नकळत सारे घडले - भाग ३३
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
"आत्तू, सॉरी अग ते मला जरा उशिरा जाग आली."
मीरा तिचे आवरून पहिले तिच्या आत्याकडे म्हणजे कल्पना ताईंकडे गेली. त्या किचनमध्ये सगळ्यांचा चहा नाश्ता बघत होत्या. घरामध्ये नाही म्हंटले तरी चार सहा पाहुणे होते आणि सासू पण होती.
मीरा तिचे आवरून पहिले तिच्या आत्याकडे म्हणजे कल्पना ताईंकडे गेली. त्या किचनमध्ये सगळ्यांचा चहा नाश्ता बघत होत्या. घरामध्ये नाही म्हंटले तरी चार सहा पाहुणे होते आणि सासू पण होती.
"अग मग त्यात काय इतकं, दमायला झालं असेल ना तुला. काल खूप गडबड झाली. आता तू आरामात आवर, तुला चहा देऊ का?"
आत्या मीराला जवळ घेत बोलली.
"आत्या, मला सांग ना काही काम करू का मी."
मीरा तिच्या आत्याला विचारत होती.
"अग वेडाबाई तू नवीन नवीन नवरी आहेस. तू आता पूजा होईपर्यंत काहीच काम करायचं नाही. जा जाऊन देवाच्या पाया पडून ये मग मी तुला चहा नाश्ता देते."
आत्याने मीराला सांगितले तसे मीरा लगेच देवघरात गेली.
संपूर्ण देवघर झेंडुंच्या फुलांनी छान सजवले होते. बहुतेक सकाळी सकाळी कोणीतरी देवपूजा केली असावी. सगळे देव आंघोळ करून मस्त फुलांनी सजवून बसवले होते. जणू काही ते आपल्याला बघून हसत असल्याचा भास होत होता. उदबत्तीचा सुवास दरवळत होता, त्याने अधिक प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. मीराने देवाला हळदीकुंकू वाहिले आणि नमस्कार केला.
'देवा, लग्नानंतरचा आज माझा पहिला दिवस. हे घर मला परके नाही, तरीही हे नाते नवीन आहे. मी माझ्या परीने सगळ्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत राहीन. मल्हारला मी अगदी मनापासून स्वीकारले आहे, पण त्यांच्या मनात काय आहे हे काही कळतं नाहीये. मनातून तर खूप भीती वाटतं आहे. देवा सगळे छान होऊ दे.'
मीरा मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होती.
"मीरा, चहा थंड होतोय. ये लवकर."
मिनल तिला आवाज देत होती.
"हो हो, आले आले."
मीरा पटकन उठली आणि बाहेर आली. बाहेर येताच तिने आत्याच्या पाया पडल्या. बाजूला आज्जे सासू बसल्या होत्या त्यांनाही नमस्कार केला. बाहेर जाऊन सासरे आणि इतरांच्या सुद्धा पाया पडल्या.
"मीरा, राहू दे अग. मल्हार उठला का बघून येतेस का?"
मिनलने मुद्दाम तिला हे काम सांगितले.
मीरा वरती त्याच्या रुममध्ये गेली. आता ती रूम तिची सुद्धा होणार होती; त्यामुळे ती हळूच डोकावून बघत होती. दरवाजा उघडाच होता, पण मल्हार काही दिसत नव्हता. बहुतेक आंघोळीला गेला असावा म्हणून मीरा तिथेच उभी होती. पूर्ण रुममध्ये पसारा पडला होता. कपड्यांची बॅग तशीच अर्धवट उघडी आणि कपाटात पण तसेच. ड्रेसिंग टेबलवर स्प्रेच्या बॉटल पण उघड्याच. मीराला ते पाहून आश्चर्य वाटले. इतक्यात बाथरूम मधून मल्हार बाहेर आला आणि त्याला टॉवेलवर बघून मीरा पटकन पाठमोरी झाली.
"सॉरी सॉरी, मला ते तुझं.. सॉरी तुमचं आवरलं की नाही ते बघायला सांगितले होते. खाली सगळे जण वाट बघताय."
मीरा जीभ चावत बोलली.
मीरा जीभ चावत बोलली.
"मी येतो लगेच आवरून."
मल्हार इतके बोलला आणि कपडे हातात घेऊन पुन्हा बाथरूममध्ये गेला.
"मी जाते खाली, तुम्ही आवरून या."
मीरा इतके बोलून पटकन खाली पळाली.
मल्हार थोड्याच वेळात त्याच आवरून खाली आला. त्याला बघण्याची सुद्धा हिमंत होत नव्हती मीराची. तिला खूप खजील झाल्यासारखे वाटतं होते, पण त्याला काहीच वाटतं नव्हते.
मीरा आणि मल्हार दोघांना मिनलने सोबतच चहा नाश्ता दिला. मीरा गपचुप खाली मान घालून खात होती. बिचारीला कळतच नव्हते नेमकं काय बोलावं, कसं वागावं.
"मल्हार, आज तुम्ही दोघे आपल्या गावातल्या देवांना जाऊन या जोडीने. तुमच्या सोबत मिनल आणि आजी येईल."
आईने सांगितले त्यावर मल्हार काहीच बोलला नाही, फक्त होकारात मान डोलावली.
"आत्या, तू नाही येणार!"
मीरा लगेच बोलून गेली.
"नाही ग, तुम्ही जाऊन या जवळच आहे. संध्याकाळी जेवणाच्या वेळेला घरी याल."
आत्याने सांगताच मीरा हो म्हणाली.
आत्याने सांगताच मीरा हो म्हणाली.
"जा, छान आवरून ये. साडी व्यवस्थित करून घे."
आत्याला समजले होते की मीराला साडी नेसता आली नाही.
"मिनल, जा तिला मदत कर साडी नेसायला आणि तू पण चांगला ड्रेस घालून जा."
काम करता करता आई सगळ्यांना सांगत होती.
मीरा गावातल्या देवदर्शनाला जायला तयारी करत होती. मिनल पण तिला मदत करायला सोबत आली. साडी व्यवस्थित करून मिनलने तिला पिना लावून दिल्या.
"मी लावून देतेय आज, पण आता हे काम दादाला सांगायला पाहिजे."
असे म्हणून मिनल हसायला लागली आणि तिच्यासोबत मीरा पण हसली. हे नुसतं इमॅजिन करून पण मीराच्या अंगावर शहारे आले.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा