नकोशा
भाग ३
मागील भागात आपण पहिले कि सीमा समीर आणि श्रेयस ला जवळ आणायचा प्रयत्न करते . पण तो काही सफळ होत नाही. ह्या प्रयत्न मध्ये समीर त्याच्या बाजूने विचार करत होता पण दुसरे मन त्याला साथ देत नव्हते . म्हणून तो त्याच्यापासून बाजूलाच राहत .
बघता बघता श्रेयस शाळेत जाऊ लागला. अभ्यासात हुशार होताच पण तो सुबोध पेक्षा आईला घर कामात जास्त मदत करत असे . समीर च्या लाडापायी सुबोध खूप आगाऊ आणि भांडखोर व्हायला लागला होता.
सीमा वेळोवेळी त्याला समजावत होती पण तो आईचा सुद्धा पाणउतारा करत असे . हे श्रेयस बघत पण सुबोधच्या भीतीने त्याला काही बोलत नसे. बाबांना सांगावे तर बाबा कधीच त्याच्याशी बोलत नसतं . तो आईला होणार त्रास बघू पण शकत नव्हता आणि काही करू पण शकत नव्हता .
एकदा सुबोध ने आजीला पण उलट उत्तर देऊन ढकलून दिले . आजी भिंतीला धडकली . त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला. श्रेयस लगेच जवळ जाऊन आजीला उचलून गादीवर झोपवले . आई आणि श्रेयस ने आजीची सगळी काळजी घेत होते तर इकडे सुबोध बाहेर निघून गेला .
हे सगळं बाबा बाहेर उभे राहून बघत होते . त्या वेळी श्रेयस वाईट नाहीये हे मन सांगत होते . पण अजून हि ती मुलगी नाही हे डोक्यातून विचार काही जात नव्हता .
तेंव्हा पासून बाबा श्रेयसच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देत असत पण त्याच्याशी कधी बोलत नसत .
शाळेचे वर्षे कशी गेली कळलीच नाही. श्रेयस दहावीला शाळेत पहिला आला . सगळ्यांनी खूप कौतुक केले. त्यावेळी बाबांनी त्याला पहिल्यांदा पेढा भरवला आणि अभिनंदन पण म्हणाले.
हे ऐकून श्रेयस खूप खुश झाला. तो आईला जोरात मिठी मारून आनंदाने म्हणाला , " आई , बाबा आज माझ्याशी बोलले. मी खूप खुश आहे. मी आता बाबांना खूप मोठा होऊन दाखवणार . "
" बाळा , हो तू खूप मोठा होऊन दाखव . आता तू जशी आजीची , माझी काळजी घेतो तशी बाबांची पण काळजी घे. ते बोलो अगर ना बोलो . तू कायम त्यांच्या बरोबरीने राहा . घेशील ना बाळा काळजी ?"
" हो आई , नक्की काळजी घेईन त्यांची . "
" बाळा , आता पुढे काय ठरवलय ?"
" संध्याकाळी सांगतो . मी आता जरा अमित कडे जाऊन येतो . "
" बरं "
श्रेयस अमितकडे जातो सांगून गावाच्या टेकडीवर एक छोटसं देऊळ होते तिथे येऊन बसला. पुढे काय करायचे याचा विचार करत होता . तेवढ्यात तिथे एक मुलगा आपल्या गाईंना चरायला घेउन आला होता . तो श्रेयस च्या ओळखीचाच होता . ज्या ज्या वेळी बाबा त्याच्याशी बोलत नव्हते त्या त्या वेळी त्याला खूप वाईट वाटे तेंव्हा तो ऐकटा येऊन बसत . आणि तो मुलगा आपल्या गाईंना चरायला घेऊन येत असे .
तो मुलगा म्हणाला, " काय रे आज रिझल्ट होता ना ?"
" हो . मी शाळेत पहिला आलो . हे घे तुला पेढा . "
" अरे वा अभिनंदन "
" तुला माहितीय आज बाबा माझ्याशी बोलले . मी खूप खुश आहे . पण तुला माहितीय आईने मला त्यांची काळजी घ्यायला सांगितलंय . "
" मग हे तोंडपाडून का सांगतोय . "
" अरे मी तुला म्हंटले होते ना मला मोठा ऑफिसर व्हायचयं . पण ... ?"
" हो पण त्यासाठी तू इथे राहू नाही शकत . तुला आपल्या गावातून शहरात जावे लागेल. मग आता तू काय करणार ?"
" तेच मला कळत नाहीय ."
" तुला एक सांगतो . तुझ्या बाबांना अजून तुला आपलं मानले नाहीय . याचाच फायदा घेऊन तू शहरात जा. याने काय होईल . तुला बाबांना मोठं होऊन दाखयवाचे आहे . या विचाराने तुझा अभ्यास चांगला होईल . तू कुठे भरकटणार नाही. आणि तू मोठा ऑफिसर होऊन आला स कि तू बाबांची काळजी घे . आणि ते पण तुला मानतील .
या बाबतीत तू सगळ्या बाजूने विचार कर मग निर्णय घे . चल मी जातो माझ्या गाई कुठे गेल्या ते बघतो . " असं म्हणून तो निघून गेला. आणि श्रेयस तिथेच विचार करत बसला .
बघूया पुढच्या भागात काय निर्णय घेतोय श्रेयस ते ?
क्रमश :
सौ . चित्रा अ . महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा