नकळत सारे घडले - भाग ७२
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
गणेशने स्वतः त्याचा फोन घेतला आणि मितालीचा नंबर कायमसाठी डिलिट करून टाकला. इतके करून तो थांबला नाही. त्याने लगेच मीराला मेसेज सुद्धा पाठवला.
"हाय, गुड मॉर्निंग स्वीटहार्ट."
मल्हारच्या वतीने गणेशने मेसेज पाठवला होता हे तिला माहितीच नव्हते. तिनेही तो मेसेज लगेच बघितला. तिला पण थोडे आश्चर्य वाटले, की घरात समोर असूनही जास्त काही न बोलणारा मल्हार मेसेज मध्ये कसा काय इतकं बोलतोय?
"हाय, गुड मॉर्निंग."
मीराने मेसेज पाहिला आणि एक सुंदर सकाळचा फोटो तसेच खूप सारे गुलाबाचे फुलं सुद्धा पाठवले. तिचा आलेला रिप्लाय मात्र गणेशने बघितला नाही. फोन लगेच मल्हारकडे दिला.
फोन वरती मीराचे नाव दिसताच त्याने लगेच फोन बाजूला नेत गपचूप मेसेज बघू लागला. त्याला वाटले होते मीराने काहीतरी खास पाठवले असणार आपल्याला; म्हणून त्याला उत्सुकता होती, पण त्याला असे बघून गणेश हसू लागला.
मीराचा मेसेज बघून मल्हार खुश होतो, पण त्याआधी त्याने काय पाठवले ते बघतो. त्याला लगेच समजते, की हे सगळं गणेशच कारस्थान आहे.
"आत्ता मीराला मेसेज तू पाठवलास ना!"
मल्हार त्याच्याकडे खुन्नस देऊन बोलत होता.
"ते मी सहज तुमच्यात बोलणं वाढावं म्हणून मेसेज केला होता."
गणेश बिचारा पटकन बोलून मोकळा होतो.
"अरे काय वाटतं असेल तिला? हे असे मेसेज पाठवतात का?"
मल्हारला खूप ऑकवर्ड वाटतं होते.
"हो मग काय, बायकोला स्वीटहार्ट नाही म्हणणार तर कोणाला म्हणणार?"
गणेश पण असे बोलून पटकन बाथरूममध्ये पळून जातो.
मल्हार त्याला असे घाबरलेले बघून गालातल्या गालात हसायला लागतो.
मीराच्या फोटोवर तो स्वतः च त्यावर हात फिरवतो. त्याला आता जाणीव व्हायला लागली होती, की आपण मीरा सोबत फार वाईट वागलो. ह्या सगळ्यात तिची बिचारीची काही एक चूक नसताना सुद्धा तिने खूप संयम ठेवला. साधं बोलतही नव्हतो आपण तिच्यासोबत लवकर, कायम टाळत होतो. तिला खरचं याच खूप वाईट वाटत असणार. खूप मन दुखावलं आपण तिचं.'
मल्हार अजूनही फोन मध्ये बघत विचार करत असतो आणि तितक्यात गणेश आंघोळ करून बाहेर येतो.
"मल्हार, माझी कपड्यांची बॅग?"
गणेशने जी सॅक आणली होती त्यातच एक जोडी कपडे पण ठेवलेले होते.
गणेशने जी सॅक आणली होती त्यातच एक जोडी कपडे पण ठेवलेले होते.
"ती तिकडे कोपऱ्यात त्या बॅगवर ठेवलेली आहे तुमची सॅक."
मल्हार त्यांना बॅग दाखवून देतो.
"अरे, ही बॅग अजून इथेच का? ठेवून दे ना वरती आता. लग्नाला भरपूर दिवस झाले आणि तरीही पसारा आवराला नाही."
गणेश पटकन बोलून गेला.
गणेश पटकन बोलून गेला.
"मीराची बॅग आहे ती. ती आल्यावर बघेन काय करायचं ते."
मल्हार एकदम सहज बोलून जातो.
"अरे म्हणजे तू त्यांना जागा करून दिली नाही तुझ्या कपाटात? अजूनही त्यांचे कपडे बॅगमध्येच!"
गणेश बोलतो तेव्हा मल्हारला कळते. त्यानेही हा विचार आधी का केला नाही याचे वाईट वाटून जाते.
"हो अरे, माझ्या लक्षातच आले नाही हे. आता जागा करून ठेवतो तिच्यासाठी."
'इतके दिवस झाले तरीही मला हे समजले नाही. मीरा बिचारी तिचे कपडे अजूनही तिच्या बॅगमध्येच ठेवत होती. किती विचित्र वाटतं असेल तिला. ही साधी गोष्ट आपल्याला समजू नये!'
मल्हार पण लगेच उठून कपाटात बघू लागतो तिला कुठे जागा होतेय का.
"जागा म्हणजे छोटासा कप्पा नाही, अर्ध कपाट द्यावं लागेल तुला. बायकांचे कपडे किती असतात तुला माहिती नाही का?"
"काय?"
मल्हार आश्चर्याने बोलतो.
मल्हार आश्चर्याने बोलतो.
"मग काय, हे कपाट आहे ना त्याचा अर्धा भाग द्यावा लागेल. तुला नको असलेले कपडे आणि जास्तीचे सामान सगळे वरती ठेवून दे म्हणजे बरोबर जागा होईल."
गणेश त्याला बरोबर सांगत असतो.
"हो रे, निम्म्याहून अधिक सामान तर न लागणारच आहे. चल आता तू बोललाच आहे तर हे सगळं सामान वरती ठेवून दे."
मल्हार लगेच त्याला कामाला लावत बोलतो.
"हे बरंय तुझं, सगळं काम आमच्याकडून घे तू!"
गणेश स्टूलवर चढून सगळे सामान बॅग वरती ठेवून देतो.
"आता मी सामान ठेवून दिले आहे वरती, फक्त कपाटात पुसून घे आणि पेपर टाकून ठेव, म्हणजे त्या आल्या की त्यांना लगेच कपडे लावायला सोपे जाईल."
गणेश एक एक सांगत होता आणि ते सगळं काम त्यालाच करावं लागतं होते.
"चला चला बसू नका, आवरा पटापट."
मल्हार त्यांना अजिबात बसूच देत नव्हता.
"भूक लागली मला आता इतके कामं करून."
असे म्हणून गणेशने बेडवर अंग झोकून दिले.
"किती नाटकं करतात तुम्ही, मीरा असती तर सगळं छान लावून ठेवलं असतं. इतके दिवस तिने किती छान पसारा आवरून ठेवला होता."
मल्हार तिचं कौतुक करत बोलत होता.
"आहा, लगेच कौतुक सुरू झालं तुझं. जसं काही तुझ्या बेडरूम मध्ये पसारा आम्हीच करून गेलो होतो."
दुर्गेश मधेच बोलला.
"तू तर बोलूच नको, तूच करून ठेवला होता तो पसारा आणि जेव्हा आवरायचं तेव्हा निघून गेलात."
मल्हार त्याला पण कामाला लावत होता.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा