“हुश्श! झाला बाबा फोन एकदाचा. ह्या माणसाला ना चोपून काढावेसे वाटते कधीकधी. बायको जरा वेळ बाहेर गेली मैत्रिणींनी ना भेटायला तर थोडा वेळ द्यावा असे नाहीच. घरातली सगळी कामे उरकून आलीय. मुलांचे सुद्धा सगळे उरकून आलेय. तरीही असा.”
“नाहीतर काय! तुझ्या नवर्याने त्या ट्रीप मध्ये सुद्धा किती आगाऊपणा केला होता फोन करून. त्यात मनालीच्या माहेरचे तर बाई बाई बाई...हद्द केली.” अनिकाने आठवण केली.
“नाहीतर काय माझ्या घरचे. मी काय लहान आहे का? लहान मुलांना देतात तसे सूचना. त्यातही सुखाने एन्जॉय सुद्धा करू देत नाही. नुसता त्यांच रडगाणे. आता आई वहिनीचे गहाणे गाते. वहिनी आईचे. त्यापलीकडे दादा ह्या दोघींचे. मधल्या मध्ये त्या छोट्या जिवाचे हाल.” मनाली थोडी चिडचिड करतच बोलली.
“हो गं. तू लहान आहेस दादापेक्षा. तरीही तुझी ही अवस्था.” नीला खांद्यावर थाप मारत बोलली.
मनाली पुढे, “मला तर अजिबात म्हणजे अजिबातच आईकडे जावेसे वाटत नाही. अरे थोडा तरी डोक्याला आराम द्या. मनाला शांती अशी नाहीच. मी लहान बहीण असूनही दादाचे प्रश्न सोडवत आहे. वीट आला गं खूपच. मुलांना सुद्धा इतके विचित्र वागतात ना मधेच मग मुलांना माहेरी पाठवत नाही. त्यापेक्षा घरी सुखी आणि नजरेसमोर असतात.”
“ह्या बाबतीत माझा भाऊ छोटा आहे आणि त्याचे म्हणणे काय तर पोरांनी घाबरले पाहिजे. मग ह्यामुळे मुलांना मामापेक्षा काका जास्त आवडतो. तो आवडीने त्यांची आवड जपतो. माझ्या आईपेक्षा सासुबाई जास्त प्रिय. भले सासुबाई जास्त प्रेमळ नसतील माझ्यासोबत पण मुलांसाठी काहीही करायला तयार असतात. मी खूपच निश्चिंतपणे सासू आणि भाऊजीकडे मुलांना सोडून बाकीची महत्त्वाची कामे उरकू शकते.” सुचिकाने तिच्या मनातील विचार मांडले.
नीलाने बोलायला सुरुवात केली, “काहीही असो. तुम्ही सगळे तुमच्याच घरात राहता. मी माहेरीच नवरा आणि मुलासोबत राहते. मला पर्याय नाही म्हणून राहते. त्यात दोन्ही बहिणी लग्न होऊन सासरी आहेत. कधी आई सोबत कधी वडिलांसोबत कडाक्याच भांडण होत. नकोस वाटते माहेरी पण बाहेरही पडता येत नाहीये. आजकाल घर खरेदी करणे खूपच अवघड झालेय त्यात जॉब सुद्धा असा निश्चित नाहिये.” अगदी उदास स्वरात पाहून अनिकाने तिला चिअरअप करायचा प्रयत्न केला.
एवढ्या सगळ्यांमध्ये शांत असलेल्या सुज्ञाने हळूच बोलायला सुरुवात केली.
“तुम्हा सगळ्यांचे त्रास ऐकून मला माझे छोटे वाटू लागले. लग्न झाले आणि मी दुसर्याच राज्यात गेले. साहजिकच आईकडे येणे वर्षातून एक-दोनदाच. आता आई आहे त्याच शहरात आली रहायला. पोरांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आणि व्यवसायाच्या दृष्टीने आलो. पण...” एक दीर्घ श्वास घेऊन थांबली तशी
“तिथेच चूक झाली की काय वाटले.” तिचे वाक्य अनिकाने पूर्ण केले.
पाणी पिऊन बरे वाटले तसे पुन्हा बोलायला सुरुवात केली.
“आई जवळच म्हणून दादाचे लग्न होईपर्यंत माहेरी वरच्यावर ये-जा होती. पण आता नाही. संपत्तीचे हिस्सा कोणाचा किती ह्यामुळे आता मन मरून गेले माहेरच्या नावानेच.” अगदीच उदास स्वरात सुज्ञा बोलत होती.
काही क्षण गेले तशी अजून एक सरप्राईज खायची ऑर्डर आली. एक सोडून बाकी चारही जणींनी एकच कल्ला केला.
“अरे मस्तच.”
“मूड फ्रेश झाला.”
“मला तर बाई किती दिवस झाले खावेसे वाटत होते.”
“ए थांब मला फोटो काढायचाय.”
सगळ्यांना ऐकून हासतच डोक्याला लावून नीला नकारार्थी मान हलवत होती. मनातच म्हणाली, “ अजूनही मनाचा लहान कोपरा जागा आहे. किती निरागस आहेत.”
फोटो क्लिक करण्यासाठी अनिकाने फोन काढला तेवढ्यात मनालीने लोडेड क्रीम चीज फ्राईजचा तुकडा उचलून तोंडात टाकला.
“जा बाबा! ही नेहमी अशीच करते. मी रुसून बसले.” करत अनिका रुसून बसायची अॅक्टींग करत होती गालातल्या गालात हसत.
क्रमशः

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा