नकळत सारे घडले - भाग २४
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
"मल्हार, अरे जरा तरी तोंडावर हसू ठेव. काय नुसता सिरियस होऊन बसतो. स्वतःच्याच लग्नाच्या दिवशी असं बरं दिसतं का हे?"
मल्हारचा मित्र गणेश त्याला चांगल समजावून सांगत होता.
"हम्म्म.. ठीक आहे."
त्याच्या बोलण्यावर इतकेच म्हणून मल्हार पुन्हा सिरियस मोडवर गेला.
"अरे काय हे! नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे तुझा? झालं ना आता सगळं नीट, मग कसलं एव्हढ टेन्शन आहे तुला?"
गणेश पुन्हा त्याला समजावणीच्या सुरात बोलला.
"तुला नाही समजणार, जाऊ दे सोड तो विषय."
मल्हार मात्र त्याच्याकडे न बघताच बोलत होता.
"बरं ठीक आहे, पण आता लग्न होतंय तुझं; त्यामुळे होणाऱ्या बायकोचा तरी विचार कर. जे झालं ते विसरून जा आणि येणाऱ्या पुढच्या भविष्याचा विचार कर."
गणेश इतकं बोलून बाहेर निघून गेला. खरतर मल्हार बोलला याचा त्याला राग आलेला, पण त्याने ते समजून घेतले आणि तरीही त्याला समजून सांगत होता. बाकी पुढे काय करायचं हे ज्याचं त्याने बघावं.
"गणेश अरे! थांब तरी माझ्यासोबत."
मल्हारला आता त्याचे सगळे बोलणे कळतं होते, पण वळत नव्हते. काय करणार परिस्थितीच तशी झाली होती. त्याला काहीच समजत नव्हते नेमकं वागावं तरी कसं.
घरच्यांना वाटलं म्हणून त्यांनी लगेच दुसरं लग्न ठरवलं आणि हा लग्नाला तयार सुद्धा झाला. त्यातही खुश राहावं हसत बोलावं सगळ्यांशी हे सुद्धा मान्य केलं, पण सकाळी जे काही झालं ते त्याच्या मनातून जायलाच तयार नाही, त्याला तो तरी काय करणार? इतक्या सहजासहजी विसरता येण्यासारखी ही गोष्ट नव्हतीच. यावर फक्त एकच सोल्यूशन आहे आणि ते म्हणजे वेळ. जसजसा वेळ जाईल तसे मल्हारला विसरायला सोपे होईल, पण तोपर्यंत त्याला वेळ देणे पण गरजेचे आहे. बळजबरीने काहीच साध्य होतं नाही हे त्यालाही माहिती होते आणि म्हणूनच मीरासोबत पण ह्याविषयी बोलणे त्याला योग्य वाटले होते.
मीरा बिचारी मनातून पूर्णपणे तयार होती हे अजूनही त्याला माहितीच नाहीये. मल्हारला वाटतेय, की ती सुद्धा त्याच्यासारखीच आई वडिलांसाठी तयार झाली असावी. तिच्यापुढे तर काहीच पर्याय ठेवला नाही. लग्नाला तयार हो म्हणून सांगितले आणि ती उभी राहिली, हेच झाले असावे तिच्या बाबतीत.. असे त्याला वाटतं होते.
इकडे मीरा मल्हारसाठी तयार होतं होती आणि तिकडे मल्हार मात्र अजूनही द्विधा मनस्थितीत होता. बाहेर आल्यावर चेहऱ्यावर हसू आणि मनात मात्र चलबिचल.
मीराला तयार करायला सगळ्या बहिणी कामाला लागल्या होत्या. कोणी तिला साडी नेसवून देत होते तर कोणी तिची हेयर स्टाईल बनवून देत होते. ते सगळे झाल्यावर चेहऱ्यावर रंगरंगोटी करायला ती मात्र तयार होत नव्हती. काकूने जेव्हा सांगितले तेव्हा कुठे ती तयार झाली.
"मीरा, अग हे सगळं एकदाच होतं आपल्या लग्नात. नंतर कोणी ह्या सगळ्याचा विचार पण करत नाही. तुझ्या बाबतीत तर आम्हाला इतकी तयारी करायला जमले नाही, पण जितकी होईल तितकी तर करून घेऊ दे. आता कशाला नाही म्हणू नकोस. लग्न एकदाच होतं आणि हा क्षण आपल्यासाठी खूप खास असतो. नंतर आपल्यासोबत लग्नाचे फोटो आणि हे क्षण म्हणजे आयुष्य भरासाठी आठवणी बनून राहतात. आता ह्याच मनात साठवून ठेव."
निवेदिता काकू अगदी बरोबर सांगत होत्या. त्या बोलता बोलता तिच्याकडून बरोबर सगळं करवून घेत होत्या.
निवेदिता काकू अगदी बरोबर सांगत होत्या. त्या बोलता बोलता तिच्याकडून बरोबर सगळं करवून घेत होत्या.
"मीरा, झाली का तयारी? आवरा ग पटकन. तिकडे गुरुजींनी लगेच बोलवलं होतं. जास्त उशीर करू नका बरं."
सुनिता बाई बोलत बोलतच आतमध्ये आल्या.
"ताई, एकदा बघा तरी मीराकडे. कित्ती सुंदर दिसतेय ती.
काकू बोलल्या तसे सुनिता बाईंनी मीराला वाकून पाहिले.
काकू बोलल्या तसे सुनिता बाईंनी मीराला वाकून पाहिले.
"मीरा.. "
इतकेच म्हणून त्यांनी पोरीच्या डोक्यावर हात ओवाळून बोटं कडकडा मोडली.
"किती छान, तू आहेस म्हणून हे सगळं नीट होतंय बघ. नाहीतर मला तर काहीच सुचलं नसतं हे सगळं करायला."
सुनिता बाई त्यांच्या लहान जाऊ म्हणजेच निवेदिता काकूला बोलत होत्या.
"म्हणजे काय! मी असल्यावर तुम्हाला टेन्शन घ्यायचे कामचं नाही. तुम्ही उगाच लोड घेताय. आता बघा बरं आपली मीरा कित्ती शहाण्यासारखी वागतेय."
काकू असे म्हणतच मेकअप करून देत होत्या आणि मीरा शांतपणे खुर्चीवर बसून होती.
काकू असे म्हणतच मेकअप करून देत होत्या आणि मीरा शांतपणे खुर्चीवर बसून होती.
"काकू, खूप जास्त डार्क नको हा करू. नाहीतर.."
मीरा बोलता बोलता मध्येच थांबली.
"नाहीतर काय? आवडणार नाही का होणाऱ्या नवऱ्याला? मला माहितीय सगळं."
असे म्हणून काकू चिडवून बोलू लागली तसे मीराला पण लाजल्या सारखे झाले.
असे म्हणून काकू चिडवून बोलू लागली तसे मीराला पण लाजल्या सारखे झाले.
"अग्गो बाई, ब्लश लावायची तर गरजच नाही बघ तुला. लाजूनच गाल गुलाबी झालेत तुझे."
काकू बोलत होत्या तशी मीरा आणखी लाजत होती.
काकू बोलत होत्या तशी मीरा आणखी लाजत होती.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा