नकोशा
भाग ४
मागील भागात आपण पहिले कि ,श्रेयस दहावी ला पहिला आला . बाबांनी त्याचे कौतुक केले. तो खूश होतो तर ऐकीकडे आईच्या बोलण्यामुळे विचारात पडतो. त्या विचारात च नेहमी प्रमाणे टेकडी वर येऊन बसतो. तिथे त्याचा मित्र त्याला काही गोष्टी सांगतो त्यावर तो विचार करतोय आता . पुढे
तो काही काळा नंतर घरी येतो . घरी आल्यापासून शांत असतो . आपल्याच विचारातच असतो. पण या वेळी आई पेक्षा बाबांचे त्याकडे लक्ष होते पण ते काही बोललेच नाही.
या विचारात महिना कधी गेला त्याला कळलेच नाही . पण त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर काही मिळेना . तेंव्हा एकदा सरांनी भेटून पण त्याला पुढच्या शिक्षणाचे विचारले होते तेंव्हा पण काहीच बोलू शकला नाही .
आईला त्याची घालमेल काळत होती म्हणून तेंव्हा तिने त्याच्याशी बोलायचे ठरवले . म्हणून तिने श्रेयस ला आज गावाच्या बाजारात घेऊन जायचे ठरवले . गावाच्या बाजारात त्याची आई थोडाफार भाजीपाला विकत असे. तो आई बरोबर गेला . तिथे जाऊन त्याला प्रश्नच पडलं होता आता काय करायचे ?
आईच्या हे लक्षात आले म्हणून आई " जा एक फेरफटका मारून ये बाजारात " असं म्हणाली .
इकडे आई विचार करू लागली या मुलाला कसे बोलते करू . एक मुलगा खूप विचार करून वागतो अन दुसरा कोणताही विचार न करता मनाला वाटेल तसे वागतो. आपण उगाच त्याला म्हणाले का कि बाबांची काळजी घे . त्यांमुळे पोरगं पार सुकून गेलाय . त्याची शिक्षणाची इच्छा असेल तर ... काय करू देवा . तूच मार्ग दाखव रे बाबा . " असे म्हणून तिने वरती बघून हात जोडले ..
ती आपली भाजी विकत बसली होती . श्रेयस फिरून तिच्या जवळ येऊन बसला. " आई , अगं भाजी काहीच विकली नाही गेली ग ? का ग ?"
" अरे बाळा माझ्याकडून त्या भाजीला पाणी कमी पडले ना त्यामुळे ती बारीकच राहिला ना ? "
" मग आता ती विकली नाही का जाणार ?"
" जाणार ना बाळा , आलेल्या परिस्थितीतून आपण च मार्ग काढायचा असतो . आता तू सांग काय मार्ग काढशील ? विचार कर बर ?"
" आई , मी कशा काय मार्ग काढणार . मला त्याबद्दल काहीच माहित नाही ."
" बरोबर , म्हणजे एखादी समस्या आल्यावर ती सोडवायची असेल तर आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे . हे बघ मी काही शिकली नाहीय पण . बाजारातील माला चे निरीक्षण केले. त्यावर विचार केला तेंव्हा आपली काय चूक आहे हे लक्षात आले मग आता मी जर भाजी बाजारातील किमती पेक्षा कमी विकली तर ती खपेल . मग आता मी किंमत कमी केली . "
' अगं पण आई , त्यातून आपला नफा कमी होईल कि ?"
" हे बघ बाळा , आता नफा च्या विचार नाही करायचा तर आता आपला माल विकला गेला पाहिजे नाहीतर पूर्ण नूकसान आपलंच आहे . हो कि नाही ?"
" हो . तुझे बरोबर आहे . "
हे बोलता बोलता मध्ये आई भाजी विकत होती . आणि एकीकडे गप्पा मारत होती .
" हे बघ बाळा , मी तुला बाबांची काळजी घे हे सांगितले म्हणून तू खूप विचारात पडला आहेस हे मला कळलंय . त्याचे उत्तर मी देते बघ तुला पटतय का ?"
" हे बघ . मी जर भाजी पिकताना त्याची व्यवस्थित काळजी घेतली असती तर आज मला योग्य भाव मिळाला असता तसेच तुला जर बाबांची काळजी घ्याची असेल तर आधी स्वतःच्या पायावर उभं राहावे लागेल त्यासाठी पुढचे शिक्षण घ्यावे लागेल ना .?"
" हो आई पण मी इथून शिकायला बाहेर गेलो तर ... "
" मी आणि बाबा अजून हालचाल करतोय तो पर्यंत तू शिकून मोठा हो. तू तुझ्या पायावर उभा राहिला कि मग आमची काळजी घे . तो पर्यंत जसे भाजी ला पाण्याची गरज आहे तशी तुझ्या गरजा आम्ही भागवू. तुझा दादा आयुष्यात काहीही करणार नाही त्यामुळे तुला त्याला वाटणीवर आणावे लागेल . किती काही झाली तरी हे करायचेच . त्याला उभं करायला मदत करायची पण पूर्ण आधार द्यायाचा नाही . कळल का ? "
" हो आई तुझे अगदी बरोबर आहे . मी शिकून मोठा होणार . आजच जाऊन सरांना पुढची चौकशी करायला सांगतो . "
" आणि एक बाळा . तू आता शिकायला जा पण घरात काहीच सांगू नको . त्यांना आता सांगितले तर ते तुला पाठवणार नाही. मी माझ्या बाजूने ते सांभाळून घेईन . मी मामा ला तुझ्या कडे लक्ष द्यायला सांगेन . "
" आई मी तुझे नाव खराब होईल असे कधीच नाही वागणार . तू माझे टेंशन कमी केले. मी उद्याच मामा कडे जातो . "
" जा बाळा . खूप शिक , खूप मोठा हो . आई बापाला विसरू नको . "
" हो आई काळजी नको करू मी मोठा माणूस होऊन दाखवेल . "
" चल आता घरी जाऊया . हे पैसे घे उद्या तुला जायला उपयोगी होतील. थोडे थोडे पैसे मी मामा कडे पाठव जाईन . पण तू जपून वापर बरं . "
" हो ग आई . "
दोघेही घरी येतात. रस्त्यात श्रेयस पुढे काय करायचे याचा विचार करत असतो तर आई आता बाबा काय म्हणतील याचा विचार करत होती. या विचार मध्ये घरी कधी आले त्यांनाच कळले नाही .
बघूया पुढच्या भागात श्रेयस बाहेर पडेल का ते ?
क्रमश :
सौ . चित्रा अ . महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा