नकोशा
भाग ५
मागील भागात आपण पहिले कि आई श्रेयस ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन पुढचा मार्ग पण दाखवून दिला . ह्या मार्गा वरून जाताना कष्ट , नाराजगी हे पार कडून तुला पुढे जायचंय हे आई त्याला पदोपदी सांगत होती.
" बाळा , तू लहान असल्यापासून खूप काही सहन केलंयस पण त्यामुळे तू मोठा होतोयस . तुला शिकून मोठा माणूस बनून दाखवून द्यायचे आहे जी माणसे तू का जन्माला आला म्हणून तुला बोलत होते ना त्यांना . "
" हो नक्की "
" बाळा तू उद्या मामा कडे गेल्यावर सुट्टी आहे तोपर्यंत मामला शेतात मदत कर . तुझे शिक्षण चालू झाले तरी मामाची साथ सोडू नको . त्याला मदत केल्यामुळे कोणी नाराज होणार नाही आणि तुझ्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही . "
" बाळा तू उद्या मामा कडे गेल्यावर सुट्टी आहे तोपर्यंत मामला शेतात मदत कर . तुझे शिक्षण चालू झाले तरी मामाची साथ सोडू नको . त्याला मदत केल्यामुळे कोणी नाराज होणार नाही आणि तुझ्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही . "
" हो आई करेन मामाला मदत . "
" चल आता जेऊन घे . म्हणजे लवकर झोपशील आणि सकाळी लवकर उठून जात येईल. "
श्रेयस रात्रभर जागा होता . मनात खूप विचार घोळत होते . तर आई आता या लोकांना काय उत्तर द्यायचे ? आपण त्याच्यावर विश्वास ठेवलाय पण तो करेन सगळे . या आणि अश्या बऱ्याच विचाराने ती तळमळत होती .
श्रेयस रात्रभर जागा होता . मनात खूप विचार घोळत होते . तर आई आता या लोकांना काय उत्तर द्यायचे ? आपण त्याच्यावर विश्वास ठेवलाय पण तो करेन सगळे . या आणि अश्या बऱ्याच विचाराने ती तळमळत होती .
दुसऱ्या दिवशी श्रेयस मामाकडे गेला . तो गेल्यावर आई काही झालेच नाही असे घरात वावरत होती . त्यामुळे रात्री पर्यंत कोणाला काहीच कळले नाही . पण रात्री श्रेयस नेहमीच्या जागी झोपलेला दिसला नाही तेंव्हा बाबांनी आईला विचारले , " काय ग कुठे गेला तुझा लाडका ? अजून घरी नाही आला का गेला भावासारखा उंडारायला गेला . "
भीतीने थरथरत आई शांत उभी होती . परत एकदा बाबा जोरात ओरडले तेंव्हा आई बोलणार तर मध्येच सुबोध बोलला , " अहो बाबा , तो गेला मामाकडे . सकाळी गुपचूप निघून आणि त्याला आईने साथ दिली . "
" काय तो बरोबर बोलतोय का ?"
आईने खरं ते सांगावे असा विचार करून आई म्हणाली , " हो मी च पाठवले . त्याला पुढचे शिकायचे आहे आणि तो सुबोध पेक्षा नक्कीच शिकून मोठा होईल याचा मला विश्वास आहे . म्हणून मी पाठवलं आहे . आणि जो पर्यंत तो मोठा माणूस होत नाही तोपर्यंत यायचे नाही हे पण सांगितले आहे आणि अस हि तो तुम्हाला कोणालाच तुमच्या डोळ्या समोर नको होता ना त्यामुळे आता तुम्ही काही काळजी करू नका . आता या विषयावर काही हि चर्चा करायची नाही आणि सुबोध तुला सांगते , जर तू तिथे जाऊन त्याला जर त्रास दिला ना तर तुझे हात पाय जागेवर राहणार नाही याची मी काळजी घेईन . झोपा आता सगळे. उद्यापासून आपल्या आपल्या कामाला जायचे आहे . "
असे म्हणून आई झोपून गेली . आणि बाबा काही विचार करत होते त्यामुळे बराचं वेळ जागेच होते .
या नंतर परत कोणीच श्रेयस चे नाव काढले नाही .
श्रेयस आईला वेळोवेळी त्याची ख्यालीखुशाली कळवत होता . त्यामुळे आई आनंदात होती. पोरगा योग्य मार्गावर आहे याचा तिला खूप आनंद होत होता .
बघता बघता दहा वर्ष गेली . एका दिवशी सकाळी सकाळी श्रेयस दारात येऊन उभा राहिला . श्रेयस बँकेचा अधिकारी झालेला बघून आईचे डोळे आनंदाने भरून निघाले .
त्यांनी आनंदाने स्वागत करून घरात घेतले . बाबांना खूप आनंद झाला होता चला मुलगी नसून सुद्धा या मुलाने घराचे नाव उज्ज्वल केले. आज या मुलाने मला अजून एक मुलगा असल्याचे जे दुःख होत ते याने त्याच्या कर्तृत्वाने फुंकर घालून दूर केल.
बाबा श्रेयस समोर हात जोडून म्हणाले , " बाळ , मी चुकलो. मी तुझ्या वर सारखी सारखी चिडचिड , वागणूक चुकीची दिली . मला माफ कर बाळा . "
बाबा श्रेयस समोर हात जोडून म्हणाले , " बाळ , मी चुकलो. मी तुझ्या वर सारखी सारखी चिडचिड , वागणूक चुकीची दिली . मला माफ कर बाळा . "
" अहो , बाबा माफी काय मागताय . माझा काही तुमच्यावर राग नाही . मला माहितीय लपूनछपून का होईना तुम्ही पण माझ्यावर प्रेम केलाय आणि करतंय. हे खूप आहे. आता तुम्ही कोणती काळजी करू नका . हा मुलगा तुमच्या कायम बरोबर आहे . कारण माझी आपल्याच गावात बदली झाली आहे . आता मी इथेच आहे. "
" अरे व्वा . पण बाळा तुला दादा खूप त्रास देईल ना ?"
" तुम्ही त्याची काही काळजी करू नका . मी दादाला सुधारायला आधीच सुरवात केलीय आता त्यात तुम्ही सगळे साथ द्या . "
" हो नक्की साथ देईन. अगं सीमा आज गोडाचे जेवण कर ग माझा मुलगा आलंय . त्याचे स्वागत करुया . "
आज सगळी कडे आनंदी आनंद होता . नकोशा असलेल्या मुलाने त्याच्या कर्तृत्वाने त्यांना आपलेसे केलं .
आपण फक्त मुलगी नको याच गोष्टी ऐकत असतो. पण काही ठिकाणी अशीही परिस्थिती आहे समाजात . खरोखरच मुलगा किंवा मुलगी असा भेद कधीच करता कामा नये . कारण हा भेद ज्याच्याबाबतीत होतो ना त्याला खूप मानसिक त्रास होतो आणि ते कुठे न सांगता मनात साठवून ठेवतात . त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला त्याचे पडसाद पहिला मिळतात . कोणीही मुलगा, मुलगी असा भेदभाव करू नये हि कळकळीची विनंती .
धन्यवाद
कथा कशी वाटली ती नक्की सांगा .
सौ . चित्रा अ . महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा