नणंद भावजय-सख्ख्या मैत्रिणी...भाग 4 अंतिम
©® ऋतुजा वैरागडकर
सायलीच्या प्रस्तावाला सासू-सासर्यांनी झुगारलं. सायलीने तो विचार सोडला. ही गोष्ट मृणालिनीच्या कानावर गेली आणि तिने सायलीला फोन केला, सायलीशी बोलली. सायलीने तिला सगळं सांगितलं.
"सायली तू घाबरू नकोस." असं म्हणून तिने फोन ठेवला. पुढल्या आठवड्यात ती आई-बाबांच्या घरी आली. तिने तो विषय काढला, आई-बाबांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते समजून घ्यायला तयार नव्हते. सायली आमची सून आहे आणि आम्ही आमच्या सुनेला दुसऱ्यांची सून कसं बनवणार असं म्हणून त्यांनी तिला गप्प केलं. पण मृणालिनी गप्प बसणाऱ्या मुलींपैकी नव्हती. तिने तिचा हट्ट सोडला नाही.
"सायलीच्या सासूने सरळ म्हटलं तुला जर लग्न करायचं असेल तर तुला तुझा मुलगा इथे ठेवावा लागेल. आम्ही तुला मुलगा घेऊन जाऊ देणार नाही."
सायली मुलाला एकटे टाकून कशी जाणार होती? एक आई आपल्या बाळाला सोडून कशी काय जाऊ शकते. यावरही घरात खूप वाद झाले. मृणालिनी याही बाबतीत आई-बाबांना खूप बोलली. बरेच दिवस घरात वाद सुरू होते पण मृणालिनी हरली नाही. तिने सायलीची बहीण आणि मैत्रीण म्हणून तिला साथ दिली.
मृणालिनीच्या ओळखीत एक व्यक्ती होता. वयाने थोडा मोठा होता पण त्याचं लग्न झालेलं नव्हतं. स्वभावाने चांगला होता. घरची परिस्थिती ठीक होती, भावाचं शिक्षण करायचं म्हणून त्याने लग्न केलेले नव्हतं. मृणालिनी त्याच्याशी बोलली. त्याला सायली बद्दल सगळं सांगितलं. तो सायलीला भेटायला तयार झाला.
मृणालिनीने सायलीची आणि त्याची भेट घडवून दिली. दोघे एकमेकांशी बोलले. एकमेकांबद्दल सगळं सांगितलं. त्यानंतर तो तिच्याशी लग्न करायला तयार झाला. मृणालिनीने घरात भांडण करून त्याच्याशी लग्न लावून दिलं. आता राहिला प्रश्न मुलाचा तर त्यातही तिने कोर्टात केस टाकली. वर्षभरात त्याचा निकाल लागला आणि एका आईची आणि मुलाची भेट घडवणारा क्षण आला. आता सायली खूप आनंदात आहे. तिच्या छान संसार सुरू झाला, लग्न झाल्यानंतर वर्षभरातच सायलीला मुलगी झाली. त्यांचा हसतं खेळतं चौकोनी कुटुंब तयार झालं.
समाप्त:
मृणालिनी आणि सायलीचं नणंद भावजयचं नातं असूनही त्या सख्ख्या मैत्रिणी झाल्या. मृणालिनी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. सायलीच्या आयुष्यात आनंद आला. अशीच नणंद प्रत्येक घरात असेल तर सगळ्या घरात आनंदच आनंद राहील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा