नकळत सारे घडले - भाग ४०
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मीरा मेहेंदी काढायला बसते. दोन्ही हातांवर अगदी कोपऱ्यापर्यंत मेहेंदी काढून होते. अधून मधून मिनल तिला खाऊ घालत होती आणि पाणी सुद्धा पाजत होती. मिनल नणंद तर होतीच, पण त्याआधी ती मीराची आते बहिण होती. दोघी आधीपासूनच खूप चांगल्या मैत्रिणी होत्या; त्यामूळे मीराला काही काळजी नव्हती. लग्नानंतर मीरा मिनल सोबतच तिच्या रूममध्ये होती.
"आई, झाली ग मीराची हातावर मेहेंदी काढून."
मिनल आईला काकूला बोलवून मेहंदी बघायला सांगत होती.
मिनल आईला काकूला बोलवून मेहंदी बघायला सांगत होती.
"अग पायावर पण काढायची आहे."
आईने येऊन सांगितले तसे मीरा पाय पुढे करून बसली.
हातावर पायावर मेहेंदी काढून झाली. दुसऱ्या दिवशी अगदी लाल गडद चॉकलेटी रंग चढला. तिचं स्वतःचे हात पाहून खूप खुश होतं होती. आत्ता कुठे मीराला नवरी असल्यासारखे वाटायला लागले होते. मीराचे रोजच आईबरोबर बोलणे होतच होते. त्या पण तिकडून काय काय तयारी झाली विचारत होत्या.
"आई हे बघ, माझी मेहेंदी किती छान आलीय."
मीरा तिचे दोन्ही हात आणि पायावरची मेहेंदी दाखवत होती व्हिडिओ कॉलवर.
मीरा तिचे दोन्ही हात आणि पायावरची मेहेंदी दाखवत होती व्हिडिओ कॉलवर.
"खूप मस्त, छानच रंग आलाय मेहेंदीला."
सुनिता बाई तिकडून लेकीचे होणारे कौतुक बघत होत्या. त्यांना खूप छान वाटत होते. त्यांच्या मुलीची सगळी हौस तिची सासू म्हणजेच त्यांची नणंद आनंदाने पुरवत होत्या. मीरासाठी त्यांना शोधून सुद्धा असे सासर सापडले नसते.
सुनिता बाई तिकडून लेकीचे होणारे कौतुक बघत होत्या. त्यांना खूप छान वाटत होते. त्यांच्या मुलीची सगळी हौस तिची सासू म्हणजेच त्यांची नणंद आनंदाने पुरवत होत्या. मीरासाठी त्यांना शोधून सुद्धा असे सासर सापडले नसते.
"मामी, बांगड्यावाली पण बोलवली आहे आईने. मीराला चुडा भरणार आहे आणि बाकीच्या सगळ्या बायकांना बांगड्या भरायच्या आहेत."
मिनल सांगत होती तसे मीराच्या माहेरी सगळे खुश होतं होते.
मिनल सांगत होती तसे मीराच्या माहेरी सगळे खुश होतं होते.
मीराच्या मेहेंदीने रंगलेल्या हातात छान हिरवागार चुडा भरला. मध्ये मध्ये सोन्याच्या बांगड्या सुद्धा घातल्या. हाता पायावर मेहेंदी, हातात हिरवा चुडा.. तिचे रूप अगदी खुलून आले होते. गोरीपान, नाजूक मीरा.. अगदी हुरळून गेली होती. हातावर मल्हारचे नाव काढताच तिच्या गालावर लाजेची लाली चढली होती.
"आता कुठं नवरी शोभून दिसतेय, कल्पनाने हे मात्र चांगल केलं."
सासूबाई मीराकडे बघून बोलल्या तसे मीराने त्यांच्या पाया पडल्या.
"अहो ऐकल का? पाहुण्यांचा फोन आलेला. ती पोरगी मिताली म्हणे तिच्या आधीच्या प्रियकरा बरोबर पळून गेली."
विलासराव फोनवर बोलून होताच कल्पना ताईंना सांगत होते. सगळे तिथेच होते; त्यामुळे सगळीकडे ही बातमी पसरली.
"काय बाई, आई बापान इतकं सगळं केलं आणि त्या पोरीने सगळं धुळीला मिळवलं. एका क्षणात होत्याच नव्हत करून निघून गेली. इतकचं होतं तर मग लग्नाला तयार कसं काय झाली ती पोरगी! आधीच पळून जायचं ना! आई बापाची काही काळजीच नाही ह्या मुलांना. भर मांडवातून पळून गेली पोरगी, किती वाईट वाटलं तिच्या आईबापाला. नाक कापलं तिने."
सविता काकू बोलू लागल्या. मल्हार पण तिथेच बसून ऐकत होता. त्यालाही ऐकून खूप वाईट वाटले.
"नाहीतर काय! ती तर गेलीच पण माझ्या पोराचं पण किती नुकसान केलं. तो किती गप्प झाला होता. त्याला तर काहीच सुचत नव्हते. इतकं सगळं व्हायची वाट का बघावी पण, लग्नाला आधीच नकार दिला असता म्हणजे झालं असतं. इतका खर्च झाला त्यांचाही आणि आपलाही. ते सगळं तर जाऊ द्या, पण माझ्या पोराच्या मनाशी खेळली ती पोरगी."
कल्पना ताई पण बोलत होत्या.
सगळे त्या मितालीला दोषी ठरवून मोकळे झाले होते. खरंतर तिने असे नव्हतेच करायला पाहिजे, पण परिस्थिती समोर ती सुद्धा हतबल झाली असावी आणि त्यामागचे कारण तिलाच माहीत. तिच्या आई वडीलांनी तिच्याशी बोलले पाहिजे होते. ती लग्नाला तयार आहे की बळजबरी तिला लग्नासाठी तयार केले हे कोणालाच सांगता येत नव्हते. शेवटपर्यंत कोणालाच माहिती नव्हते तिच्या मनात काय चालू होते, पण मल्हारचे मन मात्र तिने नक्कीच दुखवले होते.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा