Login

नकळत सारे घडले - भाग ६७

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ६७


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मीराला घ्यायला तिचे आई वडील संध्याकाळी लवकरच आले होते. ते आल्यापासून ती सुद्धा त्यांच्यासाठी बरेच काय काय बनवत होती. आल्या आल्या चहा नाश्ता झाला. त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली. मिनल होतीच म्हणा तिच्या मदतीला तरीही मीरा एकदम तरबेज होती. तिला अजिबात वेळ लागत नव्हता काही करायला.


बाहेर चौघे पाच जण मस्त गप्पा मारत बसलेले. इकडच्या तिकडच्या गावातल्या गप्पा चालूच होत्या. मल्हार अधून मधून आतमध्ये बघत होता. त्याला भूक लागली होती, पण अजून मीराचे झाले नव्हते. तो शेवटी किचनमध्ये आला आणि ओट्याजवळ उभ राहून बघत होता काय चालू आहे ते. मीरा भजी बनवत होती. त्याच्या खमंग वासाने भूक आणखी चाळवळी. पटकन एक भजा उचलून त्याने तोंडात टाकला, पण तो इतका गरम होता की त्याचे तोंड भाजले.


"थांबा ना झालेच आहे माझे. आता लगेच वाढणारच होते मी. मला माहितीय भूक लागली असणार तुम्हाला."
मीरा पटकन असे म्हणून त्याला पाण्याचा ग्लास पुढे करत बोलत होती आणि मल्हार तिच्याकडे बघतच होता.


"तुला कसे माहिती मला भूक लागली ते?"
मल्हारने विचारले तेव्हा तिने पटकन जीभ चावली.


"ते तुम्ही सारखे इकडे वाकून बघत होता ना म्हणून."
मीराने सांगितले तसे त्यालाही हसू आले. म्हणजे मीराला आता समजायला लागले होते.


"दादा, अरे किती घाई झाली तुला."
मिनू मुद्दाम त्याला चिडवत बोलली.


"बरं बरं, झालं असेल तर वाढता का? मला ऑफिसचे जरा काम आहे."
इतके म्हणून मिनूच्या डोक्यात टपली मारत तो बाहेर निघून गेला.


"आई, आत्या.. झालंय माझं. घेऊ का जेवायला."
मीराने सगळ्यांना आवाज देऊन बोलवले.


"अग बाहेरच घेऊन येतेस का? टिव्ही बघत बघत जेवणं होतील."
आत्या बोलली तसे मिनू आणि मीरा दोघींनी सगळा पसारा बाहेर आणला.


वरण भात, बटाट्याच्या काचऱ्या, गरमागरम फुलके, मटकीची उसळ आणि गोडाचा शिरा. अगदी साधा पण मस्तच बेत बनवला होता मीराने. सगळ्यांना ताट वाढले आणि जेवायला सुरुवात झाली.

हा सगळा मेन्यू तर मल्हारच्या आवडीचा होता. आवडीचे जेवण म्हणून तो अगदी शांतपणे जेवण करत होता. बाकीचे सगळे गप्पा मारत होते.
मीरा त्याला वाढतच होती.


जेवणं उरकली तसे मीरा पटकन किचनमधले आवरून ठेवत होती. तिचे हात एकदम भराभर चालत होते.

"मीरा अग राहू दे, तू जा आवर तुझे. तुम्हाला निघायचे आहे ना आता. इथले हे बाकीचे मी बघते."
असे म्हणून मिनलने तिला पाठवून दिले.


"आई, मी आलेच वरतून."
मीरा वरती तिची बॅग घ्यायला गेली. मल्हार सुद्धा वरतीच होता.


मीरा वरती येताच तिच्या ठेवलेल्या तशाच घेऊन जात होती. तिला मल्हारने पाहिले.

"थांब, मी उचलून नेतो खाली."
मीराला जड बॅग ओढून नेताना पाहिले तेव्हा मल्हार स्वतः उठला.


"पुन्हा इतकी मोठी बॅग घेऊन जायची काय गरज?"
मल्हार असे म्हणताच मीराने त्याच्याकडे पाहिले.

"ते.. मी ह्याच दोन बॅग घेऊन आले होते."
मीरा असे बोलताच त्याने त्याची एक छोटी बॅग काढून दिली.


"यात बसेल का तुझे सामान? नाहीतर आणखी एक बॅग आहे. वरतून काढावी लागेल."
असे म्हणून मल्हार खुर्ची घेऊ लागला.


"यात मावतील माझे कपडे. हीच ठीक आहे."
असे म्हणून मीरा पुन्हा तिचे सामान इकडून तिकडे भरत होती. समान भरून झाले आणि ती खाली जायला निघाली.


"येते मी."
असे म्हणून ती जातच होती मी मल्हारने तिची बॅग उचलली आणि तो तिच्यासोबत खाली येऊ लागला. त्याला बघून तिला वाटले की हळूहळू का होईना बदल होतोय.


"मीरा, चल लवकर."
कल्पना ताई पण आवाज देत होत्या.


"हो आले आत्त्या."
असे म्हणून तिने सगळ्यांच्या पाया पडल्या आणि हळदीकुंकू लावले.


"लवकर पाठवा आमच्या सुनेला, नाहीतर करमणार नाही आम्हाला तिच्याशिवाय."
कल्पना ताई बोलल्या तसे सुनिता बाई हसायला लागल्या.


"हो हो लवकरच पाठवू, फक्त तुम्ही लवकर घ्यायला या."
इतके म्हणून सुनिता बाई गाडीत बसल्या.


"नीट जा हळूहळू, गावी गेले की फोन करा."
कल्पना ताईंचे बोलणे काही संपतच नव्हते.

"हो हो, नक्की."
इतके बोलून गाडी सुरू केली.

मीरा गाडीत बसून सगळ्यांकडे बघून हसून त्यांना बाय करत होती. मल्हार मागे उभा होता. तिची नजर त्यालाच शोधत होती. तो दिसला आणि त्यालाही तिने हसून बाय केले. त्यानेही तिला बाय केले आणि वरती निघून गेला त्याच्या कामाला.


मीरा माहेरी गेली. ती होती तरी त्याला फारसा फरक पडत नव्हता, पण आता त्याला अगदी थोड्याच दिवसात तिची सवय झाली होती. रात्री दोघेही एकमेकांना पाठ करून झोपत असले, तरीही ती काही ना काही बोलत असायची. मल्हार बेडरूममध्ये येताच तिला आठवत बसलेला. तिची रिकामी केलेली बॅग कोपऱ्यात लावून ठेवली.
 



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.