नकळत सारे घडले - भाग ६८
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मीरा माहेरी गेल्यापासून मल्हारचे आधीसारखे सुरू होते. कपडे इकडे तिकडे पडलेले, फाईल्स टेबलवर तशाच पडलेल्या. इस्त्रीचे कपडे नीट हँगरला लावले नव्हते. 'मीरा असती तर नीट लवले असते असते.' असे म्हणतच तो आवरत होता. तिला जाऊन दोन दिवस झाले होते तरीही त्याला तिची कमी जाणवत होती. म्हणूनच त्याने आज गणेश आणि दुर्गेशला फोन करून बोलवून घ्यायचे ठरवले.
"गण्या, आज संध्याकाळी या दोघे पण घरी."
मल्हार फोनवरच सांगितले.
"नको भाई, तू आल्यावर लगेच जा म्हणून घालवून देतो आम्हाला. लग्न झाल्यापासून बदलला भाई तू."
गणेश त्याला मुद्दाम बोलत होता.
"अरे काहीही काय! गपचुप यायचं."
मल्हार त्यांना दोघांना धमकी देतच बोलत होता.
"हा आणि मीरा वहिनी."
दुर्गेश बोललाच.
"ती परवाच माहेरी गेलीय."
मल्हारला तिची आत्ता आठवण आली.
"अच्छा म्हणूनच आमची आठवण आली वाटतं."
गणेश जरा जोर देऊनच बोलला.
"तुम्ही येणार आहे की नाही तेवढं सांगा फक्त, नाहीतर मला खूप कामं आहेत."
मल्हार असे म्हणताच दोघेही हा हा म्हणत हसू लागले.
ठरवल्याप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधूनच तिघेही घरी एकत्र आले. आल्या आल्या आईने त्यांना चहा नाश्ता दिला. मस्त गप्पा झाल्या जेवण झाले तसे तिघे गच्चीवर शतपावली करायला म्हणून गेले.
"मल्हार, मीरा वहिनी कधी येणार आहेत?"
गणेशने प्रश्न विचारला तसे त्याने तोंड फिरवले.
"काही माहिती नाही! येईल आठवडाभरात."
असे म्हणून तो टाळत होता.
"अरे, तू विचारले नाही का त्यांना? फोन तरी केलास का?"
गणेश त्याला हात करून विचारत होता.
"नाही.. आईला सांगून गेली असेल."
इतके बोलून मल्हार खाली बघत होता.
इतके बोलून मल्हार खाली बघत होता.
"अरे बायको आहे तुझी, तुला इतके तर माहितीच पाहिजे.. आणि फोन केला नाही म्हणजे काय? म्हणजे तू अजूनही बोलत नाही त्यांच्याशी."
गणेश एकदा सुरू झाला की थांबत नाही हे त्याला माहिती होते.
"बोलतो ना! पण अजून फोन नाही केला कधी."
मल्हार असे बोलत होता जसे काही मोठ्ठं काम करत असावा.
"अरे तुला कळतय का? लग्न झालंय तुमचं! आणि अजूनही तू बायकोला फोन सुद्धा करत नाही. किमान पोहोचल्यानंतर तरी फोन केला असेल ना!"
गणेश त्याच्याकडे बघून बोलत होता.
"नाही केला! आईने सांगितले ती पोहोचल्याचे."
मल्हार तोंड लपवत बोलत होता.
"अरे कमाल आहे तुझी. नक्की नवरा बायकोचं आहात ना दोघे."
गणेश आता जरा जास्तच बोलत होता.
"तू हेच विचारायला आलाय का?"
मल्हार आता चिडला होता हे त्याला कळत होते.
"अरे लग्नाला महिना होईल थोड्या दिवसांनी आणि तुझं अजूनही तेच सुरू आहे का? अजून किती वेळ घेणार आहेस? मीराला बिचारीला काय वाटतं असेल?"
गणेश काळजीत विचारत होता.
"तिला पण पहिल्या रात्रीच सांगितले होते मी, आपण वेळ देऊया एकमेकांना म्हणून. तेव्हापासून ती सुद्धा जास्त बोलत नाही."
मल्हारने त्याला सगळे सांगून दिले.
"काय? अरे काय म्हणावं तुझ्या या वागण्याला. असा कसा काय वागू शकतोस तू? तुझ्या मनात आहे तरी काय नेमकं ते तरी कळू दे आम्हाला!"
गणेशने हे ऐकून डोक्यालाच हात लावून घेतला होता.
"काही नाही, माझ्या मनात आधीपासूनच काही नव्हते."
मल्हार उगाच इकडे तिकडे बोलत होता.
"मिताली.. अजूनही तू तिचाच विचार करत असणार ना! अरे गेली ती पळून आता तरी समजून घे."
गणेश बोलत होता.
"हो मल्हार, त्या पोरीचा विषय इथेच संपला पाहिजे आता. तिचं नाव देखील आलं नाही पाहिजे तुझ्या ओठावर. इतकं सगळं घडून गेलं आणि तरीही तू अजून तिचाच विचार करत बसला आहेस! अरे ती गेली पळून तुला सोडून, आता तरी डोळे उघडले पाहिजे तुझे! ती मुद्दाम तुझ्यासोबत नाटकं करत होती. तुला फसवले तिने आणि तू हे अजूनही मान्य करायला तयार होत नाही म्हणजे काय म्हणावे."
दुर्गेश पण आता चांगल बोलत होता.
"तिला मला सोडून जायचच होतं तर मग इतके दिवस माझ्यासोबत चांगली का वागली? प्रेमाचं खोटं नाटकं का केलं?"
मल्हारला टेन्शन आलेले दिसत होते.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा