नकळत सारे घडले - भाग ७६
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मीरा आणि मल्हार, दोघांमध्ये आता थोडे थोडे बोलणे सुरू झाले होते. घरातल्यांची, मैत्रिणींची आणि कॉलेजची चौकशी करून झाली. मध्येच मल्हारने अचानक गाडी थांबवली. काय झाले म्हणून मीरा त्याच्याकडे बघू लागली.
"मीरा सॉरी, तुला खूप सहन करावं लागलं. मी जे काही वागलो ते खूप चुकीचं होतं. प्लीज मला माफ करशील!"
मल्हार अगदी तिचा हात हातात घेऊन बोलत होता. त्याच्या अशा बोलण्याने मीरा चकित झाली. तिने लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवला.
मल्हार अगदी तिचा हात हातात घेऊन बोलत होता. त्याच्या अशा बोलण्याने मीरा चकित झाली. तिने लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवला.
"हम्म्म, पण आता मागचे काहीच बोलायचे नाही. आता आपण फक्त आपल्या भविष्याचा विचार करायचा."
असे म्हणून ती त्याला विश्वास देते. तिच्या डोळ्यात त्याला खूप प्रेम दिसत होते; त्यामुळे आणखीनच गिल्टी फिल झाले होते.
"पण मला एक सांग, तुला खरचं मी कसा काय आवडलो?"
मल्हार मुद्दाम तिला विचारत होता. तिच्या मनातले जाणून घेण्यासाठी.
"लग्नाच्या दिवशी जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलून बाहेर गेलात अगदी त्या क्षणापासून. आधी मलाही मान्य नव्हते, अचानक लग्नाचा विचार मला पचवणे सोपे नव्हते, पण तुमचे बोलणे ऐकून माझा विचार बदलला. सगळ्यांचा विरोध असूनही तुम्ही माझ्याशी बोलायला येतात आणि माझ्या बाजूने विचार काय करतात. माझा जो काही निर्णय असणार तो तुम्हाला मनापासून मान्य असण्याची शास्वती देतात. हे माझ्यासाठी खूप खास होते. मनातून तर मी तेव्हा त्याच क्षणापासून तुमच्या प्रेमात पडली होते. समोरचा व्यक्ती जर आपली काळजी घेत असेल, आपला इतका विचार करत असेल तर मग का नकार द्यावा."
मीरा अगदी खरं खरं बोलून मोकळी होते.
"खरचं सॉरी! मी तुला खूप वाट बघायला लावली. तू खरचं मनापासून लग्नाला तयार होतीस! पण मीच तुला समजून घ्यायला उशीर केला. तू बघायची माझ्याकडे, पण माझेच लक्ष नव्हते तुझ्याकडे! आय एम सॉरी मीरा! माफ करशील मला?"
मल्हार असे म्हणताच मीरा त्याच्या कुशीत शिरते. दोघेही एकमेकांना अगदी लहानपणापासून ओळखत असेल तरीही आज नव्याने समजत होते. हे नाते अधिक घट्ट होतं होते.
घरी पोहोचताच आईने दोघांवरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. मीरा पुन्हा तिच्या लाडक्या आत्तूच्या कुशीत शिरली. मल्हारला ते बघून खूप छान वाटतं होते. जेवण झाल्यावर मीरा मुद्दाम खाली घुटमळत होती आणि मल्हार वरती तिची वाट बघत बसलेला. याआधी मीरा वरती वाट बघत बसायची आणि आज मल्हार त्याठिकाणी होता; त्यामुळे त्याला समजत होते मीराला तेव्हा कसे वाटतं असावे. पुन्हा त्याला स्वतः वर चीड येत होती, पण मीराचा विचार मनात येताच ओठांवर आपसूकच हसू यायचे.
"मीरा, अग इतका वेळ झाला तरी अजून तू गेली नाही वरती. दादा वाट बघत असणार."
मिनलने लगेच तिच्या मनातले ओळखले.
"हो.. ते मी जातच होते."
असे म्हणून मीरा लाजतच वरती जायला लागली.
"आता आणखी वाट नको बघू, जा.. तुझे नवीन आयुष्य तुझी वाट बघतेय."
मिनल तिला असे बोलली तेव्हा मीरा लगेच तिला जाऊन मिठी मारते आणि पळतच वरती जाते.
मीराला मनात एक वेगळीच हुरहूर जाणवत होती. ओढ तर होतीच, पण थोडेसे दडपण सुद्धा आलेले. आज पहिल्यांदा ते एकमेकांशी इतक्या मोकळेपणाने बोलले होते. एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त केले होते.
मीरा हळूच दरवाजा उघडुन आत येते तेव्हा मल्हार तसाच पाठमोरा उभा होता जशी मीरा त्यादिवशी उभी होती. तिला तोच दिवस डोळ्यासमोर येत होता, पण आज दोघेही एकमेकांशी बोलायला भेटायला उतावीळ होते. दोन्ही बाजूंनी ओढ होती. नव्या नात्याची खरी सुरुवात होती.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा