Login

नकोशा भाग २

एका मुलाची कथा
नकोशा

भाग २

मागील भागात आपण पहिले की , सीमा गोंडस बाळाला म्हणजे मुलाला जन्म देते . त्यामुळे समीर नाराज झालंय . आई सीमाशी बोलून समजवायला समीर कडे येते .

" समीर , काय झालं ? असं का बसलाय बाळा ?" आई म्हणाली

" अगं आई , मला मुलगी हवी होती ग . म्हणजे घरात लक्ष्मी नांदली असती ना ?"

" बाळा , ते आपल्या का हातात आहे . देवाने काही ठरवूनच तुला मुलगा दिला असेल ना ? तू मुलाला बघितलं नाही. किती गोंडस बाळ आहे . नको ते विचार सोड , समोर जे बाळ आहे ना त्याचा प्रेमाने स्वीकार कर ."

त्याने आईला दुखवायला नको म्हणून फक्त मानेने होकार दाखविला. पण त्याच्या डोक्यात तोच विचार चालू होता. आईच्या सांगण्यावरून तो सीमाला बघायला आत आला .

सीमा समीर कडे बघून म्हणाली , " अहो , बघा किती गोंडस दिसतोय ?"

समीर बाळा कडे न बघता सीमाला म्हणाला, " तू कशी आहेस ? आता कसे वाटतंय ?"

" मला छान वाटतंय . पण तुम्ही नाराज आहात का ? "

" नाही ग मी नाराज पण ........ "

" अहो . माझ्या हातात काही नव्हते . नाहीतर ..... "

" तू नको विचार करू जास्त . मी नाही काही म्हणतं . तुझी आणि त्यांची काळजी घे . मी येतो घरी जाऊन . आई आहेच तुझ्या बरोबर . मी आलोच जाऊन . "

समीर मन शांत करायला आधी देवीच्या देवळात गेला . सुबोध घरी एकटाच आहे हा विचार करून तो जरा वेळाने घरी निघाला.

घरचं आणि दवाखान्यातील समीर दोन्हीकडे बारकाई ने लक्ष देत होता. बघता बघता चार पाच दिवस झाले अन आज सीमाला घरी आणले . सासूबाई जातीने तिच्याकडे लक्ष देत होत्या .

बघता बघता चार - पाच महिने कसे उलटून गेले कळलंच नाही . त्याच्या डोक्यात अजून तोच विषय असल्याकारणाने सीमा आणि सासूबाईंनीच बारश्याची तयारी केली .

बारश्याला पण तो लवकर आलाच नाही . जवळ जवळ सगळे पाहुणे जमा झाले होते पण याचा काही थांगपत्ता च नव्हता . शेवटी सीमा ने फोन केला तेंव्हा तो हजर झाला. थाटामाटात बारसे झाले आणि छोटयाश्या गुंडू चे नाव ' श्रेयस ' ठेवले.

एक दिवस समीर कामावरून घरी आला तेंव्हा नुकताच चालायला शिकलेला श्रेयस चालत चालत बाबांन जवळ आला . समीर त्याकडे च बघत होता . एक मन सांगत होत कि त्याला घ्यावं आणि दुसरे मन म्हणत होते ,' नको , याने येऊन माझी स्वप्ने चूर केली . . कशाला उगाच . जाऊदे. .

तो त्याला तिथेच सोडून सुबोधला आवाज देत घरात आला . हे आतून बघणारी सीमा पळत च श्रेयस कडे आली आणि त्याला घेऊन आत निघून गेली. ती मनातल्या मनात रडत होती . आपला नवरा असा का वागतोय ? तो कधी श्रेयसला आपला मानेल . याचा सारखा विचार करत होती. तिला काय करावे हे सुचतच नव्हते.

ती सारखी श्रेयस ला समीर जवळ आणायचा प्रयत्न करत होती. रोज नवीन प्रयोग करायची .

बघूया पुढच्या भागात तिच्या प्रयत्नांना यश येते का ते ?