नकळत सारे घडले - भाग ५३
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
"लग्नाच्या दिवशी नवरी मुलगी पळून गेली. मामाची मुलगी होती म्हणून बरं लग्न तरी झालं ह्याचं."
पुन्हा कोणीतरी तेच बोललं; त्यामुळे मल्हार आता खरचं चिडला होता. मितालीची आठवण आली तरी त्याला चीड येत होती आणि त्याहून जास्त वाईट वाटतं होते.
"मल्हार चल ना आपण आपले फोटो काढू?"
दुर्गेश त्याला फोटोसाठी घेऊन जात होता, पण मल्हार त्याच्यावरच चिडला.
"बास झालं आता, मला नाही काढायचे फोटो."
गणेशला समजून गेले, भाईचा मुड पुन्हा खराब झाला ते. त्याने दुर्गेशला हळूच शांत रहा म्हणून सांगितले.
गणेशला समजून गेले, भाईचा मुड पुन्हा खराब झाला ते. त्याने दुर्गेशला हळूच शांत रहा म्हणून सांगितले.
"अरे यार! कोण आहेत ह्या बायका? यांना कुठे काय बोलावं ते पण कळतं नाही का?"
गणेश तिथेच उभा राहून बोलत होता.
"अरे ह्यांना काय फक्त विषय पाहिजे असतो. ह्याचं त्याचं बोलत राहायचं स्वतः च्या घरात मात्र काय चाललं ते पण त्यांना कळतं नाही."
दुर्गेश त्याच्याकडे बघून बोलू लागला.
दुर्गेश त्याच्याकडे बघून बोलू लागला.
"अरे पण मग ज्यांच्या कार्यक्रमात आलाय तिथे तरी त्यांच्याच विषयी असं कसं बोलू शकतात हे? किमान घरी जाऊन तरी अशी गॉसिप करायची. इतकं पण कळू नये का ह्यांना?"
गणेश नुसता चिडत होता.
"हो ना, तितकं तरी कळायला पाहिजे होते. मल्हारचा मुड खराब करून टाकला. आता त्याला पुन्हा समजून सांगायला लागणार."
दुर्गेशला मल्हारची काळजी वाटतं होती म्हणून बोलत होता.
"तो काही लवकर नॉर्मल होणार नाही. बिचाऱ्या मीरा वहिनींना सांभाळून घ्यावे लागेल."
गणेश बोलला तसे मिनल तिथे आली.
"काय रे! काय झालं?"
मिनल आली तेव्हा दोघेही एकदम शांत झाले होते, पण तिला सर्व समजले. मल्हारच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. मीराला मात्र काहीच कळत नव्हते. ती मिनलकडे बघून काय झाले म्हणून खुणावत होती. तिला कोणी काहीही सांगायचं नाही असे ठरवले.
"कल्पना बाई, आजचा कार्यक्रम एकदम मस्तच झाला. नवरी पण छानच आहे. मीरा म्हणजे तुमच्या भावाचीच मुलगी ना ही!"
तिथे आलेले लांबचे नातेवाईक बोलत होते.
"हो हो, मीरा माझी भाचीच आहे. भावाची आहे तर दुसरी कशाला बघायची."
कल्पना ताई पण मुद्दाम त्यांच्यासमोर तोऱ्यात बोलल्या, कारण त्यांनाही समजले होते, की ह्या बायका उगाच जाणूनबुजून त्यांना विचारत होत्या.
सगळ्यांची जेवणं उरकले तसे सगळे पुन्हा गार्डन मध्ये जोडी जोडीने फोटो काढायला उभे राहिले. कल्पना ताई आणि विलासराव, तात्या आणि सुनिता बाई, निवेदिता काकू आणि नाना काका, सविता काकू आणि काक.. हे सगळे जण जोडी जोडीने छान छान फोटो काढत होते. चांगली मजा मस्ती चालू होती. सगळे एकमेकांना चिडवत बोलत होते. एकंदरीत सगळेच आनंदात होते. मल्हार शांत बसला होता, पण त्या सगळ्यांना असे एन्जॉय करताना बघून खूप छान वाटतं होते.
"चला आपला सगळ्यांचा एक ग्रुप फोटो होऊन जाऊ द्या."
नाना मामा बोलले तसे सगळे पुन्हा जोडीने उभे राहिले आणि फोटो काढले.
"थांबा तसेच आपण एक रील पण बनवूया."
मिनल लगेच फोन घेऊन आली.
"ए नको, काहीही नको."
कल्पना ताई तिला नको नको म्हणत होत्या.
"ताई, अहो काढुया ना! तसेही आपण पुन्हा कधी असे एन्जॉय करणार."
निवेदिता काकू बोलल्या तसे सगळे तयार झाले.
"सगळ्यांनी जोडी जोडीने माझ्या पुढे यायचं आणि बायकोचा हात धरून जवळ ओढायचं आणि हाय करून बाजूला जायचं."
मिनल सगळ्यांना कसे कॅमेरा पुढे यायचे ते सांगत होती.
"बरं, ठीक आहे. कल्पना ताई तुम्हीच दोघे पुढे उभे रहा. आम्ही मागून येतो."
सविता काकू बोलल्या तसे सगळे पुन्हा हसायला लागले.
सविता काकू बोलल्या तसे सगळे पुन्हा हसायला लागले.
"नको नको मला तर लाज वाटते बै, ही पोरगी काहीही करायला लावते."
कल्पना ताईंना खरचं लाज वाटत होती.
"ए मम्मी कर ना प्लीज! पप्पा तयार आहे मग तू का लाजतेय. चला, रेडी."
असे म्हणून मिनल फोन धरून उभी राहिली.
असे म्हणून मिनल फोन धरून उभी राहिली.
सगळे एक एक करून छान करत होते. शेवटी मीरा आणि मल्हारला उभे केले होते. मीरा मल्हारकडे बघत उभी होती, पण मल्हार फक्त कॅमेराकडे बघून हसला.
सगळे रील कशी झाली ते बघण्यात गुंग झाले होते. मस्त हम साथ साथ है गाणं लावलं आणि सगळ्यांना लगेच पाठवून पण दिले.
"अग कित्ती छान मिनू, खरचं मस्त काढला व्हिडिओ."
निवेदिता मामी आणि सविता काकू लगेच खुश झाल्या. सगळ्यांनी आपापल्या स्टेट्सला सुद्धा लावले. मीराने पण लगेच तिचे सगळे फोटो व्हिडिओ लावले.
"हीच मजा असते. सगळे एकत्र आले की किती छान वाटते. गप्पा होतात, मस्करी होते. अशा निमित्तानेच तर आपण एकत्र येतो. खूपच छान झाले रिसेप्शन, आपले नवरा नवरी पण सुंदर दिसत होते. आता घरी जाऊन दोघांची नजर काढायला लागेल."
सविता काकू सगळ्यांसोबत बोलत होत्या.
"हो खरंच, छान झाला आजचा कार्यक्रम आणि जेवण पण मस्तच होते."
नाना मामा पण बोलले.
छान मजा मस्ती करून, जेवण करून पुन्हा सगळे घरी जायला निघाले होते.
नाना मामा पण बोलले.
छान मजा मस्ती करून, जेवण करून पुन्हा सगळे घरी जायला निघाले होते.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा