या मीरासोबत बोलायची परवानगी दिली होती.
काय बोलू आणि कुठून बोलू हे त्याला सुचत नव्हते, पण बोलायला तर पाहिजेच आणि आता बोलणं गरजेचं होतं. यावर त्यांचं पुढील भविष्य अवलंबून होते.
मल्हार रुममध्ये येताच मीरा उठून पाठमोरी उभी होती. मल्हार आल्याची तिला जाणीव होताच तिचे हृदय धडधडू लागले होते.
"मला माहितीय हे सगळं अगदी अचानक घडतं आहे, तुझे मन नक्कीच तयार नसणार हे सुद्धा मला माहिती आहे. मला फक्त एकच विचारायचे होते, की तू ह्या लग्नाला बळजबरी तर तयार झालेली नाहीस ना? मामा मामींनी तुझ्यावर हा निर्णय घ्यायला जोर तर दिला नाही ना?"
मल्हार हे सगळे तिच्या बाजूने बोलत होता.
तिच्या बाजूने विचार करणारा मल्हार काळजीने तिच्याशी बोलायला आला, याने मीराच्या मनाला खूप दिलासा मिळत होता. मीरा अगदी शांतपणे उभी राहून त्याचे सगळे बोलणे ऐकत होती. ती काहीच बोलत नव्हती. त्याचे बोलणे ऐकत ती डोळे मिटून शांत उभी होती.
"मीरा, तू मोकळेपणाने बोलू शकते माझ्याशी. तुझा जो काही निर्णय असेल तो बिनधास्त सांग. बाहेर सगळ्यांना मी सांभाळून घेईन, तू नको काळजी करू."
मल्हार अजूनही बोलतच होता, पण मीरा वेगळ्याच विश्वात गुंग होती.
"मीरा, काय झाले? तू बोलत का नाहीस? हे बघ, कोणीही तुझ्यावर लग्नासाठी बळजबरी करणार नाही. तुला आत्ता जे वाटतंय ते मला खरं खरं सांग."
मल्हार बोलतच होता तरीही मीरा त्याला काहीच उत्तर देत नव्हती; त्यामुळे आता त्याला काळजी वाटतं होती.
"मीरा.. अग मी बोलतोय तुझ्याशी केव्हापासून?"
मल्हार आता जोरात बोलला तेव्हा कुठे ती भानावर आली.
"माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे. ते जे म्हणतील ते माझ्यासाठी योग्यच असेल."
मीरा अगदी शांतपणे बोलत होती.
"म्हणजे? मला समजले नाही."
मल्हारला काही कळत नाही.
मल्हारला काही कळत नाही.
"मी तयार आहे आपल्या लग्नासाठी."
मीरा आता स्पष्ट बोलते तेव्हा कुठे मल्हारला समजते.
मीराचे हे उत्तर ऐकून मल्हारला एकदम आश्चर्याचा धक्काच बसतो. त्याला पुढे काय बोलावे हेच समजत नव्हते. नेमकं खुश व्हावे, की नाराज व्हावे.. ह्याच विचारत तो शांतपणे उभा असतो. मीरा मात्र अजूनही पाठमोरी उभीच होती. तिच्या अशा बोलण्याचा मल्हारला खरंतर राग आलेला होता. त्याला मनातून वाटतं होते, की मीरा नक्कीच बळजबरी तयार झालेली असणार; म्हणून तो तिला पुन्हा एकदा शेवटचे विचारतो.
"मीरा, मी तुला पुन्हा एकदा विचारतो. तू नक्की तयार आहेस ह्या लग्नाला? कोणत्याही दडपणाखाली न जाता योग्य तो निर्णय घे, कारण त्यावर तुझे पूर्ण भविष्य अवलंबून आहे; त्यामुळे वेळ घे आणि विचार करून उत्तर दे."
मल्हार खरचं खुप काळजीत बोलत होता आणि मीराला त्याच्या बोलण्यावरून हे साफ कळतं होते.
"मी खरचं तयार आहे. माझ्यावर हा निर्णय घ्यायला कोणीही बळजबरी केली नाही."
मीरा आता त्याच्याकडे बघून उत्तर देत होती; त्यामुळे मल्हार एकदम शॉक झाला. इतके बोलुन मीरा शांत होते आणि मल्हार तिथून निघून जातो.
बाहेर आलेल्या मल्हारला बघताच सुनिता बाई लगेच आतमध्ये गेल्या मीरासोबत बोलायला. त्यांना काळजी वाटतं होती, की ह्या दोघांमध्ये काय बोलणे झाले असावे.
"मीरा, अग काय बोलत होता मल्हार तुझ्यासोबत?"
सुनिता बाईंना आता अजिबात धीर धरवत नव्हता म्हणून त्यांनी आतमध्ये येताच प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
"आई, थोड्या वेळापूर्वी तुम्ही माझ्यावर बळजबरी करत होतात ह्या लग्नासाठी.. पण आता ह्या लग्नाला मी स्वतः मनापासून तयार आहे."
मीरा आईकडे बघून बोलत होती आणि सुनिता बाई तिच्याकडे बघून समाधानाने हसत होत्या.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा