नकळत सारे घडले - भाग ३४
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
"आई, आम्ही चौघे जण जाणार का फक्त."
मिनल आईला विचारत होती.
मिनल आईला विचारत होती.
"मग काय आख्ख गाव गोळा करून न्यायचं असतं का?"
आईला सकाळी सकाळी भारी जोक सुचत होते.
"काय आई तू पण, दादाचं लग्न आणि तोच गाडी चालवणार का?"
मिनल म्हणत होती त्यात पॉइंट होता; म्हणून त्यांनी मित्रांना पण बोलवून घे म्हणून सांगितले.
"दादा, गणेश आणि दुर्गेशला बोलवून घे. त्यांना पण सोबत घेऊन जा आई बोलली."
मिनल बोलली आणि मल्हारने फोन हातात घेतला.
फोनची रिंग वाजतच होती की दोघेही दरात उभे.
"अरे, तुम्हालाच फोन करत होतो मी."
मल्हार बोलला आणि ते दोघे घरात आले.
मल्हार बोलला आणि ते दोघे घरात आले.
"काकू, नाश्ता काय बनवला आहे?"
दोघांनी सरळ किचनकडे मोर्चा वळवला.
"पोहे केलेत, खाणार का?"
आईने लगेच दोन प्लेट भरल्या आणि त्यांच्या समोर मांडून ठेवल्या.
आईने लगेच दोन प्लेट भरल्या आणि त्यांच्या समोर मांडून ठेवल्या.
"बरं झालं तुम्ही दोघे आलात, आता ह्यांना देवदर्शनाला घेऊन जा."
आईंनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवून दिली आणि त्या मोकळ्या झाल्या.
मीरा त्यांच्याकडे बघतच बसली.
'किती फ्री राहतात हे दोघे घरात, मित्राचे घर असले तरी स्वतः चे घर असल्यासारखे वागतात. कमाल आहे, पण मित्र खरचं चांगले आहेत मल्हारचे. लग्नात अनुभव आलाच होता आणि आता प्रत्यक्षात देखील दिसेलच.'
मीरा मनातल्या मनात बोलत होती.
'किती फ्री राहतात हे दोघे घरात, मित्राचे घर असले तरी स्वतः चे घर असल्यासारखे वागतात. कमाल आहे, पण मित्र खरचं चांगले आहेत मल्हारचे. लग्नात अनुभव आलाच होता आणि आता प्रत्यक्षात देखील दिसेलच.'
मीरा मनातल्या मनात बोलत होती.
"अग आवर पटकन, तुम्हाला निघायला उशीर होईल."
आत्याने असे म्हणताच मीरा पटपट खाऊ लागली तसे तिला जोरात ठसका लागला.
आत्याने असे म्हणताच मीरा पटपट खाऊ लागली तसे तिला जोरात ठसका लागला.
"अग हळू, ठसका लागला बघ. पाणी पी."
आत्या तिला अगदी एखाद्या लहान पोरीसारखे वागवत होती. मिनल आणि मल्हार दोघेही तिच्याकडे बघू लागले.
आत्या तिला अगदी एखाद्या लहान पोरीसारखे वागवत होती. मिनल आणि मल्हार दोघेही तिच्याकडे बघू लागले.
"अरे तुम्ही असे का बघताय. जा आता लवकर. हो आणि गाडी हळू चालवा बरका. उगाच गर्दी आहे म्हणून घाईघाईत घरी येऊ नका. व्यवस्थित दर्शन घ्या."
आई सगळ्यांना सांगत होती.
आई सगळ्यांना सांगत होती.
"हो आई, आजी आहे ना सोबत. तू नको काळजी करू."
मिनल आईला दिलासा होत होती.
"हो आणि ही देवीला ओटी काढून ठेवली आहे ती दोघांनी जोडीने भरा. यात सगळं पूजेचं समान भरून ठेवलं आहे."
आई मीराच्या हातात पिशवी देत बोलल्या.
"हो ग माझी आई, मला माहिती आहे सगळे. आपले नेहमीचे पुजारी काका असतीलच त्यांना सांगेन मी सगळे."
मिनल इतके बोलून आजीला बोलवायला निघून गेली.
"मीरा, नीट सांभाळून जा. हे सगळे असतीलच सोबत, पण काही वाटलं तर फोन करा."
आत्याला काळजी वाटतं होती.
"काकू, काही काळजी नका करू. तुमच्या पोरांना सुखरूप घरी घेऊन येतो."
गणेश बोलला तसे आईला हसू आले.
"बरं येतो आता."
मल्हार पण आईला सांगून बाहेर पडला.
"गाडी सावकाश चालवा रे! जास्त गडबड करू नका."
सगळे गाडीत बसले तसे विलासरावांनी पोरांना समजावले.
"हो काका, येतो."
इतके म्हणून गणेशने देवाचे नाव घेऊन गाडी सुरू केली.
इतके म्हणून गणेशने देवाचे नाव घेऊन गाडी सुरू केली.
मीरा आणि मल्हारला देवदर्शनाला पाठवून कल्पना ताई घरातले सगळे आवरत होत्या. त्यांच्या जोडीला त्यांची जावू म्हणजेच मल्हारची काकू पण होती.
दोघींनी ठरवले होते की ह्यांना देवदर्शनाला पाठवून गुरुजींकडे जाऊन पूजेची तारीख आणि वेळ काढून यायची. लग्न घाईघाईत उरकलं पण लग्नाची सत्यनारायण पूजा अगदी छान झाली पाहिजे; त्यामुळे त्यांनी चांगलीच तयारी केली. जे नाही आले त्यांना सगळ्यांना बोलवायचे ठरवले.
गुरुजींनी पाच दिवसा नंतरचा चांगला मुहूर्त काढून दिला. मग काय लागल्या कल्पना ताई कामाला. त्यांनी पहिले त्यांच्या माहेरी म्हणजेच दोन्ही भावांना फोन केला आणि पूजेचा मुहूर्त कळवला. तात्या आणि नाना दोघेही खूप खुश झाले.
"अहो, ऐकलत का! ताईने पूजेचा मुहूर्त काढून आणला आहे."
तात्या सुनिता बाईंना सांगू लागले.
"काय सांगता. कधीचा निघाला मुहूर्त? आपल्याला पण तयारी करायला वेळ मिळाला पाहिजे."
सुनिता बाईंनी तर लगेच तयारी दाखवली.
"अग हो हो, आपल्याला पण वेळ मिळणार तयारी करायला. मुहूर्त पाच दिवसांनी निघाला आहे; त्यामुळे जितकी पाहिजे तितकी तयारी करा. कसलीच कमी पडू देऊ नका."
तात्या पण अगदी खुश होऊन बोलत होते.
लग्नात जे जे करायचे राहिले होते ते सगळे आता दोन्ही घरातले माणसं करणार होते. मीरा आणि मल्हार दोघेही एकमेकांसाठी किती लकी आहेत हेच सगळे जण बोलत होते; त्यामुळे त्यांना असे वाटून द्यायचे नाही की त्यांचे लग्न गडबडीत उरकले म्हणून.. इतकी छान तयारी करायची.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा