नकळत सारे घडले - भाग ४५
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
पूजेला एकच दिवस बाकी होता; त्यामुळे पाहुणे यायला पुन्हा सुरुवात झाली होती. हळूहळू सगळे पुन्हा जमले. पहिले लग्न मोडले म्हणून आता जास्त कोणी येत नव्हते. कल्पना ताईंच्या चुलत बहिणी आणि नणंदा आल्या तेवढ्या. बाकीची त्यांची पोरं आणि सूना मात्र ह्यावेळी काही आल्या नाही.
"पहिलं लग्न मोडल; म्हणून आता खरचं झालं की नाही शंकाच होती; त्यामुळे कोणी आलं नाही सोबत. आम्ही दोघी बहिणी एकट्याच आलो बघा वहिनी."
आल्या आल्या पाहुण्यांनी मापं काढायला सुरुवात केली. त्यांच्या बोलण्याला कोणीच उत्तर देत नव्हते.
"अहो त्याच दिवशी त्याच मांडवात लग्न झाले की आमच्या मल्हारचे, अजून काय सांगू."
सविता काकूंना राग आला तसे त्याच बोलल्या, पण त्यांना कल्पना ताईंनी गप केले. उगाच दारात आलेल्या पाहुण्यांचा अपमान नको.
आज घरात खूप गर्दी झाली होती; त्यामुळे मीरा वरतीच बसून होती. कोणी आलं तर पाया पडायला मात्र खाली येत होती. तिला छान साडी नेसवून बसवले होते; त्यामुळे जरा अवघडल्यासारखे होतं होते.
खाली कल्पना ताई, सविता काकू आणि मदतीला दोन मावश्या आल्या होत्या; त्यामूळे स्वयंपाक अगदी वेळेवर झाला. लवकर आवरून झोपायच्या तयारीत होते सगळेच.
मीराला तर झोपच येत नव्हती. उद्या त्यांच्या लग्नाची सत्यनारायण पूजा, दोघे जोडीने पूजेला बसणार.. नुसता विचार करूनच मीराला खूप छान वाटतं होते. नको नको म्हणता अचानक लग्न झाले आणि आता मल्हार तिला आवडू लागला होता. तो जास्त बोलत नव्हता, पण तरीही ती फक्त त्याच्याकडे बघूनच सुखावत होती. उद्याचे गोड स्वप्न बघण्यात मीरा कधी गाढ झोपी गेली हे तिलाच समजले नाही.
"मीरा, अग मीरा उठ. सहा वाजून गेलेत. आईने तुला पाच वाजता उठवायला सांगितले होते."
मिनल तिला उठवत बोलत होती.
"काय? उशीर झाला का? मिनू.. लवकर तरी उठवायचे ना मला."
मीरा मिनलवरच चिडत बोलली.
मीरा मिनलवरच चिडत बोलली.
"अरे वाह! हे भारिये. म्हणजे उठवायचे मीच आणि वरतून माझ्यावरच चिडायचे."
मिनल बेडवर पडल्या पडल्या बोलत होती.
मिनल बेडवर पडल्या पडल्या बोलत होती.
"माझी बेल वाजली नाही का?"
मीरा फोनकडे बघून बोलली.
"तुझी काय माझी पण बेल तीनदा वाजून बंद झाली. मी तुला प्रत्येक वेळी उठवले, पण तू काय हलायलाच तयार नाही."
मिनल तिला चिडवत बोलली.
"ते मला रात्री लवकर झोप लागली नाही; म्हणून मग लवकर जाग आली नसेल."
मीरा जीभ चावत बोलली.
मीरा जीभ चावत बोलली.
"हम्म्म, समजल मला. आता बस आजच्या दिवस, मग उद्यापासून तू दादाच्या म्हणजे तुमच्याच रुममध्ये जाशील."
मिनल पण तिला उगाच त्रास देत होती. तशी मीरा आणखी लाजून तोंड लपवत होती.
"मिनू, काहीही काय? असं बोलतात का?"
मीरा पटकन कपडे घेऊन आवरायला गेली.
मीरा पटकन कपडे घेऊन आवरायला गेली.
गुरुजी सकाळी आठ वाजेपर्यंत येणार होते. त्याच्या आत मीरा आणि मल्हार तयार पाहिजे असे सांगून ठेवले होते. खाली बाकीच्या पाहुण्यांची सोय करून ठेवली होती; त्यामुळे वरती त्यांना कोणीच त्रास द्यायला गेले नव्हते. खाली सगळ्यांच्या आंघोळी उरकून चहा नाश्ता पण झाला होता.
"आई, माझा नाश्ता?"
काकू सगळ्यांना चहा नाश्ता देत होती, पण मल्हारला फक्त चहा दिला म्हणून त्याने आईला विचारले.
काकू सगळ्यांना चहा नाश्ता देत होती, पण मल्हारला फक्त चहा दिला म्हणून त्याने आईला विचारले.
"अरे आज पूजा होईपर्यंत उपवास राहील तुमच्या दोघांचा. पूजा झाली की लगेच जेवणं करून घ्या."
आई बोलली तसे मल्हार शांत झाला.
आई बोलली तसे मल्हार शांत झाला.
"थांब मी तुला दूध आणि राजगिरा लाडू देते मग जरा दम काढशील. मीराला येऊ दे, मग तुम्हाला दोघांना सोबतच देते."
सविता काकू त्याच्याकडे बघून बोलली.
गणेश आणि दुर्गेश मात्र चांगला दाबून नाश्ता करत होते. मुद्दाम त्याला बघून बघून खात होते.
"मीरा, तुला आवरून द्यायला येईलच माझी मैत्रीण. तोपर्यंत तू बस शांत."
मिनल तिला फोनकडे बघून सांगत होती.
"आता कशाला, संध्याकाळी मेकअप करेन मी. आता मी माझं माझच आवरून घेते."
असे म्हणून मीरा आरशात बघून चेहऱ्याला क्रीम लावत बोलत होती.
असे म्हणून मीरा आरशात बघून चेहऱ्याला क्रीम लावत बोलत होती.
"अग कशाला? मी बोलले होते ना तुला. लग्न काय सारखं सारखं नाही होतं; त्यामुळे तू छान सजून बस. दादा बघतच राहिला पाहिजे तुझ्याकडे."
मिनल बोलली तशी मीरा आरशात बघून स्वतः शीच हसत होती.
"मिनू, पण त्यांना जास्त मेकअप केलेलं आवडत नाही. हे माहितीय मला; त्यामूळे आता त्यांना आवडते तसे आवरते मी आणि संध्याकाळी तुला आवडते तसे."
असे म्हणून मीरा आवरू लागली.
असे म्हणून मीरा आवरू लागली.
"मीरा आवरले का बाई तुझे, खाली सगळे जण विचारताय."
सविता काकू वरती आल्या मीराला बघायला. ती मात्र छान मेकअप करण्यात गुंग होती.
"अरे वाह! आमची मीरा तर भारीच दिसतेय ह्या लाल साडीत."
काकूंना तिच्याकडे बघून खूप छान वाटले.
"काकू, मला साडी नीट नेसून द्या ना!"
मीराने काही साडी पिना काढून काकूंच्या हातात देत म्हंटले तसे त्या पण लगेच तिला मदतीला तयार झाल्या.
मीराची साडी नेसून झाली. छान चापून चोपून साडी नेसवली होती सविता काकूंनी तिला; त्यामुळे मीरा अगदी शेपमध्ये दिसत होती. तिचा मेकअप तिने स्वतः च केला होता.
"मल्हार, अरे वरती जाऊन मीराला इतके गजरे देऊन ये बरं!"
सविता काकूंनी खाली आल्यावर मल्हारला काम सांगितले. त्याला ते करायचे नव्हते, पण नाही म्हणून कसे चालेल.
"मीरा, हे आईने पाठवले.. आणि हो आवरून झाले असेल तर खाली ये."
मीरा मल्हारकडे बघतच उभी होती. तो मात्र तिच्या हातात गजरे देऊन केव्हाच खाली निघून गेला होता.
ताज्या फुलांचे गजरे स्वतः मल्हार आला होता मीराला द्यायला; त्यामुळे तिने ते सगळेच लावून टाकले होते.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा