नकळत सारे घडले - भाग ४९
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
पूजा होऊन सगळ्यांची जेवणं पण आटोपली होती. साधारण पन्नास लोकं तरी असतील, तरीही लवकर आवरले होते. मीरा मात्र छान रमत गमत जेवण करत होती. खूप दिवसांनी आईला भेटली; त्यामुळे त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या.
"मीरा, अग लवकर जेवण करून घे. माझी मैत्रीण येईलच इतक्यात तुझा मेकअप करून तुला आवरून द्यायला."
मिनल मीराला घाई करत होती आणि मीरा मस्त आरामात तिची काकू आणि आईजवळ जेवायला बसलेली. तिघींच्या खूप गप्पा चालू होत्या.
"अरे हो हो, येतेच मी थोड्या वेळात. जेवणं झालेलेच आहे माझे. आई हे इतकं तू संपव ना!"
मीरा एकदम उठत बोलली. राहिलेलं आईला संपवायला सांगून हात धुवायला गेली.
"मीरा, अग हे इतकं संपव तरी. ही पोरगी पण ना! अजून तशीच आहे धांदरट. पानात वाढलेले गुलाबजाम तरी खाऊन घेईल की नाही."
आई निवेदिता काकूला बघत बोलली तशा त्या पण हसल्या.
"मिनू, ती तुझी मैत्रीण श्वेता."
मीरा वरती मिनलच्या रुममध्ये येऊन बोलत होती.
"हा तिचं येणार आहे, पण तिचं काय?"
मिनल तिला लागणारे मेकअपचे साहित्य वर काढून ठेवत होती.
"अग ती जास्त भडक मेकअप तर नाही करणार ना! मला नाही आवडत खरचं. याआधी मी कधी असा मेकअप केला नाही."
मीराला थोडा डाऊट येत होता.
मीराला थोडा डाऊट येत होता.
"अग ती छान मेकअप करते. माझ्या कितीतरी मैत्रिणी लग्नात तिच्याकडून मेकअप करून घेत होत्या."
मिनल मात्र तिचं मैत्रिणीच कौतुक करत होती.
"बरं तू म्हणतेस म्हणून मी तयार झाले, पण नाही आवडले मला तर मी पुसून टाकेन."
मीरा तिला आधीच सांगून ठेवत होती.
मीरा तिला आधीच सांगून ठेवत होती.
"ए, तसं काही करायचं नाही. ती खरचं खूप छान मेकअप करते. अग तिने पूर्ण कोर्स केलाय ॲडव्हांस ब्युटी पार्लरचा; त्यामुळे तू नको घाबरु. बिनधास्त रहा."
मिनल अगदी सहज बोलत होती.
"बघ हा मिनू, तुझ्या दादाला नाही आवडले तर?"
मीरा आता दादाचं नाव घेऊन बोलत होती; त्यामुळे मिनल पण घाबरली.
"अग दादाचं काय घेऊन बसलीस, त्याला काहीही केलेलं चालत नाही. तरीही मी सगळं करते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत नाक खुपसत असतो, पण मी माझी छान राहते. सगळी हौस पूर्ण करते. तू उगाच त्याला घाबरून नको राहू."
मिनल तिला सपोर्ट करत बोलत होती.
"अग पण तुझं एक ठीक आहे, पण माझं काय?"
मीरा थोडी लाजत बोलत होती. त्यावरून मिनल समजून गेली.
मीरा थोडी लाजत बोलत होती. त्यावरून मिनल समजून गेली.
"तू छानच दिसणार! दादा तुला काहीच बोलणार नाही.. आणि अग हे असे कार्यक्रम एकदाच होतात. सारखे सारखे नाही येत; त्यामुळे तुझी सगळी हौस झाली पाहिजे."
मिनल आता चांगल समजून सांगत होती आणि मीराला देखील ते पटत होते.
थोड्याच वेळात मिनलने आवरायला घेतले, कारण वेळेवर सगळे गर्दी करणार हे तिला आधीच माहिती होते. श्वेता पण अगदी वेळेवर पोहोचली होती. तिने लगेच मीराचे आवरायला घेतले. मीराने तिला आधीच सांगून ठेवले होते, की मेकअप खूप जास्त डार्क नको; त्यामुळे श्वेता समजून गेली.
श्वेताने तिचा मेकअप जास्तीत जास्त लाईट केला. तिच्या घागाऱ्याला मॅच होईल असाच आणि तिला ते सुट पण करत होते. घागरा अगदी लाईट पिस्ता शेडचा होता. त्यावर नाजुन नक्षीकाम आणि डायमंड वर्क केलेलं होतं. त्याप्रमाणे श्वेताने तिला गळ्यात घालायला नाजूक डायमंड नेकलेस सेट आणला होता. हातात चुडा असणार होता पण त्यापुढे काही डायमंड बांगड्या पण घातल्या. कपाळावर छोटीशी एक डायमंड टिकली लावली. केसांची झुबकेदार वेणी घालून त्यावर पण डायमंड पिना खोचल्या. संपूर्ण मेकअप झाल्यावर मीराला स्वतः ला आरशात बघायला सांगितले.
"खूपच छान.. छान दिसतेय मीरा."
मिनल तिच्या आधीच बोलली, तसे मीराने स्वतः ला आरशात पाहिले.
"बोला ना वहिनी, आवडला का तुम्हाला तुमचा मेकअप?"
श्वेता ती काय बोलते याकडे लक्ष ठेवून होती, पण मीरा स्वतः लाच आरशात बघण्यात गुंग होती.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा