नणंद भावजय-सख्ख्या मैत्रिणी...भाग 1
जलद कथा लेखन स्पर्धा
©®ऋतुजा वैरागडकर
जलद कथा लेखन स्पर्धा
©®ऋतुजा वैरागडकर
सायलीचा गृहप्रवेश झाला आणि प्रधानांच्या घरात सुन आली.
सुरेश प्रधान आणि गायत्री प्रधान यांचा विवेक एकुलता एक मुलगा होता, लाडाकोडात वाढलेला, नको ते व्यसन बाळगणारा.
मुलगी मृणालिनी ही विवेक पेक्षा दोन वर्षांनी मोठी होती.
तिचं लग्न झालेलं होतं आणि ती सेटल झालेली होती.
मुलगी मृणालिनी ही विवेक पेक्षा दोन वर्षांनी मोठी होती.
तिचं लग्न झालेलं होतं आणि ती सेटल झालेली होती.
सायली लग्न करून आली आणि लग्नाच्या रात्रीच तिला धक्का बसला.
पहिल्या रात्रीचं मुलीचं जे स्वप्न असतं तेच स्वप्न सायलीचं होतं पण ते स्वप्न स्वप्नच राहिलं.
पहिल्या रात्री सायली तिच्या खोलीत बसलेली होती, अपेक्षा होती नवरा येईल, हळूच तिच्या चेहऱ्यावर झाकलेला पदर बाजूला करेल आणि चेहरा बघेल, तिच्यावर प्रेम करेल. पण तसं काहीच घडलं नव्हतं.
त्याने खोलीत प्रवेश तर केला पण नशेतच... नशेच्या धुंदीत होता तो. नशेच्या धुंदीत आत आला आणि तसाच बेडवर पडला. सायलीला तर धक्काच बसला, ती तशीच बिचारी रात्रभर रडत राहिली.. पण आता रडूनही काही उपयोग होणार नव्हता. समोरचे दिवस चेहऱ्यावर खोट हास्य ठेवूनच जगावं लागणार होतं.
दुसऱ्या दिवशी सायलीने मृणालिनीला सगळं सांगितलं. विवेक असा वागेल यावर तिचाही विश्वास बसत नव्हता.
तो व्यसनाधीन आहे हे सगळ्यांना माहीत होतं पण तरीही.. आता लग्न झालंय आता सुधारेल अशीच अपेक्षा सगळ्यांना होती.
तो व्यसनाधीन आहे हे सगळ्यांना माहीत होतं पण तरीही.. आता लग्न झालंय आता सुधारेल अशीच अपेक्षा सगळ्यांना होती.
दुसऱ्या दिवशी तो अगदी नॉर्मल होता जस काही घडलंच नव्हतं.
सायलीला विवेकशी बोलायचीसुद्धा इच्छा होत नसे पण मृणालिनीने तिला समजावलं त्यामुळे तिने स्वतःच्या मनाला समजावलं आणि ती नॉर्मल झाली.
आता सायलीचा छान संसार सुरू झाला, विवेकही तिच्याकडे लक्ष द्यायला लागला होता. हळूहळू सगळं नॉर्मल होत चाललेलं होतं. वाईट सवय होत्या पण तो तिच्यावर प्रेम करायला लागला होता हे खुप महत्त्वाचं होतं सायली साठी म्हणून सायलीने स्वतःला सावरलं.
ती त्याच्याशी प्रेमाने वागायला लागली, नव्याचे नऊ दिवस संपले, विवेकही त्याच्या बिजनेस कडे लक्ष द्यायला लागला. सगळं सुरळीत चाललेलं होतं. सायलीची सासू पण तिच्याशी नीट वागायची. मृणालिनी काही दिवस थांबून ती तिच्या सासरी गेली. सायली सगळ्यांच खूप प्रेमाने करायची. तिच्या हातचं जेवण सगळ्यांना आवडायचं.
बघता बघता लग्नाला एक वर्ष पूर्ण झाला आणि सायलीने घरात सगळ्यांना गोड बातमी दिली.
बघता बघता लग्नाला एक वर्ष पूर्ण झाला आणि सायलीने घरात सगळ्यांना गोड बातमी दिली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा