नकळत सारे घडले - भाग ५५
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मिनलने मीराला मुद्दाम खाली पाठवले होते, कारण त्यांची रूम सजवायची होती. हे मीरा आणि मल्हार दोघांना पण माहिती नव्हते. मिनल सर्व एकटीने करत होती. सगळ्यात आधी बेडवर नवीन बेडशीट अंथरली.
कार्यालयातून येताना तिथून फुलांचे हार सोबत आणले होते. त्यातलेच फुलं तोडून तिने बेडवर पाकळ्या करून हार्ट शेप काढला. आजूबाजूला सुवासिक मेणबत्त्या लावून ठेवल्या. भिंतीवर गुलाबाचे फुल चिटकवून सजवले. जास्त काही सजवले नाही, कारण मल्हारला हे सगळं आवडणार नाही हे तिला चांगलच माहिती होतं, पण मीरा.. तिला तर नक्कीच आवडणार याची खात्री होती; त्यामुळे मिनल होईल तितकी तयारी करत होती.
दोघांचे लग्नातले काही निवडक फोटो प्रिंट करून आणले होते ते तिने नवीन आलेल्या फोटो फ्रेममध्ये लावले आणि बरोबर बेडच्या वरच्या भिंतीवर टांगले.
इकडे मीरा साडी नेसून खाली जात होती. आई, काकू, आजी, आत्त्या सगळे खाली झोपले होते. मीरा हळूच खाली गेली. सविता काकू आणि निवेदिता काकूचा बोलण्याचा आवाज येत होता.
"काकू, आत्ता इतक्या रात्री कोणती पूजा आहे?"
मीरा खाली येऊन त्या दोघांकडे बघून बोलू लागली.
"पूजा? तुला कोणी सांगितलं."
सविता काकू तिला उलट प्रश्न करीत होत्या.
"तुम्हीच तर सांगितले, की पूजा आहे म्हणून छान साडी नेसून तयार व्हायला."
मीरा बिचारीला काही कळत नव्हते.
"अग हो हो, मी येतच होते तुला सांगायला. ते.. तुमची पूजा वरतीच होणार आहे. इथे खाली काही नाही."
निवेदिता काकू तोंडाला हात लावून हसत बोलत होत्या. त्या उगाच तिची चेष्टा करत बोलत होत्या.
"काकू! नीट सांग ना काय ते."
मीरा आता दमलेली होती, म्हणून तिला कधी एकदाचे झोपू असे झाले होते.
"अग वेडाबाई, हे घे. आजपासून तू मल्हारच्या म्हणजे तुमच्या बेडरूम मध्ये झोपायला जातेय."
सविता काकू तिच्या हातात गरम दुधाचे दोन ग्लास देत बोलत होत्या. ते बघून मीराला एकदम धडकीच भरली. तिची अवस्था कळत होती निवेदिता काकूला; म्हणून त्यांनी तिला जवळ घेत सांगितले.
"मीरा, अजिबात घाबरु नको. हा क्षण आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण असतो. दोघेही एकमेकांना जाणून घ्या. छान गप्पा मारा. बोलून मोकळे व्हा. हळुहळू फुलत जाणारे प्रेम कधी घट्ट नात्यात बदलते हे कळतं पण नाही. मल्हारला तर तू आधीपासूनच ओळखते, पण त्याला पूर्णपणे जाणून घेण्यासाठी त्याच्या मनात डोकावून पाहावे लागेल. नवरा बायकोच्या नात्याची ही पहिली पायरी आहे."
निवेदिता काकू तिला समजून सांगत होत्या. तिची अवस्था त्यांना चांगलीच समजत होती.
"चला आता, मी येऊ का तुला सोडायला वरती."
सविता काकू बोलल्या तशा निवेदिता काकू त्यांना हसून नको म्हणाल्या.
"आपण कशाला उगाच कबाब मे हड्डी."
निवेदिता काकू बोलल्या तशी मीरा लाजली.
"अग्गोबाई, किती गोड लाजतेय."
सविता काकूंनी तिला जवळ घेतले.
"हे घे, हा दुधाचा ट्रे घेऊन जा. गरम आहे तोवर पिऊन घ्या."
सविता काकूंनी तिच्या हातात ट्रे दिला. ती हळूहळू वरती येत होती.
"किती वेळ, जा आता रुममध्ये."
वरती आल्यावर मिनल दारात उभी होती.
"अच्छा, म्हणजे हे तुझे कारस्थान आहे तर!"
मीरा तिला बघून हसून बोलत होती.
मीरा तिला बघून हसून बोलत होती.
"मग काय? जा आता लवकर मी दादाला पाठवते लगेच."
मिनल तिला रुममध्ये अक्षरशः बेडरूम मध्ये ढकलत होती.
"मीरा, ऑल द बेस्ट."
मिनल मुद्दाम तिला चिडवत बोलत होती.
इकडे गणेश आणि दुर्गेशला मिनलने मेसेज पाठवला. मिशन कंप्लीट.. असा मेसेज बघून ते दोघे मल्हारला खाली घेऊन आले.
"चला आता खाली, झोप लागली मला तर!"
दुर्गेश मुद्दाम आळस देत बोलत होता.
"अरे ईतका वेळ तुला गप्पा मारायच्या होत्या आणि लगेच झोप कशी आली बरं!"
मल्हार त्याला बारीक डोळे करून बोलत होता.
"चल ना भाई खाली, तसा पण खूप वेळ झाला आहे. तू पण दमला असणार ना!"
गणेश बोलला तेव्हा मल्हार खाली यायला तयार झाला.
गणेश आणि दुर्गेश मल्हारला सोडून खाली जात होते. त्यांना आजपासून खाली झोपायला लागणार होते. याचे त्यांना खूप वाईट वाटतं होते.
"भाई, मल्हारची रूम आता आपली राहिली नाही."
दुर्गेश तोंड पाडून बोलत होता.
दुर्गेश तोंड पाडून बोलत होता.
"हो ना, आपण कधीही येऊन इथे खायचो झोपायचो लोळायचो.. ते सगळं बंद होईल."
असे म्हणून दोघेही गाणं म्हणू लागले.
"दोस्त दोस्त ना राहा, प्यार प्यार ना रहा.. जिंदगी हमे तेरा एतबार ना रहा."
दोघेही एकमेकांकडे बघून गाणं म्हणत खाली उतरत होते.
असे म्हणून दोघेही गाणं म्हणू लागले.
"दोस्त दोस्त ना राहा, प्यार प्यार ना रहा.. जिंदगी हमे तेरा एतबार ना रहा."
दोघेही एकमेकांकडे बघून गाणं म्हणत खाली उतरत होते.
"ए नौटंकी, तुम्ही इतक्या रात्री कुठे निघालात? चला रुममध्ये झोपायला. उद्या जा तुमच्या घरी."
मल्हारला वाटले ते दोघे निघाले आता त्यांच्या घरी.
मल्हारला वाटले ते दोघे निघाले आता त्यांच्या घरी.
"नाही भाई, अब वो हमारी बेडरूम नहीं रही."
दुर्गेश अजूनही फिल्मी बोलत होता, पण मल्हारला त्याचे काही कळतं नव्हते.
"अरे चला झोपायला. खाली कुठे निघालात."
मल्हार अजूनही त्यांना बोलवत होता.
"दादा, तू जाऊन झोप तुझ्या बेडरूममध्ये.. ते दोघे खाली झोपतील."
मिनल बाहेर येऊन बोलली तसे मल्हारला थोडी शंका आली.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा