नकळत सारे घडले - अंतिम भाग ८०
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मीरा आणि मल्हार दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. आता ते एक क्षण ही एकमेकांपासून लांब राहू शकत नव्हते.
त्यांचे लग्न जरी अचानक झाले होते, पण दोघेही एकमेकांच्या प्रेमात नकळत पडले होते. त्यांना सुद्धा समजत नव्हते आपल्याला हे नक्की काय होतंय.
एकमेकांच्या प्रेमळ स्पर्शातून जितकी प्रेमाची भावना तीव्र समजते ती कोणत्याच कृतीतून समजत नाही. प्रेमात स्पर्शाची ओढ नसेल तर प्रेम पूर्ण कसे? प्रेम म्हणजे फक्त एकमेकांना समजून घेणे नव्हे, तर एकमेकांना स्पर्शातून जाणून घेणे होते. याला वासना म्हणता नाही येणार, कारण ते दोघेही मनाने नाही तर शरीराने सुद्धा एक व्हायला तयार होते. मीराच्या डोळ्यांमधून ओथंबणारे प्रेम, ती उत्कटता मल्हारला खुणावत होती. जवळ घे म्हणून ओरडून सांगत होते.
प्रेम करणारा मल्हार जितका आतुर होता तिच्या हळुवार स्पर्शासाठी, तितकीच मीरा सुद्धा आसुसलेली होती त्याच्यासाठी. इतक्या दिवसांचा संयम आज त्याच्या ओढीने सुटला होता. त्यांना दोघांना कळतं होते, की त्यांचे प्रेम आज पूर्णत्वाला जाणार होते.
एकमेकांबद्दल काळजी, ओढ, प्रेम आणि एक वेगळ्याच प्रकारची हुरहूर हवीहवीशी वाटणारी होती. नव्याने उत्पन्न होणारी ही भावना दोघांना जास्त वेळ दूर ठेवू शकत नव्हती.
मल्हारचा संयम सुटत चालला होता. तिच्या कपाळावर किस करताच ती मोहरुन गेली. हळुहळू तो तिच्या गालावर, डोळ्यांवर, हनुवटीवर आणि शेवटी ओठांवर किस करतच होता. त्याच्या अशा वागण्याने ती त्याला ढकलून देत लांब जायचा उगाचच प्रयत्न करत होती.
त्याने मीराला घट्ट पकडत जवळ खेचले होते. ती त्याच्यावर आदळली तसे तिचे उरोज त्याच्या छातीवर जोरात दाबल्या गेले. त्याचे दोन्ही हात तिच्या सर्वांगावर बेछुटपणे फिरत होते. दोघांचे वाढलेले श्वास संपूर्ण बेडरूम मध्ये घुमत होते. हळुहळू तो तिच्या संपुर्ण शरीरावर ताबा मिळवत होता आणि ती सुद्धा त्याला हवा तसा प्रतिसाद देत होती. त्याच्या पाठीवर रुतणारे तिचे हात त्याला जास्तच उतावीळ करत होते. त्याच्या प्रत्येक कृतीतून समजत होते तो तिच्यावर किती जास्त प्रेम करत होता.
आनंदाची परमोच्च सीमा गाठल्यानंतर शांत झालेले, दमलेले दोघेही एकमेकांच्या कुशीत विसावले. सकाळ झाली तसे मीराने त्याच्याकडे बघितले. मल्हार अजूनही गाढ झोपेत होता. तिने त्याच्या डोक्यातून हात फिरवला तसे त्याने पुन्हा तिला जवळ ओढून घेतले.
"मल्हार, प्लीज आता सोडा. आई खाली वाट बघत असतील."
मीरा त्याच्या मिठीतून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती, पण तो सोडायला तयार नव्हता.
"का? इतक्या दिवसांचा दुरावा.. इतक्या सहजासहजी कसा काय मिटणार."
मल्हार जास्तच रोमँटिक होत बोलत होता.
मल्हार जास्तच रोमँटिक होत बोलत होता.
"प्लीज. खूप उशीर झालाय."
मीरा प्लीज म्हणताच तो तिला सोडतो, तशी ती पळतच जाते.
आरशासमोर उभ राहून आवरताना मीरा हळूच त्याला बघत होती. तो अजूनही तिलाच पाहतोय हे बघून तिच्या चेहऱ्यावर जी लाजेची लाली चढते ती त्याला आणखी आवडत होती.
"आता सोडतोय, पण रात्र माझीच आहे."
मल्हार असे म्हणताच मीरा पुन्हा लाजून चेहरा ओंजळीत धरते.
मल्हार त्यांच्या हनिमूनसाठी तिकीट बुक करतो आणि मीराला त्याबद्दल काहीच माहिती नसते. संपूर्ण दिवस संपून जातो तरीही मल्हार तिला सांगत नाही. रात्र होताच तिची आतुरतेने वाट बघत असतो. ती जशी आवरून वरती येते तेव्हा तिला जवळ घेतच कानात सांगू लागतो.
"मीरा, तुझ्यासाठी एक सरप्राइज आहे."
मल्हार असे म्हणताच ती खुश होते आणि त्याच्या आणखी जवळ येते.
"तुला मनाली आवडेल की कश्मिर?"
मल्हार असे म्हणताच मीरा समजून जाते.
"काय?"
मीरा खुश होतच त्याच्या मिठीत शिरते. तिला मागचे झालेले सर्व आठवते. याआधी त्याने बुक केलेली तिकीट कॅन्सल केलेली असतात तेव्हा ती खूप नाराज होते, पण आता त्याने स्पेशल मीरासाठी हे सर्व विचारपूर्वक प्लॅन केले होते. तिला कुठे जायला आवडेल ते लक्षात घेऊन पुन्हा तिकिटं बुक केली. घरातल्यांना आधीच सांगून ठेवले होते.
मीरा खूप खुश होते. दोघांची फ्लाईटची तिकिटं अगदी दुसऱ्या दिवसाचीच होती. दोघेही त्यांचा आनंद बॅगेत पॅक करून आता पुढच्या प्रवासाला निघणार होते. त्यांच्या नव्या आयुष्याची नवी सुरुवात करणार होते.
दोघे एकमेकांना वेळ देत होते. जास्तीत जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना माहिती होते, ते दोघे अचानक भेटले पण नियतीच्या मनात सुद्धा हेच होते. शेवटी जे व्हायचे ते होतेच. आपण फक्त पुढे जात राहणे योग्य असते.
कधी कधी आपण आपल्या आई वडिलांना वाईट ठरवून मोकळे होतो. ते आपल्यासाठी अगदी विचारपूर्वक निर्णय घेतात. आपल्या भल्यासाठी सगळं करतात, पण ते जे म्हणतात तेच आपल्यासाठी योग्य असते ह्याची जाणीव मात्र खूप उशिराने होते.
समाप्त.
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा