नकळत सारे घडले - भाग ७७
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मीरा थोडी घाबरतच बेडरूममध्ये आली. मल्हारला बघताच ती तशीच तिथे आहे त्या जागी थिजली. आज दोघेही मनाने जवळ आले होते. मनातल्या भावना एकमेकांना सांगून मोकळे झाले होते.
मीरा आल्याची चाहूल तर त्याला केव्हाच लागलेली होती, पण ती बोलत का नाहीये; म्हणून मल्हार मागे वळून बघतो. ती तशीच दाराजवळ उभी आहे बघून तो तिच्याकडे चालत येतो. तो जसजसा तिच्याकडे चालत जवळ येतो तसे मीराचे काळीज अगदी जोरात धडधडत होते. तिला कळतच नव्हते आता कसे? आणि काय? बोलावे. ती फक्त त्याच्या समोर उभी होती. त्याने आज पक्के ठरवले होते, आता काहीही झाले तरी मीराला कधीच अंतर देणार नाही.
मल्हार जवळ येताच तिचा हात धरून बेडवर बसवतो. त्यांच्या दोघांमध्ये बेडवर ठेवलेली उशी आज गायब होती, हे बघताच तिला जास्तच भीती वाटली. ती उठून पुन्हा खिडकीसमोर जाऊन उभी राहते, तोच मल्हार तिच्या मागे जातो. त्याला माहिती होते तिच्या मनात आता काय चालू असणार. तिची भीतीने होणारी धडधड, वाढलेल्या श्र्वासांची गती त्याला स्पष्ट दिसत होती. त्याने पण मुद्दामच आज तिची परीक्षा घ्यायचे ठरवले होते.
तो पुन्हा तसाच तिच्या मागे जाऊन उभा होता, अगदी तिच्या नकळत. ती अजूनही घाबरलेली होती, डोळे गच्च बंद करून उभी होती. तिचे ऊर जोरजोरात खाली वर होत होते. त्याने तो अधिकच चेतवत होता, पण तिने इतके दिवस मनावर संयम ठेवला; त्यामुळे त्याला आता जास्त घाई करून चालणार नव्हते. त्याने अलगद तिचा हात हातात घेतला आणि हातावर किस केले, तशी ती शहारली.
तो हळूहळू तिच्या आता जास्तच जवळ येत होता. मीरा अजूनही डोळे मिटून होती. तो जसा वागेल तसे त्याला करू देत होती. प्रेम, भीती, ओढ, हुरहूर ह्या सगळ्या भावना अगदी एकदाच उचंबळून आल्या होत्या. त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या तर होत्याच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे दोघांनी एकमेकांना पूर्णपणे स्वीकारले होते. ही भावना कित्येक पटीने महत्वाची होती.
आज मल्हारने बहुतेक ठरवलेच होते, की मीराला अजिबात डोळे उघडू द्यायचे नाही. ती अजूनही तशीच पुतळा बनून उभी होती. तो तिच्या आणखी जवळ जाणार, पण मध्येच तसाच थांबला. तिची गम्मत करावी म्हणून तो तिच्याकडे हाताची घडी घालून बघत उभा होता. आणखी कितीवेळ तशीच उभी राहणार? म्हणून तो तिच्याकडे हसून बघत होता. त्याला खूप भारी वाटतं होते, मीरा आज त्याच्यासाठी.. फक्त त्याच्यासाठी घरी यायला तयार झाली होती. नाहीतर ती आणखी आठवडा भराने येणार होती.
बराच वेळ झाला तरी मल्हार काही करेना. त्याची काहीच हालचाल नाही; म्हणून मीरा डोळे उघडून बघू लागली. बघते तर काय? मल्हार तिथेच उभा राहून तिच्याकडे बघून हसतोय हे दिसले. तिला स्वतः चीच खूप लाज वाटत होती. तिने फिरून पुन्हा आपला चेहरा ओंजळीत घेतला. तिला खूप लाज वाटत होती, पण मल्हारला तिचे असे वागणे बघून हसू येत होते. ती पाठमोरी फिरली, तसे मल्हारने तिला मागून मिठीत घेतले.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा