Login

नकळत सारे घडले - भाग ७१

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ७१


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026



मल्हार मीराचा विचार करतच बेडवर झोपला होता. बाजूला गणेश आणि दुर्गेश दोघेही घोरत पडले होते. दोघांनी खूप समजावले त्याला, तेव्हा कुठे त्याच्या डोक्यातून मितालीचा विचार बाजूला झाला होता. खरं तर त्याला त्याच्यातच काही कमी असेल! असे सारखे वाटतं होते आणि म्हणून ती पळून गेली असणार, पण खरे कारण काही वेगळेच होते हे वारंवार त्या दोघांनी समजावले तेव्हा कुठे मल्हार भानावर आला.

मीराचा विचार करतच व्हॉट्स ॲपवर तिचा फोटो पाहिला. तिने लग्नातला फोटो लावलेला होता. तो कितीतरी वेळा मल्हार झूम करून करून बघत होता. छानच आला होता तो फोटो. त्यानंतर लग्नातले बरेच फोटो होते त्याच्या फोनमध्ये, पण त्याने ते कधी पाहिलेच नव्हते. आता ते सुद्धा तो एक एक करून अगदी लक्ष पूर्वक बघत होता. प्रत्येक फोटोमध्ये मीरा जास्तच सुंदर दिसत होती. त्यावेळी तिला नीट पाहिले देखील नव्हते मल्हारने, पण आता तो प्रत्येक फोटो अगदी निरखून बघत होता.
'मीरा प्रत्येक फोटोत किती साधी, पण तितकीच सुंदर दिसत होती.  त्यावेळी तिच्याकडे खूप दुर्लक्ष केलं आपण, पण आता नाही.'
असे म्हणत मल्हार फोनमध्येच तिच्याशी बोलत होता.


"हम्म्म, झोपा रे. कशाला गप्पा मारत बसले तुम्ही. राहिलेलं आता सकाळी उठून बोलू."
मल्हारचा आवाज ऐकून दुर्गेश झोपेतच बोलत होता.


सकाळी लवकरच मल्हारला जाग आली. त्याचं आवरून तो खाली गेला. चहा घेतला आणि पुन्हा वरती दोघांना उठवायला आला.

"उठा, दहा वाजून गेले. आई चहा नाश्ता देणार नाही."
मल्हार बोलला तसे दोघेही उठून बसले.


"काय? आई चहा नाश्ता देणार नाही म्हणे उशिरा!"
दुर्गेश उठला तसा खाली जात होता.


"ए! अरे आंघोळ नाही पण किमान तोंड तर धुवून जा खाली."
मल्हार डोक्याला हात लावून बोलत होता.


"हम्म्म, वाटलच मला. वहिनी माहेरी गेली की तुम्ही आलेच पाहिजे ना!"
मिनल दोघांना खाली बघून बोलली.


"मग काय! मित्र म्हणजे जीव की प्राण असतात. हो की नाही रे मल्हार!"
दुर्गेश बोलला तसे मल्हारने नाही म्हणून मान डोलावली.


"बरोबर, तुझ्यासारखे मित्र आल्यावर तर.."
मिनल उगाच चेष्टा करत बोलत होती.


"हा, पण आता तुमची वहिनी नाहीये म्हणून. नाहीतर आता त्याची बेडरूम आता त्याची एकट्याची राहिली नाही. तिथे वहिनी पण आहे. त्यामुळे तुमचा पत्ता कट."
आई पण बोलत बोलत चहा नाश्ता घेऊन आल्या.


"हो ना, आम्ही आलो तरी खाली झोपावं लागेल आता."
गणेश तोंडात पोहे कोंबत बोलला.


"हळू खा! अजून भरपूर केलेत आईने पोहे."
मिनल बोलली तसे दोघांना आनंद झाला.


मस्त भरपेट चहा नाश्ता झाल्यावर दोघेही पुन्हा वरती आले. आल्या बरोबर पुन्हा बेडवर लोळत पडले.

"दूर्ग्या, तिकडे नको इकडे लोळ. तिकडे मल्हारची आवडती जागा आहे. उगाच चिडायचा तुझ्यावर."
असे म्हणून गणेश त्याची मजा घेत होता.


"बरं तुझा तो मित्र सांगणार होता आपल्याला. त्याला फोन लावून बघतो का?"
मल्हार लगेच त्याच्याकडे बघत बोलला. 

"इतक्या सकाळी सकाळी!"
दुर्गेश दोघांना बघून बोलला.


"दुपारचे बारा बाजलेत, म्हणे इतक्या सकाळी सकाळी. लाव फोन!"
असे म्हणून गणेश त्याला बोलू लागला.


"हा हॅलो, काय झालं का आपलं काम?"
फोन लावताच बोलायला सुरुवात झाली. गणेश आणि मल्हार पण दुर्गेश जवळ कान लावून बसलेले.

त्या गावातल्या मित्राने बरेच काही सांगितले. नवीन माहिती मिळाली. ते ऐकताच तिघेही शॉक झाले.


"तिच्या घरच्यांना आधीच समजले होते, की तिचे आधीपासूनच एका मुलावर प्रेम होते. तेव्हा म्हणे त्यांच्या घरात ह्या विषयावरून भांडण सुद्धा झाले होते. तो मुलगा घरी सुद्धा येऊन गेला होता. त्यानंतर मल्हार सोबत तिचे डायरेक्ट लग्न ठरवले. सगळे ठरल्याप्रमाणे ती वागत होती.  कदाचित तिचाच प्लॅन असणार असा, लग्नाचं नाटक करायचं आणि त्यादिवशी पळून जायचं. दोघांनी मिळून हे केव्हाच ठरवले होते म्हणे, गपचूप पळून जायचे. कोणाला काहीही न सांगता."
दुर्गेश सांगत होता आणि मल्हार एकदम आश्चर्याने त्याच्याकडे बघत होता. तिच्याशी लग्न ठरले त्यावेळी काय काय घडले ते सगळे त्याला आठवत होते आणि प्रत्येक गोष्टीचा उलगडा होतं होता.


"इतके प्लॅनिंग केले होते तिने! मग इतकं सगळं करण्यापेक्षा त्यापेक्षा आधीच पळून गेली असती तर बरं झालं असतं. विनाकारण आपली भर मांडवात नाचक्की तर झालीच, पण तिच्या आई वडिलांची अब्रू सुद्धा घालवली तिने! हे तरी कळायला हवे होते तिला."
गणेश बोलत होता तेव्हा त्याला सुद्धा खूप राग येत होता. एखादी मुलगी अशी कशी वागू शकते यावर त्यांचा तिघांचा विश्वास बसत नव्हता.


"प्रेम होतं म्हणे त्यांचं एकमेकांवर, पण आई वडिलांशी असं वागून काय मिळवलं तिने?"
दुर्गेश बोलत होता.


"ते जाऊ दे, आपल्या मल्हारला सुद्धा किती अंधारात ठेवले तिने. उगाच खोटं खोटं प्रेमाचं नाटकं केलं आणि फसवल त्याला."
गणेश तर दात ओठ खाऊन बोलत होता.


"तिला तिची शिक्षा मिळाली त्याच मांडवात. तिच्या स्वतः च्या आई वडिलांनी तिला जिवंतपणी मेली म्हणून स्वीकारले होते. तिचे नाव सुद्धा त्यांना नकोसे वाटतं होते."
मल्हार तिच्या आई वडिलांची काळजी करत बोलत होता.


"जाऊ दे, जे झालं ते झालं. तिचं तिच्या जवळ, पण आता इथून पुढे तू तिचा विषय बंद करायचा. अजिबात तिचं नाव देखील काढायचं नाही. फोन मधून तिचा नंबर आधी डिलिट कर बघू."
गणेशने स्वतः त्याचा फोन घेतला आणि मितालीचा नंबर कायमसाठी डिलिट करून टाकला. इतके करून तो थांबला नाही. त्याने लगेच मीराला मेसेज सुद्धा पाठवला.


त्याने मीराला काय मेसेज केला असेल? ते वाचूया पुढील भागात.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.