Login

नणंद भावजय भाग ३

नात्याची गोष्ट
नणंद भावजय

भाग३

माहीने आई व आजीला विचारून श्रुती बरोबर बाहेर जायचे ठरवले . त्यासाठी ती श्रुतीच्या दवाखान्यात आली. श्रुती लहान मुलांची हसत खेळत तपासत होती आणि माही धाडकन आत आली .अशा येण्याने ती पोर घाबरली आणि श्रुती डोळे मोठे करून माही कडे बघायला लागली. माही गुपचूप आत येऊन बसली . श्रुतीचे काम झाल्यावर श्रुतीने माहिला विचारले "आज इकडे कसे काय?" मला कॉलेज अभ्यास करून खूप कंटाळा आलाय. तर मी म्हणत होते की आपण मस्त फिरून येऊ येताना मस्त पाणीपुरी आणि कोल्ड कॉफी वर ताव मारून येऊ कसा वाटतोय प्लॅन?"
मस्त पण माझे अजून दोन-तीन पेशंट राहिलेत ते झाले की आपण जाऊ ठीक आहे. मी थांबते तोपर्यंत श्रुती आपलं काम करायला लागली. माही तोपर्यंत सगळीकडे दवाखान्यात फिरत होती. तेवढ्यात माहिला सागरने बघितले. सागर त्यांची चौकशी करायला लागला तेवढ्याच श्रुतीने येऊन माहिची ओळख करून दिली. थोड्यावेळ बोलून श्रुती व माही निघाल्या भटकायला.
महिने तिच्या कॉलेजच्या कट्ट्यावर श्रुतीला घेऊन आली. आपल्या सगळ्या मित्र-मैत्रिणींशी ओळख करून दिली. श्रुती पण त्यांच्यातली एक होऊन गप्पा मारत होती. श्रुती त्यांच्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठी होती त्यामुळे मित्र-मैत्रिणींना पण ती आपल्यातलीच वाटत होती. सुरुवातीला महिने ओळख करून दिल्यावर सगळेजण घाबरत घाबरत बोलत होते. पण श्रुतीही त्यांच्यासारखी बोलायला लागल्यावर सगळेजण हसतमुखाने बोलत होते. नंतर माही व श्रुती ठरल्याप्रमाणे पाणीपुरी खायला गेल्या.
तिथे जाईपर्यंत महिने तिच्या आयुष्यातील बऱ्याच लहान सहान गोष्टी सांगितल्या. माहीने काही अडपदरा ठेवला नसल्यामुळे श्रुती पण तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी मोकळेपणाने सांगितले. यामुळे त्यांचे नाते नणंद भावजय न राहता सख्या बहिणी किंवा जिवलग मैत्रिणी प्रमाणे झाले होते.
असेच दिवस सरत होते. श्रुती आधी मध्ये माहिला तिच्या अभ्यासात मदत करत होती आणि माही श्रुतीला स्वयंपाकात मदत करायची . त्या दोघी मिळून रविवारी सुट्टी असल्यावर नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करायच्या. त्यात एकदा माहिला चुकून तळ हाताला भाजले. सगळ्यांनी तिची काळजी घेतली. बाहेर गेलेला समीर घरी आल्यावर त्याने ते पाहिले. काय घडले हे ऐकून न देता समीर श्रुतीवर ओरडला. पण माहीने श्रुतीची बाजू घेतली व कसे भाजले ते नीट समजावून सांगितले. समीरला ते ऐकून खूप वाईट वाटले .आपण तिचा नवरा असून सुद्धा तिला समजून न घेता आज माहीने किती छान समजून घेतले. त्या दोघींमध्ये सलोखा पाहून घरातले सगळे खूप खुश झाले .जुन्या पिढीप्रमाणे माहीने नणंद म्हणून काही दंगा न घालता उलट सलोख्याने तिला श्रुतीला आपल्यात छान सामावून घेतले होते. त्या दोघींचे एकमेकींशिवाय अजिबात करमत नसे.
एकदा माहीच्या आते भावाचं लग्न म्हणून सगळ्यांना गावाकडे जायचे होते. श्रुतीने कधीही गाव पाहिले तसेच राहिली ही नव्हती त्यामुळे तिला खूप भीती वाटत होती. पण माही बरोबर आहे म्हणून ती थोडी शांत झाली .
दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी सात वाजता गावाकडे जायचे ठरवले व सगळे झोपायला गेले
0

🎭 Series Post

View all