जलद लेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
विषय-दिव्याखाली अंधार
विषय-दिव्याखाली अंधार
नमुनेदार बाई... पमा ताई
भाग-१
दिवाळी संपून पंधरा काय वीस  दिवस होऊन गेलेत . कार्तिक दिवाळी पण होऊन गेली.
आणि इतकी आतषबाजी फटाक्यांची... दारासमोरच आवाज येतोय. जवळच कोण उडवतेय एवढे फटाके?काय आहे आज ?
आणि इतकी आतषबाजी फटाक्यांची... दारासमोरच आवाज येतोय. जवळच कोण उडवतेय एवढे फटाके?काय आहे आज ?
बघायला म्हणून पमा ताई(प्रमिला चा शॉर्ट फॉर्म)बाहेर आल्या.
बघतात तर समोरच्याच सईच्या घरातील लोकच फटाके उडवत होते.घरावर सिरीज.दिव्यांची रोषणाई.
त्यांचा सगळा परिवार तर होताच सोबत पाहुणे मंडळीही दिसत होती.
बघतात तर समोरच्याच सईच्या घरातील लोकच फटाके उडवत होते.घरावर सिरीज.दिव्यांची रोषणाई.
त्यांचा सगळा परिवार तर होताच सोबत पाहुणे मंडळीही दिसत होती.
पमा ताई म्हणजे साता टवळ्यात तेल ओतून येणारी बाई.
"बापा आज काय आहे यांच्या घरी? दिवाळीपेक्षाही दिवाळी साजरी करताहेत."
त्यांनी लगेच फटाके उडवणाऱ्या मुलांना विचारले," अरे ,छोटु ,आज काय आहे रे तुमच्या घरी ?तुम्ही एवढे फटाके उडवत आहात?"
त्यांनी लगेच फटाके उडवणाऱ्या मुलांना विचारले," अरे ,छोटु ,आज काय आहे रे तुमच्या घरी ?तुम्ही एवढे फटाके उडवत आहात?"
"अरे आजी तुम्हाला माहिती नाही का ? आज सई दीदीचं लग्न ठरलं ना.ते बघा नवीन जिजु सई दीदीच्या बाजूला उभे आहेत."
पमा ताई पाहून अवाकच.
नवरा मुलगा राजबिंडा दिसतोय.
नवरा मुलगा राजबिंडा दिसतोय.
तेवढे छोटुचे शब्द ऐकले आणि पमा ताईचे विचार चक्र सुरू झाले.
आठ दिवसा अगोदर तर मी निरोप दिला होता सईसाठी.आमच्या निमाच्या मुलासाठी चांगला इंजिनियर आहे.घरदार चांगले.मुलगा सुंदर.
त्यावेळी तर तिची आई म्हणाली होती ,"अजून लहान आहे मुलगी वर्षभर तरी नाही करायचे लग्न."
अन् आता बर पक्क केलं.
त्यावेळी तर तिची आई म्हणाली होती ,"अजून लहान आहे मुलगी वर्षभर तरी नाही करायचे लग्न."
अन् आता बर पक्क केलं.
असेल काहीतरी काळबेरं
पोरीचं. तिनेच पाहून ठेवला असेल आधीच. म्हणून करून टाकले असेल तडकाफडकी पक्क."
पोरीचं. तिनेच पाहून ठेवला असेल आधीच. म्हणून करून टाकले असेल तडकाफडकी पक्क."
शेंडा ना बुडूख पण अकलेचे तारे तोडणे सुरू झाले पमा ताईंचे.
इतका वेळ दम कुठे होता लगेच पायात चप्पल सरकवली आणि निघाल्या सईकडे बित्तंबातमी घ्यायला.
बातमी कळताच...
लगेच सगळ्या गावभर पसरवायला मोकळ्या .आणि सर्वात पहिले मीच सांगितलं मलाच माहिती झालं हा आनंद आणखीच वेगळा.
"अगं, तुला माहित नाही का?ने सुरु होणार मग इत्यंभूत स्टोरी सांगणार.
तिखट मीठ लावून , थोडं आपल्या पदरचंही जोडून.
पमा ताई पदर खोचून सज्जच होत्या.

...........
खरे तर शरद ला इतक्या लवकर  सईचं च लग्न करायचं नव्हतंच. आता तर पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं.
एखाद वर्ष नोकरी, थोडं घरीही राहील भावंडांसोबत. तिलाही मोकळा वेळ मिळेल.
एखाद वर्ष नोकरी, थोडं घरीही राहील भावंडांसोबत. तिलाही मोकळा वेळ मिळेल.
पण योगायोगच असा जुळून आला. नाही म्हणायला जागाच नव्हती.
एवढं चांगलं स्थळ हातचं का घालवायचं? प्रश्न पडला होता त्याला.
"आपण होऊन आलेलं पहिलं स्थळ का उगाच नकार द्यायचा ? पुढे नाट लागला तर...?"सरलनेही आपला विचार बोलून दाखवला.
"आपण होऊन आलेलं पहिलं स्थळ का उगाच नकार द्यायचा ? पुढे नाट लागला तर...?"सरलनेही आपला विचार बोलून दाखवला.
असा सगळ्यांचा 
विचार घेऊन, विषेशत: सईशी बोलून शरदने समोर आदल्या दिवशी होकार कळवला.
विचार घेऊन, विषेशत: सईशी बोलून शरदने समोर आदल्या दिवशी होकार कळवला.
आणि आज मुलाकडील मंडळी , मुलगा त्यांच्या चार  नातेवाईक मंडळी सोबत साक्षगंधासाठी आलेत.
सई कडीलही चार लोकं मिळून साक्षगंधाचा कार्यक्रम चांगला पार पडला. दोघांनाही कुंकुम तिलक लावून साखरपुडे दिले. सगळ्यांची जेवणं झालीत घर आनंदाने भरून गेले होते.
सई कडीलही चार लोकं मिळून साक्षगंधाचा कार्यक्रम चांगला पार पडला. दोघांनाही कुंकुम तिलक लावून साखरपुडे दिले. सगळ्यांची जेवणं झालीत घर आनंदाने भरून गेले होते.
आणि त्याच आनंदा प्रित्यर्थ बाहेर फटाक्यांची एवढी आतशबाजी सुरू होती.
अगदी अचानक ठरल्यामुळे कोणालाच काही सांगितले गेले नव्हते.
तरी आजूबाजूचे शेजारी आनंदात सामील झाले होते.
पण पमाताईसारख्या असतातच एखाद्या खोचक.
अगदी अचानक ठरल्यामुळे कोणालाच काही सांगितले गेले नव्हते.
तरी आजूबाजूचे शेजारी आनंदात सामील झाले होते.
पण पमाताईसारख्या असतातच एखाद्या खोचक.
पुढे काय घडते ते बघुयात पुढील भागात.
क्रमशः
पुढील
भाग- २ मधे
©®शरयू महाजन
क्रमशः
पुढील
भाग- २ मधे
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा