नकळत सारे घडले - भाग ६४
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मीरा आणि मल्हारच्या लग्नाला दोन आठवडे होऊन गेले. सगळे अगदी सुरळीत सुरू होते. मल्हार नेहमीप्रमाणेच ऑफिसला पण जायला लागला होता. मीरा घरातले सगळे कामं आवरून घेत होती; त्यामुळे कल्पना ताईंना आता आराम मिळत होता. कधी कधी तर मिनल आणि मीरा दोघी मिळून छान स्वयंपाक सुद्धा करायच्या. घरातले वातावरण मीरा आल्यामुळे खूप आनंदात होते. सगळे कसे अगदी स्वप्नवत वाटतं होते.
'बरं झालं, माझ्या मनात होते तेच झाले. मीरा मला आधीपासूनच आवडत होती, पण बोलणार कसे म्हणून तात्याला काही विचारलेच नव्हते. मिताली पण तशी चांगली होती, पण तिच्या मनात काय चालले होते देवच जाणे. बरं झालं लग्न व्हायच्या आधी तिचे रुप आधीच समजले, नाहीतर लग्नानंतर उगाच आम्हाला त्रास झाला असता. पण मल्हार तिच्यात अजूनही अडकला आहे. त्यातून त्याला बाहेर यायला थोडा वेळ तर लागणारच, पण मीरा खूपच समजूतदार आहे. चेहऱ्यावर किती गोड हसू ठेवून असते. तिच्याही काही अपेक्षा असतीलच म्हणा, पण होईल सगळे ठीक. बस थोडा आणखी वेळ द्यावा जाऊ लागेल.'
कल्पना ताई मनातल्या मनात विचार करत होत्या. त्यांना मीरा सून म्हणून मनापासून आवडली होती. जेव्हा भर मांडवात लग्न मोडले तेव्हा माहेरचेच साथ द्यायला पहिले उभे असतात हा चांगलाच अनुभव आला होता; त्यामुळे कल्पना ताई मीराला खूप जीव लावत होत्या. सून कमी आणि मुलीसारखे जपत होत्या. तिच्या आवडीनिवडी नुसार सगळे चालू होते.
खरंतर मीराच्या जास्त काही अपेक्षा नव्हत्याच. सगळ्या मुलींचे लग्न झाल्यावर हेच असते. नवऱ्याने आपल्याला वेळ द्यावा, छान गप्पा माराव्यात, एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घ्याव्या, कधीतरी बाहेर फिरायला घेऊन जावे. हे सगळं ठीक आहे, पण इथे तर नीट बोलणेही होत नव्हते, मग बाकीचे तर लांबच. तरीही मीरा खूप संयम ठेवून होती. तिला खूप बोलावेसे वाटतं होते, पण मनातून भीतीही वाटायची.
मल्हार तसा खूप चांगला होता, पण माणसांच्या मनातले दडून ठेवलेले गुपित लगेच समजत नाही. मनातले ओठावर यायला वेळ लागतो. त्याला वाटतं होते मीराचे लग्न त्याच्याशी बळजबरीने लावले गेले आणि त्यामुळेच तो थोड अंतर ठेवून राहायचा, पण मुली कशा पटकन रुळतात. तिच्या मनातले भाव समजायला मल्हार तिच्याकडे आधी बघायला तर पाहिजे. मीरा त्याच्या प्रेमात आहे, हे त्याला लवकर कधी कळलेच नाही. ती त्याच्यासाठी रोज त्याच्या आवडीचा पदार्थ बनवायची, तरीही त्याला त्यामागचा हेतू समजत नव्हता, पण मीराने प्रयत्न चालूच ठेवले होते.
"चला आज काय बनवायचं?"
मिनू खाली किचनमध्ये येऊन मीराला विचारत होती.
"तू सांग काय खाणार? तुला काय आवडतं ते बनवूया आपण."
मीरा तिच्याकडे बघून फ्रिजमधल्या भाज्या बघत होती.
"भाजीला काय आहे फ्रिजमध्ये?"
मिनूने विचारले तसे मीराने फ्रिज मधून भोपळा बाहेर काढला.
"याक! भोपळा नको."
भोपळा बघून मिनू वाकडं तोंड करू लागली.
भोपळा बघून मिनू वाकडं तोंड करू लागली.
"मग काय करायचं? दुसऱ्या भाज्याच नाहीत. वांगी आहेत पण कालच तर भरली वांगी खाल्ली आपण."
मीरा एक एक करून बोलत होती.
"ए काय यार! मला काही समजत नाहीये. तुम्ही हिरव्या भाज्या का आणल्या नाहीत."
मिनू असे म्हणत आईकडे बघू लागली.
"मग काय? तुला आवडतात तर घेऊन यायच्या ना घरी येता येता."
आईने पण तिलाच बोलली.
"आता मी नाही जाणार, मीरा आणि मल्हार जातील."
असे म्हणून मिनू तिच्याकडे बघू लागली.
"मी.. नको ग बाई. सकाळी दारावर भाजीवाला येतो त्याच्याकडून घेऊ उद्या."
मीराने साफ नकार दिला.
"अग संध्याकाळी बाजारात मस्त ताज्या ताज्या भाज्या मिळतात, पण कोणी जात नाही. मलाच जावं लागतं नेहमी."
आई मीराकडे बघून बोलत होती.
"बरं ठीक आहे. आता आपण जात जाऊ दोघी जणी मिळून."
मीरा एकदम उत्साहात बोलून गेली.
"लांब आहे ग बाजार, गाडीवर घेऊन जातात मला हे नाहीतर कधी कधी मल्हार सोबत येतो."
आई संध्याकाळचा दिवा लावत बोलत होत्या.
"अग मग आता जातील ना मीरा आणि मल्हार. तू कशाला काळजी करते. दादाला सांग फक्त तू. किती दिवस झाले तो कुठे गेलाच नाही मीराला घेऊन."
मिनू मीराला इशारे करत बोलत होती.
"बरं ठीक आहे."
असे म्हणून आईंनी मल्हारला खाली बोलवून घेतले. बाजारात भाजीला जा म्हणून सांगितले. आता आईने सांगितले म्हंटल्यावर त्याला नाही म्हणता आले नाही. त्यात मीराला सोबत घेऊन जायचे होते.
"मीरा, मस्त फिरून या. लवकर घरी यायची घाई अजिबात करू नको. आरामात या. मी आणि आई करते तोपर्यंत स्वयंपाक."
मिनू मीराला डोळा मारत बोलली.
"मिनू, काहीही तुझं आपलं."
मीरा लाजतच बोलत होती. तिला आईने आतल्या खोलीतून कापडी पिशव्या आणून दिल्या.
मीरा लाजतच बोलत होती. तिला आईने आतल्या खोलीतून कापडी पिशव्या आणून दिल्या.
"मल्हार, नीट हळू गाडी चालव."
आई त्याला सांगत होती.
लग्नानंतर दोघेही पहिल्यांदा बाहेर जाणार होते आणि ते सुद्धा भाजीला. ऐकून हसू येईल, पण योग आला आणि तो सोडायला नको म्हणून मिनूनेच मुद्दाम चांस सोडला नाही.
मल्हार बाईकवर बाहेर उभा होता. मीरा पहिल्यांदा त्याच्या बाईकवर बसणार होती. ती इतकी नाजुक होती, की बसली तरीही मल्हारला जाणवले नाही.
"चला.."
असे बोलल्यावर मल्हारने मागे वळून पाहिले तेव्हा गाडी सुरू केली.
असे बोलल्यावर मल्हारने मागे वळून पाहिले तेव्हा गाडी सुरू केली.
गेटमधून बाहेर पडताच गाडीचा वेग वाढला. गावात जाताच गर्दी दिसली. ब्रेक मारल्यावर मीरा अगदी त्याच्या अंगावर खेटून जायची. एका ठिकाणी तर खड्डा होता, तेव्हापासून मीराने त्याच्या खांद्याला घट्ट पकडून ठेवले होते. तिचा स्पर्श होताच मल्हारला एकदम शहारल्या सारखे झाले होते.
गाडी थांबताच मीराने भराभर भाज्या घेतल्या. मिनूला सगळ्या पालेभाज्या आवडतात; म्हणून पहिले त्याच घेतल्या. बाकी मल्हारला काय आवडते ते तिला माहितीच होते; त्यामुळे तिने ते सुद्धा लक्षात ठेवून सगळे घेतले.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा