Login

नकोशा भाग १

एका मुलाची कथा
नकोशा

भाग १

सकाळी सकाळी सीमाला पोटात दुखायला लागलं होतं पण सासूबाई म्हणाल्या , " अगं थांबेल थोड्यावेळानी . फार दुखले तेर जाऊ डॉ कडे. आताशी नववा चालू झाला आहे अजून वेळ आहे. "

" हो आई , तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे . पण मला थोड्या थोड्या कळा येतायत हो . " सीमाला पहिल्या वेळचा अनुभव असल्यामुले तिला कळा कळत होत्या .

" असं म्हणते . थांब मी समीर ला बोलावते . मग जाऊ दवाख्यानात . "

" हो बोलावा . अहो आई सुबोध कुठेय . त्याला शेजारी रमा कडे पाठवावे लागेल . आ आई . आईगं , आ आ " सीमा ओरडत होती . त्याचा आवाज ऐकून सुबोध आणि समीर पण दोघे पळत आले.

" समीर बरं झाला आलास. तिला दवाखान्यत न्यायला हवे . तू गाडी काढ . मी ह्याला रमा कडे देउन येते . आणि हिचे कपडे घेउन येते . " असं आई म्हणून गेली पण .

समीर सीमा च्या शेजारी बसून तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला , " काळजी नको करू . सगळं नीट होईल . माझ्या घरात लक्ष्मी येणार . सगळीकडे आता आनंद पसणार . "

" हो तुम्ही म्हणता तसं होईल . "

" होणारच . माझ्या घरात तुझ्यासारखी छोटीशी परीच येणार . ती सुख समृद्धी आणणार . "

" आ आई . आ आ ... ... " मध्येच सीमा ओरडत होती.

" अरे समीर गाडी काढ लवकर . तिला लवकर घेउन जाऊ . " आई म्हणाली

इकडे सीमा कळांचा त्रास सहन करत मनात विचार करत होती . यांच्या म्हणण्या प्रमाणे मुलगी नाही झाली तर हे मूळ स्वरूपात येतील का ? आणि मुलाला सांभाळतील ना . मला आता फार भीती वाटायला लागली आहे .

प्रत्येक जण आपल्या विचारात होते. या विचारांमध्ये ते दवाखान्यात कधी पोचले कोणालाच कळले नाही .

आल्या आल्या डॉक्टरांनी तिला तपासून ऍडमिट केले . आणि ऑपेरेशन ची तयारी करायला घेतली . इकडे तिच्या कळा वाढतच होत्या. आणि समीर आणि आई देवाच्या धावा करत होते.

समीर ची देवाला सारखी एकच प्रार्थना करत होता , " मला एक छोटीशी लक्ष्मी दे. आणि तिला आणि सीमाला सुखरूप ठेव . "

साधारण तीन तासांनी सीमाची प्रसूती होऊन तिला गोंडस मुलगा झाला. त्या मुलाला घेऊन सेविका बाहेर आली आणि तो मुलगा दाखवत अभिनंदन करू लागली .

पण समीर ला मुलगी हवी असल्यामुळे तो नाराज होऊन त्याने मुलाला घेतले पण नाही आणि बघितले पण नाही . आई त्याचे वागणे बघून आश्चर्यचकित झाली. पण दवाखान्यात काही वाद नको म्हणून ती मुलाला घेऊन सीमा कडे आली . सीमाला सुखरूप बघून आईला बरे वाटले .

" बाळ . बघ . किती गोंडस मुलगा झालाय . अगदी तुझ्यासारखा . " हे ऐकून सीमा शांतच झाली .

तिला शांत झालेलं बघून आई म्हणाली , " काय झालं , तुला आनंद नाही झाला ?"

" असं नाही . मला आनंद खूप झाला पण तेवढीच भीती पण वाटायला लागलीय . "

" का ग ?"

" अहो आई , ह्यांना मुलगी हवी होती . पण ... "

" अगं कोणीही झाले तरी चालतंय फक्त सुखरूप आसू दे हीच प्रार्थना . "

" तुमचे बरोबर आहे पण ह्यांना मुलगी हवी होती . त्यामुळे दिवस गेल्यापासून त्यांच्या स्वभावात खूप बद्दल झालेला आता ते परत मूळ स्वरूपात आले तर . ? त्यांनी ह्याला स्वीकारले नाही तर ... "

" बाळा नको आता विचार करू. मी त्याला समजावते . आता तू तुझी आणि बाळाची काळजी घे . मी त्याच्याशी बोलून येते . तोपर्यंत ह्याला थोडं पाज म्हणजे ते झोपून जाईल आणि तुलाही विश्रान्ती घेता येईल . "

असं म्हणून आई समीर शी बोलवायला गेली आणि सीमा बाळाला दूध पाजत पुढच्या घटनांचा विचार करत होती

बघूया पुढच्या भागात समीर काय करतोय ते ? तुम्हाला काय वाटते समीर बाळाला जवळ करेल का ?