नणंदबाईंची दिवाळी - १
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोंबर २०२५
विषय - नणंदबाई येती घरा
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोंबर २०२५
विषय - नणंदबाई येती घरा
"आई, झाली का दिवाळीची तयारी? काय काय बनवून तयार झाले फराळाचे?"
श्वेता तिच्या आईला फोनवर विचारत होती.
"चिवडा, चकली, शेव, गोड आणि खारी शंकरपाळी, करंज्या कोणी खात नाही म्हणून जास्त केल्या नाही बघ. लाडू तेव्हढे भरपूर केले, तुला आवडतात ना! मधुराने केलं बघ सगळं."
आई तिला सगळं एक एक करून सांगत होती. घरात काय काय बनवलं ते.
"बरं झालं जास्त केलेत लाडू, तुझ्या जावयाला पण खूप आवडतात लाडू."
श्वेता फोनवर सुद्धा लाजून बोलत होती.
श्वेता फोनवर सुद्धा लाजून बोलत होती.
"हो का? छान छान. कधी येताय मग! वाट बघतेय मी, लवकर या."
आईने लगेच विचारून घेतले.
आईने लगेच विचारून घेतले.
"भाऊबीजेच्या दिवशीच येऊ बहुतेक आम्ही. येईपर्यंत संध्याकाळ होईल, पण त्याच दिवशी येऊ."
श्वेता आईला सांगत होती आणि आजूबाजूला कोणी आहे का ते सुद्धा बघत होती.
श्वेता आईला सांगत होती आणि आजूबाजूला कोणी आहे का ते सुद्धा बघत होती.
"अग जास्त संध्याकाळ नका करू, सकाळी लवकरच निघा म्हणजे निदान पाच वाजेपर्यंत तरी पोहोचाल इथे."
आई समजून सांगत होती.
आई समजून सांगत होती.
श्वेताचे लग्न होऊन जेमतेम चार पाच महिने झालेले. तिची पहिली दिवाळी; म्हणून सासरी तर जोरदार तयारी सुरू होतीच, पण इकडे माहेरी सुद्धा तिची आणि जावयाची पहिली दिवाळी म्हणून भरपूर जय्यत तयारी करून ठेवलेली. आता तिला उत्सुकता लागून होती माहेरी गेल्यावर वहिनी आणि भाऊ काय काय गिफ्ट देणार याची.
एकुलती एक लेक म्हणून आईने तर आधीच श्वेतासाठी कानातले घेऊन ठेवलेले आणि जावयाला अगंठी करून ठेवलेली. बाकीचं मधुरा बघून घेणार होती. मधुरा म्हणजे श्वेताची वहिनी आणि सूरजची बायको.
मधुरा एक जॉब करणारी स्त्री होती. तिची नोकरी आणि घर सांभाळून वेळ मिळेल तसा फराळ बनवत होती. सुधा ताई मदत करत होत्याच, पण आता वयोमानानुसार त्यांनाही जास्त दगदग झेपत नव्हती. उत्साह मात्र कमालीचा होता. मुलीची पहिली दिवाळी अगदी छान थाटामाटात पार पाडली पाहिजे असा अट्टाहास होता. लाडकी लेक येणार म्हणून सगळं तिच्या आवडीनुसार झालं पाहिजे; त्यामुळे मधुराला पण त्यांनी आधीच सांगून ठेवले होते.
मधुरा आणि श्वेताचे तसे चांगले पटतं होते. श्वेताच्या लग्नाच्या आधीपासूनच दोघींमध्ये छान जमायचे. कधी कधी चिडायच्या एकमेकींवर, राग यायचा पण तरीही करमत नसायचे दोघींना बोलल्या शिवाय. नणंद भावजय कधी वाटल्याच नाही त्या, एकमेकींच्या मैत्रीणी जास्त वाटायच्या. मजा मस्ती, पिक्चरला जाणे, बाहेर खाणे, शॉपिंग करणे.. घरात काय आणायचं किंवा सजावटीचे काहीही असो, हे सगळं त्या दोघी मिळून करायच्या. श्वेताचे लग्न झाले. तिच्या लग्नाचे सगळे काम अगदी आईप्रमाणे केले मधुराने. तिला काय हवं नको ते सगळे बघितले. साडी पिनपासून ते अगदी चप्पलपर्यंत सगळं मधुराने बघितलं होतं. घरातली सून म्हणून ती सगळी जबाबदारी अगदी छान आणि मनापासून पार पाडत होती; त्यामुळे सगळ्यांनाच तिचे विशेष कौतुक होते.
श्वेता लग्न होऊन सासरी गेली आणि इकडे मधुरा मात्र एकटी पडली. पाठवणीच्या वेळी दोघी गळ्यात पडून खूप रडल्या.
"इतकं कोणी करत नाही बाई आजकाल, नणंद चांगली नशीबवान आहे जी अशी भावजय मिळाली तिला."
आलेल्या पाहुण्यांमध्ये कुजबुज सुरू होती.
आलेल्या पाहुण्यांमध्ये कुजबुज सुरू होती.
क्रमशः
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा