नकळत सारे घडले - भाग ५७
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मल्हार उशी घेऊन मीराकडे पाठ करून झोपला होता, पण मीरा अजूनही उभीच होती. तिला काहीच कळतं नव्हते नेमके आता काय झाले? ती फक्त त्याला बघत उभी होती.
खरंतर आज त्यांची पहिली रात्र, पण मल्हार बेडरूममध्ये येताच तिच्याशी थोडं बोलून झोपी गेला. तिला वाटतं होते तो बोलेल तिच्याशी, तिला जवळ घेईल, पण यातले काहीच झाले नाही. तिच्या मनातली भीती अजूनही गेलेली नव्हती. मनातल्या मनात विचार करत ती तशीच उभी होती. मल्हारने पडल्या पडल्या हळूच वळून पाहिले, तर मीरा अजूनही ऊभी होती.
"मीरा, काय झाले? काही प्रोब्लेम आहे का?"
मल्हार तिला बघून विचारत होता.
"नाही, काही नाही. झोपा तुम्ही."
मीरा लगेच इकडे तिकडे बघत बोलली.
"तुला पाहिजे तर तू एकटी झोप इथे वरती, मी खाली अंथरूण टाकून झोपतो."
त्याला वाटले ती त्याच्यामुळे झोपत नसावी वरती म्हणून तो असा बोलला.
"नाही नाही.. नको. मी झोपन इकडच्या बाजूने."
असे म्हणून मीरा पटकन बेडवर बसली.
"पाहिजे तर तू फ्रेश होऊन ये आणि नाईट ड्रेस घालून आलीस तरी चालेल."
मल्हारला माहिती होत्या तिच्या ह्या सवयी; त्यामुळे तो तिला होईल तितकं नॉर्मल करत बोलत होता.
"हो, मी येते चेंज करून. तुम्ही झोपा."
मीरा उठून निघून गेली.
मल्हार तिला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होता, पण तरीही तिला अवघडल्या सारखे वाटतं होते. तिला वाटतं होते, की हा आधीपासूनच अभ्यासू होता त्यामूळे जास्त बोलतं नसावा, पण सगळ्यांमध्ये असला की कायम असं काही बोलायचा की सगळे त्याचे ऐकत राहायचे. कोणत्याही विषयावर बोलणे असो, मल्हार कायम अभ्यासक बोलायचा. त्याला सगळ्याच विषयाचे ज्ञान होते.
मीरा कपडे बदलून करून आली. मल्हार बहुतेक झोपी गेला असावा, कारण त्याची काहीच हालचाल तिला दिसत नव्हती. ती बिचारी किती विचार करत होती. पहिली रात्र म्हणजे तो पहिला स्पर्श, ती जवळीक, ओठांचे थरथरणे, एकमेकांची ओढ, श्वासांची वाढती गती.. हे अगदी सगळेच तिला अपेक्षित नसले तरी काही प्रमाणात का होईना तिला वाटले होते की मल्हार तिच्या जवळ बसून किमान गप्पा तरी मारणार, पण इथे मल्हार लगेच झोपी गेला होता.
मीरा तशीच बेडवर उशाला पाठ टेकवून बसलेली होती. पूर्ण रुममध्ये नजर फिरवली तरी तिला सगळीकडे तेच दिसत होते. ती आणि मल्हार. दोघेही एकमेकांमध्ये गुंग, पण हे स्वप्न होते. ती मनातच हे स्वप्न रंगवत तशीच डुलक्या घेत होती.
इकडे मल्हार पण डोळे मिटून शांत पडून होता. त्याच्या कानात तेच तेच वाजत होते. त्याने तो जास्तच अस्वस्थ होतं होता. त्याला काय करावं तेच कळत नव्हते आणि म्हणूनच तो जास्त काही न बोलता लगेच झोपी गेला, पण खरंतर त्याने मीराकडे पाठ फिरवली होती. तिला वाईट वाटणार याची त्याला जरा सुद्धा कल्पना नव्हती, नाहीतर तो असा कधी वागलाच नसता.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा