Login

नणंदबाई येता घरा... भाग तीन

Prerna सगळ्यांना चुकीची जाणीव करून देते

जलदकथा

मागील भागात आपण पाहिलं की, प्रेरणा विभीताला तिची ओटी भरायला घेऊन येते. आता पाहूया पुढे,

विभीतानं हळद, कुंकू, नारळ व साडी घेतली. ते करताना तिचे हात थरथर करत होते. प्रेरणासमोर बसून तिनं हळूच तिने ते ताट तिच्या ओटीत ठेवल.

“देवी तुझ्या पोटी उत्तम बाळ देईल.,”
ती म्हणाली.

“ज्या सुखासाठी मी रोज देवाला डोळ्यात पाणी आणून विचारलं, ते तुला हजारपट मिळो.”

ती म्हणत होती, आणि तिच्या गालांवरून अश्रू ओघळत होते.

तस प्रेरणाने तिचे हात हातात धरले.

“ताई, तुमचा आशीर्वाद मिळाला. खूप झालं मला, आजपासून तुम्ही फक्त माझ्या नणंदबाई नाहीत.माझ्या बाळाची दुसरी आई आहात.”


ते ऐकून विभीता जणू भरून पावली.
विभीतानं प्रेरणाची ओटी भरली होती, हळूहळू कुजबुज चालूच होती, पण काहींच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी होती.
विशेषतः प्रेरणाची आई अजूनही नाराज नजरेने सगळं बघत होती.

ती म्हणाली,

“अगं प्रेरणा, तू इतकी हट्टी झालीस का? कोणाचं काही ऐकायलाच तयार नाहीस? या सगळ्याचा वाईट परिणाम झाला तर?”


आता मात्र प्रेरणाचा राग अनावर झाला,

“आई अग … पुरे झालं आता... मला सांग ह्या काही महिन्यात मला त्रास झाला. डॉक्टरांनी बेडरेस्ट दिली. तेव्हा माझं सगळं करायला कोण नव्हतं, तेव्हा ह्याच होत्या माझ्या नणंदबाई... रात्री अपरात्री हातातलं काम सोडून त्या यायच्या. माझे डोहाळे ह्यांनीच तर पुरवले. तेव्हा नाही लागली नजर तर आता कशी लागेल?? ज्यावेळी मी लग्न करून या घरात आले, तेव्हा नवीन वातावरण, नवी माणसं... आणि मला काही कळत नव्हतं. त्या वेळी माझ्यापाठी आईसारख्या उभ्या राहिल्या त्या विभीताई.
माझ्या आवडीची भाजी बनवून मला खाऊ घालायच्या.मी आजारी पडले तर काळजी घ्यायच्या.


मग आता, जेव्हा माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा क्षण
आलाय, आई होण्याचा, तेव्हा त्या नाही असाव्यात?
त्या ह्या घरात त्यांना हवं तेव्हा येतील आणि हवं ते करतील.

आई, जर त्यांचं मन इतकं शुद्ध असेल की त्यांनी आपल्या भावाला आईसारखं माया देत वाढवलं नसत , असं असून त्या त्याच्याच मुलाला नजर लावतील का?
आणि कोण सांगत त्यांना बाळ नाही माझा आशु त्यांचाच बाळ आहे ना... यापुढे त्यांना कोण काही बोललं तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसेल... "


ते ऐकून आता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
विभीता गप्प होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

“प्रेरणा बाळा…”
ती आलेला हुंदका दाबत म्हणाली.

"आजपर्यंत मला एवढं कोणीच समजून घेतलं नव्हतं. देव माझ्या पदरी बाळ टाकत नसला तरी तुम्ही दोघ माझीच बाळं आहात. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते. आज मला वाटत आहे माझ्या भावाचं घर मला कधीच परकं होणार नाही. मला इथे येताना किंतु परंतु वाटणार नाही..."


असं म्हणून तिने प्रेरणाला मिठीत घेतलं. आशुदेखील हे पाहून एकदम भारावून गेला होता.

" ... नणंदबाई येती घरा... तोच दिवाळी दसरा..मला माफ कर विभीता.. मी माझ्या मुलीच्या काळजीने बोलली.. पण तुझ्यासारखी नणंद तिला मिळाली हे तिचे भाग्य..."


प्रेरणाची आई हात जोडून म्हणाली. तस विभीताने तिला मोठ्या मनाने माफ केल....