नणंद भावजय
भाग ४
ठरल्याप्रमाणे सगळे सकाळी आत्याच्या गावी जायला निघाले . गाडीत माही आणि श्रुती या दोघींची नुसती बडबड चालू होती . मध्येच फोटो काढत होत्या.. चेष्टा मस्करी करत होत्या . हे सगळं करत करत ते आत्याकडे पोहोचले .
आत्या थोडी जुनी वळणाची असल्यामुळे तिला मानपानाची खूप सवय होती. गाडीतून उतरताना श्रुतीने बॅग उचलण्यासाठी माहिला नावाने आवाज दिला आणि तो आत्याने ऐकला. माहिला आहो जाऊ न करता नावाने हाक मारल्याचे आत्याला खटकले. पण माहिला या स्वभावाची सवय असल्यामुळे माहीने त्याकडे लक्ष दिले नाही. पण आत्या बोललेले श्रुतीच्या मनाला लागले. श्रुतीने इथे असेपर्यंत माहिला अहो ताई म्हणायचे हे ठरवून टाकले.
आल्यापासून लग्नाची गडबड चालू झाली. सगळे धावपळीत होते .त्यातही आत्याचे श्रुतीकडे बारकाईने लक्ष होते . ती मोठ्यांशी कसे वागते, घरातली कामे कसे करते हे ती बारकाईने बघत होती. श्रुतीच्या हातातून दडपणामुळे थोड्या थोड्या चुका होत होत्या पण माही प्रत्येक वेळेला तिला साथ देऊन ,समजून घेऊन चुका सुधारत होते त्यामुळे श्रुती शांत होती.
लग्न मोठ्या उत्साहात छान स्वरूपात पार पडले. दुसऱ्या दिवशी पूजा होते त्याची तयारी श्रुती करतच होती. आणि नेहमीप्रमाणे माही मदतीला होती हे बघून आत्या नाराज झाली . पण ती काही बोलली नाही. सगळे विधी झाल्यावर तरुण मंडळी देवदर्शनाला निघून गेले . तिथे नवीन जोडप्याला चिडवत , खेळी मिळणे उत्साहाने देवदर्शनाला गेले . श्रुती पण आनंदाने यात सामील झाली. माहीने श्रुती व समीरला चिडवायचा एकही चान्स सोडला नाही. देवदर्शन घेऊन खूप फोटो काढून सगळे परत निघाले. वाटते ते एका ठिकाणी थांबून जेऊन आईस्क्रीम खाऊन पुढच्या प्रवास सुरू केला.
आत्याने श्रुती व माही नाही हे बघून तिच्या आई व वहिनी जवळ श्रुतीचा विषय काढला. पहिल्यांदा श्रुतीने कसे वहिनी प्रमाणे राहून सगळे लग्न कसे छान पार पाडले याचे कौतुक केले . आनंदाने आजी व आजीबाई पण त्याचे तिचे कोड कौतुक करत होत्या .bहळूच आत्याने विषय काढला काय हो वहिनी श्रुतीला सगळ्यांना मानाने बोलवता येत नाही का ? म्हणजे बघा ना माहीला आहो ताई किंवा नणंद बाई असं म्हणायचं, तिच्या हातात चहा पाणी द्यायचे. तिची सगळी काम करायची तर माहित तिची काम करते .
हे बोलायला आणि माही आत यायला एकच वेळ झाली . माही कितीही खोड्या काढणारे, खेळी मिळीने राहणारी असली तरी कोणी खोटं बोललं, भांडण लावलेली तिला सहन होत नसेल. माही चिडून बोलली," आत्या काय ग कोणत्या काळात राहते . अगं पूर्वी वहिनी आणि नणंद मध्ये खूप अंतर होते. वयाने मोठी होती त्यामुळे अहो जाव केलं जायचं . आता माझ्यात आणि श्रुतीत असं किती अंतर आहे . माझं लग्न झालं नाही म्हणून मी मस्ती, गोंधळ घालू शकते, कोणते हवे ते कपडे घालू शकते, कोणाबरोबर बोलू शकते मग ती पण माझ्याच वयाची असून सुद्धा हे सगळं करू शकत नाही का ? का तर तिचं लग्न झालं म्हणून .
अग पण ती आज घरातलं सगळं सांभाळून लहान मुलांचे डॉक्टर म्हणून काम योग्य रीतीने पार पाडते. ती तिच्या दोन्हीकडच्या जबाबदाऱ्या खेळीमेळीने उत्साहाने पार पाडते . मी पण छोटी बहीण किंवा सख्खी मैत्रीण म्हणून समजून घेऊ तिच्या बरोबरीने वागले तर काय चुकलं. यामुळे ती कायम माझ्या बरोबरीने राहील. माझ्यात काही फरक करणार नाही . माझ्या सुखदुःखात ती मनाने सगळ्या जबाबदाऱ्या छान पार पाडेल . आमची मन जुळली असल्यामुळे ती आईप्रमाणे माया, प्रेम देईल यात शंका नाही . या सगळ्यामुळे आम्ही नुसत्या नणंद भावजया न राहता आज त्यापेक्षाही पुढच्या नातं निर्माण झाले आणि ते कायम राहू असे आशीर्वाद दे बाकी काही बोलू नकोस एवढंच म्हणेन मी."
एवढं बोलून माहीने आत्यासमोर हात जोडले..आणि माही व श्रुतीचे नातं पहिल्या सारखे झाले.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा