नकळत सारे घडले - भाग २०
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
सुनिता बाई बाहेर बाकीची तयारी बघत होत्या. बाहेर मल्हारचे आई वडील स्टेजवर तयारी बघत होते. मितालीची आई शांतपणे एका बाजूला बसलेली होती, तर वडील मात्र जातीने लक्ष देऊन सगळे करून घेत होते.
आता तिथे कार्यालयात फक्त मल्हारच्या घरचे पाहुणे होते. मितालीकडचे पाहुणे एव्हाना सगळे निघून गेले होते; त्यामुळे तिथे आता जास्त गर्दी नव्हती. जास्तीत जास्त शंभर एक लोकं असतील आणि ते ही सगळे घरातलेच होते. जो तो तयारीला लागला होता.
इकडे मल्हार मात्र अजूनही शांत बसलेला होता, मनात मात्र वेगळेच सुरू होते. वरवर जरी तो शांत दिसत असला तरीही आतून तो पूर्णपणे खचला होता आणि हे त्याच्या चेहऱ्यावर साफ झळकत होते. लग्न तर होणार होते, पण ते ही बळजबरीने. होणार होते काय आणि होऊन बसले काय? ह्या विचारात तो गुंग होता.
"मल्हार, अरे चेहरा जरा नीट कर. थोड्याच वेळात साखरपुडा होईल तुझा."
मल्हारचा मित्र त्याला समजावत होता, त्यालाही कळत होती त्याची मनातली चलबिचल.
"मी आत जाऊन बसतो, तुम्ही पण आवरा."
असे म्हणून मल्हार तिथून उठून वरासाठी दिलेल्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या मागोमाग त्याचे दोन तीन मित्र सुद्धा गेले. त्याला आता लग्न होईपर्यंत एकटं सोडायचं नाही असे नाना मामांनी सांगितले होते.
असे म्हणून मल्हार तिथून उठून वरासाठी दिलेल्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या मागोमाग त्याचे दोन तीन मित्र सुद्धा गेले. त्याला आता लग्न होईपर्यंत एकटं सोडायचं नाही असे नाना मामांनी सांगितले होते.
"ताई, तयारी बघून घे एकदा. काही बाकी असेल तर सांग."
तात्यांनी कल्पना ताईला जवळ जाऊन विचारले.
"इतक्या कमी वेळात बरीच तयारी केली. आता कुठे कमी काही पाहायची नाही."
ताईंनी तयारी बघत म्हंटले.
"दोघेही तयार असतील तर बोलवून घ्या बाहेर. आपण सुरुवात करूया."
नानांनी तात्या आणि कल्पना ताईकडे बघत बोलले.
नानांनी तात्या आणि कल्पना ताईकडे बघत बोलले.
"मल्हार आताच तयार व्हायला गेला आहे."
कल्पना ताईंनी सांगितले तसे नाना त्याला बोलवायला गेले.
"मीराला तिची काकू तयार करतेय."
सुनिता बाईंनी ताईंना सांगितले.
सुनिता बाईंनी ताईंना सांगितले.
"वहिनी, हे बघ.. मीरासाठी बनवून आणले आताच."
कल्पना ताईंनी मीरासाठी केलेले गळ्यातले मंगळसूत्र दाखवले.
"खूप सुंदर डिझाईन आहे, पण तुम्ही तर सगळे दागिने घेतले होते ना! मग हे नवीन कशाला आणले?"
सुनिता बाईंनी लगेच विचारले.
सुनिता बाईंनी लगेच विचारले.
"ते सगळे दागिने देऊन नवीन आणले. ते मितालीसाठी घेतलेले होते, पण आता मी माझ्या मीरासाठी सगळे नवीन केले आहे. जुनी कुठलीच आठवण नकोय."
कल्पना ताई दागिन्यांची पिशवी पुढे करत बोलल्या.
कल्पना ताई दागिन्यांची पिशवी पुढे करत बोलल्या.
"तुम्ही मीरासाठी इतका विचार केला हेच खूप आहे माझ्यासाठी. खरचं खुप आनंद होतोय मला, मीरा तुमची सून म्हणून खूप खुश राहिलं याची खात्री आहे."
सुनिता बाई खूपच भावनिक झाल्या होत्या.
सुनिता बाई खूपच भावनिक झाल्या होत्या.
"वहिनी अग, मीरा आता जरी माझी सून होणार असली तरी मी तिला आधीसारखेच माझ्या मुलीप्रमाणे वागवणार. तुम्ही नका काळजी करू."
कल्पना ताईंनी त्यांना दिलासा दिला.
"खरचं खुप नशीबवान आहे मीरा. तुमच्यासारखी सासू आणि मल्हार सारखा जावई मिळाला आम्हाला."
सुनिता बाई खूपच मनातून बोलत होत्या.
सुनिता बाई खूपच मनातून बोलत होत्या.
"वहिनी, जे व्हायचं ते होतंच आणि नशिबात जे असेल ते मिळतेच."
कल्पना ताई अगदी बरोबर बोलल्या.
"चला आता बराच वेळ झालेला आहे. मुलाला आणि मुलीला घेऊन या बाहेर."
गुरुजी बोलले तसे दोघी मुलांना आणण्यासाठी निघून गेल्या.
मीराचे मामा आणि मल्हारचे मामा म्हणजेच नानांनी हजेरी लावली. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला. सगळे पाहुणे पुन्हा जमले. सगळे जण खुर्च्या पकडुन बसले. त्यानंतर साखरपुड्याला सुरुवात झाली.
मल्हार अगदी साध्या ड्रेसमध्ये आलेला. त्याची पूजा होऊन त्याला नाना मामांनी कपडे दिले. तो जातच होता तितक्यात मीरा आली. ती छान साडी नेसून तयार होऊन आली होती. मीरा खरचं खूप सुंदर दिसत होती.
मीराची पण पूजा झाली आणि तिला साडी दिली. मल्हार आणि मीराला कपडे बदलून पुन्हा स्टेजवर बोलवण्यात आले. मल्हार तर काहीच बोलत नव्हता, पण मीरा त्याच्याकडे बघत होती. ती खूप आशेने बघत होती, की एकदा तरी मल्हार तिच्याकडे बघेल.. पण मल्हारने एकदाही तिच्याकडे बघितले नाही. मीरा नाराज झाली.
दोघेही स्टेजवर आले. मल्हार त्याच्या मित्रांसोबत होता तर मीराच्या मागे सगळ्या बहिणी उभ्या होत्या. दोघांच्या हातात अंगठी दिली.
मल्हार मीराकडे बघेल का? बघुया पुढील भागात.
मल्हार मीराकडे बघेल का? बघुया पुढील भागात.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा