मागील भागात आपण पाहिलं की अदिती भावाच्या लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आले. पण तिला गैरसमज होतोय, तर तिला काही गोष्टी खटकत होत्या. आता पाहूया पुढे..
" जा, आदू फ्रेश होऊन ये... "
आईच्या आवाजाने ती भानावर आली.तिला होकार देऊन मान डोलावत ती तिच्या खोलीकडे निघाली, तोच पाठीमागून आईचा पुन्हा आवाज आला.
"आदू, अग तुझं सामान राहुलच्या रूम मध्ये शिफ्ट केलंय. ती रूम अर्पिताला खूप आवडली ना.. मग आम्हीच म्हंटलं तिला की तुम्ही ती रूम घ्या. अदितीला सुद्धा आवडेल."
"अग पण... एकदा तरी मला विचारवस नाही वाटल का?"
आपला राग दाबत ती म्हणाली.
" हा तेच अर्पिता पण म्हणत होती, पण बाबाच म्हणाले,
आदू आपल्या घरचीच लेक आहे, आता अर्पिता सुद्धा आपलीच लेक झाली, आणि आदू तिला तर उलट आनंदाच होईल, तिला काही अडचण वाटणार नाही. मग दोघं वरच्या रूममध्ये गेले."
आदू आपल्या घरचीच लेक आहे, आता अर्पिता सुद्धा आपलीच लेक झाली, आणि आदू तिला तर उलट आनंदाच होईल, तिला काही अडचण वाटणार नाही. मग दोघं वरच्या रूममध्ये गेले."
माझी रूम गेली न मला आनंद होईल हे कसलं लॉजिक....
ती मनातच बडबडली, खरं तर तिला आतून खरंच चांगलाच राग आला, पण चेहऱ्यावर काही न दाखवता ती वरच्या रूमकडे वळली. रूममध्ये शिरताच तिला थोडंसं हलकं वाटलं, पाऊल टाकताच तिला एकदम प्रसन्न फील झालं. तिच्या आवडीच्या रंगाचे परदे, बेडशीट सगळं होत. शिवाय फुल देखील ठेवली होती. एवढा वेळ तिला न विचारता रूम बदलल्याबद्दल राग होताच. पण हे सगळं बघून तिला खूप बरं वाटलं. थोडा वेळ ती फ्रेश होऊन बाहेर गेली तर अर्पिता आई, बाबा आणि राहुल मस्त गप्पा मारत मस्ती करत होते. बाबा सुद्धा एन्जॉय करत होते. ह्याच्याआधी कधीच ते एवढे फ्री तिला दिसले नव्हते. सगळाच वातावरण अगदी उत्साही होत. आधी सगळेच तिच्या मागे मागे असायचे, आल्यापासून आई तिच्या मागे लागायची, पूर्वी तिचं माहेर म्हणजे तिचं राज्य होतं.
आदू काय बनवू? काय खायला आवडेल तुला? दादाला सांगून तुझ्या आवडीच्या जिलेबी आणू का?? अगदी कस भांडावून सोडलं जायचं तिला पण आज मात्र कोणच असं काहीच विचारत नव्हते. ती विचारातच होती कि अर्पिताने आवाज दिला.
" अरे दीदी, झालात तुम्ही फ्रेश झालात, या बसा मी चहा देते. "
अर्पिताने एकदम उत्साहाने म्हंटल आणि अदिती काही बोलपर्यंत ती तिथे येण्याच्या आधी तिने चहा आणून दिला देखील.
" आदू चहा आवडला ना... अर्पिताने केलाय.. आणि आणि बघ, तुझ्या आवडीच्या जिलेबी देखील तिने बनवल्यात. खूप चव आहे पोरीच्या हाताला.. बघ तुला आवडेलच. "
आईच्या कौतुकाने अदितीचा जीव खालीवर होत होता.
आईच्या बोलण्यावर एक घोट मारत फक्त तिने मान डोळावली. तिला कळत नव्हतं चहा तरी काय कौतुक करायचं. अर्पिताच होणार कौतुक तिला काही केल्या सहन होत नव्हतं. चहा तर चहा... काहीही असो, आता घरात सगळं अर्पिताभोवती फिरत होतं. तिचं अस्तित्व जणू कुठेतरी विरल्यासारखं तिला वाटत होत.
आईच्या बोलण्यावर एक घोट मारत फक्त तिने मान डोळावली. तिला कळत नव्हतं चहा तरी काय कौतुक करायचं. अर्पिताच होणार कौतुक तिला काही केल्या सहन होत नव्हतं. चहा तर चहा... काहीही असो, आता घरात सगळं अर्पिताभोवती फिरत होतं. तिचं अस्तित्व जणू कुठेतरी विरल्यासारखं तिला वाटत होत.
खरंच असं घडलं होत कि आदितीचा गैरसमज होता?
तस असेल तर तो दूर होईल का??
तस असेल तर तो दूर होईल का??
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा