बाबांच्या कानावर माय लेकाची चर्चा पडली होती जणू.
अनंतरावांनी मग शामल ताईंना खूप समजावले.
"अहो पण ती मुलगी खूपच उद्धट आहे हो. अशा मुलीला सून म्हणून नाही मी हँडल करू शकणार."
"अगं पण इतर कोणतीही मुलगी सून म्हणून घरात आली तर ती कशी आहे ते आधीच तुला थोडीच माहिती असणार आहे आपल्याला. तिच्यात देखील काही गुण तर काही अवगुण असतीलच ना. त्यावेळी ॲडजस्ट करशीलच ना तू? यात सर्वात जास्त नुकसान मात्र शंतनुचे आहे. हे समजत नाही का तुला. तुझ्या हट्टासाठी त्याने कोणत्याही मुलीला होकार द्यावा हे मला चालणार नाही."
"अहो पण..."
"शंतनु अदितीच्या बाबांचा नंबर दे मला मी बोलतो त्यांच्यासोबत." शामल ताईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अनंतराव मात्र लेकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
बाबांचा सपोर्ट पाहून शंतनुचा चेहरा खुलला. त्याने लगेचच अदितीला फोन करून तिच्या बाबांचा नंबर घेतला.
"अगं अदिती..आई बाबा तयार झाले आपल्या लग्नाला." आनंदी स्वरात शंतनु बोलला.
अदितीला क्षणभर विश्वासच बसेना."बाबांचे समजू शकते पण आई..त्या इतक्या लवकर कशा काय \"हो\" म्हणाल्या."
"तू नको गं टेन्शन घेऊस. विश्वास ठेव माझ्यावर."
"शंतनु.. खरं सांगा ना, आई नाहीत ना तयार? तुमच्या बोलण्यात कुठेतरी जाणवले मला ते."
"अगं तसे काही नाही. थोडा वेळ लागेल तिला सगळं विसरायला, तू काळजी करू नकोस. आता बाबा फोन करतील तुझ्या बाबांना तेव्हा पटेल तुला. तू सांगितले नाहीस ना पण अजून त्यांना काही?"
"कसे सांगणार? तुमच्या फोनची वाट पाहत होते. त्यात कशातच मन लागत नव्हतं. तुमच्याकडे नेमकं काय सुरू असेल? हाच विचार राहून राहून मनात येत होता. उगीच माझ्यामुळे तुमच्यात वाद नकोत असे वाटत होते."
"तसे काहीही झाले नाही..डोन्ट वरी."
"मग काय राणीसरकार..अर्धी लढाई तर आपण जिंकलो."
शंतनुच्या तोंडून \"राणीसरकार\" हा शब्द ऐकताच अदितीच्या चेहऱ्यावर लाजेची कळी खुलली. मनात फुलपाखरे घिरट्या घालत आहेत असे क्षणभर तिला वाटले.
"माझा तर विश्वासच बसत नाहीये की माझं लग्न होणार आहे."
"अगं वेडाबाई... माझं नाही गं आता आपलं म्हण."
"हो तेच ते." अदिती लाजतच बोलली.
"काय मग मॅडम फुलवायची ना आता आपली प्रेमकहाणी?" शंतनुने थोड्या रोमँटिक मुडमध्येच प्रश्न केला.
"काहीही काय? असं ठरवून कुणी फुलवतं का प्रेमकहाणी?" लाजतच अदिती उत्तरली.
"असेही काही असते होय? मला तर नव्हते माहित बाबा. त्याचे काय आहे ना.. मी पहिल्यांदाच कोणाच्या तरी प्रेमात पडलो ना त्यामुळे माहित नाही मला."
"म्हणजे मी प्रेमात पी.एच.डी केली, असा अर्थ होतो त्याचा."लटक्या रागातच अदितीने विचारले.
"मी कुठे काय बोललो. तूच तसा अर्थ घेतेस त्याला मी तरी काय करणार ना?"
"हो का? काहीही म्हणा पण तुम्ही पक्के छुपे रुस्तुम आहात. वरून खूप शांत आणि सोज्वळ वाटता खरे पण प्रत्यक्षात बिलकुल तसे नाहीत आ. एखाद्याची खेचण्यात खूपच एक्स्पर्ट आहात तुम्ही. थोडक्यात नॉटी."
"खूप लवकर समजले तुम्हाला हे..त्यामुळे छान वाटले."हसतच शंतनु बोलला.
"बरं चला, बाबा म्हणतील याला नंबर आणायला सांगितला आणि हा डायरेक्ट घरीच गेला की काय नंबर आणायला. आज करतील बाबा फोन तुमच्या बाबांना. पाहू आता पुढे काय होते ते? भेटुयात लवकरच. ठेवू मग? बोलू नंतर."
"इच्छा नसतानाही अदिती फोन ठेवायला तयार झाली. शंतनुने मग अदितीच्या बाबांचा फोन नंबर त्याच्या बाबांना दिला. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी लगेचच अदितीच्या बाबांना फोन लावला.
सर्व काही सांगितल्यानंतर अदितीच्या बाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
"येत्या रविवारी आम्ही मुलगी पाहायला आले तर चालेल का?"शंतनुच्या बाबांचा हा प्रश्न कानी पडताच हे सारे स्वप्न तर नाही असेच वाटले क्षणभर.
"येत्या रविवारी आम्ही मुलगी पाहायला आले तर चालेल का?"शंतनुच्या बाबांचा हा प्रश्न कानी पडताच हे सारे स्वप्न तर नाही असेच वाटले क्षणभर.
नको नको म्हणताना फायनली अदितीच्या पाहण्याचा कार्यक्रम फिक्स झाला. आता कधी एकदा रविवार येतो असे झाले होते दोघांनाही.
अदितीच्या घरी तर आनंदी आनंद झाला होता.
"आई, बघ ही शहाणी..लग्न करायचेच नाही म्हणायचं आणि गुपचूप गुपचूप लग्न ठरवून मोकळं व्हायचं. मला तर त्या दिवशीच डाऊट आला होता, कुठेतरी पाणी मुरतंय याची खात्रीच पटली होती." सवयीप्रमाणे अमेयने अदितीची खेचायला सुरुवात केली.
"हो रे बघ ना. ती लग्नाला तयार झाली यातच आले पण सर्व काही."आता कुठे रत्ना ताईंना हायसे वाटत होते.
माधवरावांनी शंतनुचा बायोडेटा चेक केला. आता मुलगी द्यायची म्हटल्यावर त्या मुलाची माहिती काढायला नको का? त्यामुळे माधवरावांनी ओळखीतील काहींना फोन करून शंतनुची माहिती काढली. सर्वांकडून कौतुकच ऐकायला मिळत होते शंतनुचे. त्यामुळे रत्ना ताई आणि माधवरावांना मनावरचे ओझे कमी झाल्यासारखे वाटत होते.
आता सगळे काही सुरळीत तर होत होते पण शामल ताई मात्र लेकाच्या आनंदात फारशा खुश दिसत नव्हत्या. त्यांना अदिती सून म्हणून अजिबात पसंत नव्हती. फक्त अनंतरावांपुढे त्याचे काहीही चालत नव्हते.
क्रमशः
आता कसे होणार पुढे? शंतनु आणि अदितीच्या लग्नात शामल ताई आणतील का काही विघ्न? जाणून घेऊयात पुढे.
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा