तिचा रुसवा घालविण्यासाठी सुचिताने ब्राऊनी विथ आईस्क्रीम ऑर्डर केली तशी ती खुश होऊन बसल्या ठिकाणीच नाचू लागली होती.
“आपण फिरायला जायचे का?” सुज्ञाने विचारले तसे सगळ्यांच्या चेहर्यावर मिश्र भाव दाटून आले.
“मागच्यावेळी फिरायला गेलो होतो. लक्षात आहे ना? सासरच्या लोकांपेक्षा माहेरच्या लोकांनीच जास्त सूचना दिल्या.” मनाली म्हणाली तशी सुचिका फसकन् हसली.
“ आता मी काय कुक्कूल बाळ आहे का? एवढ्या सूचना मी माझ्या मुलांना सुद्धा देत नाही. काय तर म्हणे, पाण्याची बाटली घेतली का? पैसे जपून वापर. जसे काही ह्या लोकांनीच पैसे दिलेत. रात्रीच बाहेर जाऊ नको. दिवसा सांभाळून. बाहेरच काही जास्त खाऊ नको. एकवेळ अशी आली ना मला तर, वाटले बोलते नाही जात, घरीच बसते.” मनाली वैतागून सांगत होती.
सुचिकाला हसूच आवरत नव्हते. “तुझ्या घरचे भयानक आहेत. म्हणजे त्यांनीच पाठविल्या सारखे करत होते.”
“नाहीतर काय यार. आयुष्यात पहिल्यांदाच बसले ट्रेन मध्ये यार. नातेवाईक सगळे इथेच. बाबा गेल्यानंतर कुठे फिरायला जायचा प्रश्नच नाही आला. दादा तर त्याच्या धुंदीत. मी लग्न होऊन इतक्या वर्षांनी स्वतःच्या पैशांनी गेले तर त्यात हे असे.” डोळे फिरवतच मनाली म्हणाली.
नीला त्यावर थोडी रागाने बोलली, “ तू एकपट, तुझ्या घरचे दुप्पट. तुला त्याचवेळी बोलले नको करूस. जॉब कर. आता माहेरच्या लोकांपासून सुटका होईल म्हणून केलेस लग्न. ते तर असे झाले, 'आगीतून फुफाट्यात'. करायला गेली एक आणि झाले भलतेच.”
“ए पोरींनो जाऊद्या गं. झाले गेले त्यावर बोलून उपयोग नाही. आपले माहेर आपल्याला खूप हवेहवेसे आहे. आपण लहानाचे मोठे झालोत ना तिथेच. त्यांच्या लेखी आपण फक्त जबाबदारीच होतो. मग आपण कितीही काही करेना. आपला भाऊ माहेरच्या वंशाचा दिवा त्यांच्यासाठी सगळे काही आहे.” सुज्ञा थोडे विचारपूर्वक बोलली.
“मला थोडीशी असूया वाटते जेव्हा शेजारची वहिनी माहेरी जाऊन येते आणि तिथल्या गमतीजमती सांगते. आपल्या नशिबी का नाही असे माहेर असे विचार येत राहतात. खूप काही नकोय. थोडेसे प्रेमळ शब्द हवेत. आईच्या कुशीत डोके ठेवून गप्पा मारत झोपेच्या आधीन होत जायचे. बाबांन सोबत थोडा फेरफटका आणि भावासोबत मस्ती.” अनिका मनातील अपूर्ण इच्छा बोलून दाखवत होती.
तेवढ्यात कॅफे मध्ये सगळ्यांच्या आवडीचे गाणे वाजू लागले तसे सगळ्यांचा मूड एकदम छान झाला. अनिका आणि नीला दोघीही मस्त डोलत कॉफीचा आस्वाद घेत होत्या.
“ए पण काय गं. किती अजब आहे नाही? आपल्यापैकी एकीचेही माहेर असे नाहीये की ओढ लागेल. आपल्यापैकी दोघी लग्नानंतर गावातून शहरात आल्या. शहरात आल्या म्हणजे मुलींकडे खूप काही असेल आणि त्यांनी आपल्याला सगळे दिले पाहिजे अशी अपेक्षा. भले घरी सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा का असेना.” सुज्ञाने तिचे मांडले.
तिच्याच मताला सहमती दर्शवत अनिका बोलली, “ मी लग्न करून शहरात रहायला आले खरी. सुरुवातीच्या काही वर्षापर्यंत मला प्रचंड ओढ असायची. नवरा तर खूपच चांगला आहे. त्याने कधी टोकले नाही माहेरी जाण्यापासून. पण अलीकडे ती ओढ जाणवत नाही. नवरा जरी जाऊन ये बोलत असला तरी नकोच वाटते.”
“ शेवटी काय तर बर्याच वेळा फक्त सासरच नाही तर माहेर सुद्धा नकोसे वाटू शकते. फक्त आईवडिलांनी जन्म दिला, लहानाचे मोठे केले आणि तुम्ही मुली अश्या बोलता करून आपल्यालाच बोल लावतात. आपला मान सासरी टिकून राहावा म्हणून एक दिवसासाठी का होईना माहेरी जाऊन येतो. बरोबर ना मैत्रीणीनों?” नीला हसतच आळीपाळीने सगळ्याकडे बघत म्हणाली तसे सगळ्या बोलायला एकदम सुरू करायच्या तयारीत होत्या. पण नाही जमले कोणालाही एकदम बोलायला. थोडा दीर्घ श्वास घेऊन एकीने बोलायला सुरुवात केली. सगळ्या एकदम शांतपणे ऐकत होत्या.
क्रमशः

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा