Login

नणंदबाई तुम्ही खास आहात - भाग 3

अदितीच्या रागाचा उद्रेक होतो
मागील भागात आपण पाहिलं कि, अदितीला न विचारता तिची रूम अर्पिताला दिल्यामुळे तिला राग येतो. त्यात सगळे येऊन जाऊन अर्पिताच करत असलेले कौतुक तिला आवडत नाही.. आता पाहूया पुढे,


दुपारचं जेवण आवरल्यावर अदितीला वाटलं होतं की, आई तिच्या खोलीत येईल, दोघी नेहमीसारखं गप्पा मारत, हलकंफुलकं हसत झोपून जातील.
पण खूप वेळ झाला तरी आई काही आली नाही
कंटाळून ती डोळे मिटून पडली.
तस संध्याकाळी पाच वाजताच तिला जाग आली, तस सरळ स्वयंपाकघर तिने गाठलं. तिला वाटलं, आतातरी आईसोबत निवांत गप्पा मारता येतील . पण तिथं पोहचल्यावर तिचा भ्रमनिरास झाला.


आई आणि अर्पिता दोघी अगदी रंगात गप्पा मारत होत्या. अर्पिता पोहे करत होती, तर आई तिला भाजी निवडून देत मस्त हसत होती.

"मम्मी, मी काल इंस्टाग्रामवर बघितलं ना, एका वेगळ्या प्रकारे ढोकळा करतात. परवा मी तुम्हाला करून दाखवते मग सांगा कसा झालाय. "

"वा! अग छानच होतील, तुझ्या हाताला चव आहे. आता तू मला सुद्धा मागे टाकशील असं वाटतंय आता! आपल्या आदूला देखील शिकव हा...."

आईचे हे शब्द आधीच नकारात असलेल्या अदितीला अजूनच टोचले.


" होका... आई... आता ही मला शिकवेल.... "

"हा मग.... सुगरण आहे ती...."

आई कौतुकाने म्हणाली.


अदिती हलकंसं हसली, आणि थोडं दूध घ्यायला म्हणून फ्रिजकडे वळली. पण अर्पिता पटकन म्हणाली,

"दीदी, तुम्ही बसा ना, मी देते तुम्हाला."


मग आईनेही डोकं हलवत तिला खुर्चीत बसवलं.


"बस ना आदू.... देईल ती..... "

ह्यातही तिला गैरसमज झाला कि स्वयंपाकघर जे कधी तिचं हक्काचं होतं, आज तिथे ती पाहुण्यासारखी होती.
आता तिला कोणत्याही गोष्टीला हात लावण्याआधी अर्पिताला विचारावं लागेल.


रात्री झोपण्याआधी ती हॉलमध्ये बसली होती. आईने अर्पिताला म्हटलं,

"अगं अर्पिता, उदया आपण काही स्पेशल करूया का??? तुला काय वाटतं? तू म्हणशील ते करू..."

आता मात्र अदिती स्वतःला थांबवू शकली नाही.

"आई, तुला वाटत नाही का? अर्पिता आल्यापासून तुम्हाला मी दिसतच नाही म्हणून... मी दोन दिवसासाठी आले तरी तुमच त्या अर्पिताच कौतुक काही थांबत नाही.
एकदा तरी विचार करायला नको का की मी काय अनुभवतेय? जिथं माझ्या आठवणी आहेत, जिथं मी वाढले तिथं मला आता एक पाहुणी वाटतंय."

ते ऐकून सगळे थक्क झाले.

ती उठली आणि रागात बोलली...,

"माझ्या रूमवर माझा हक्क होता... ती देताना, पण निदान विचारता तरी आलं असतं. आणि आई, तुझ्या या सुनेच्या कौतुकाच्या पुढे आज मी कुठे आहे? मी ही तुझीच मुलगी ना? तुम्हाला एक वेगळी मुलगी भेटले ना.... करत बसा तिचेच लाड.... मी चालली इथून "


आई उठली, ती काही बोलणार होती, पण बाबांनी डोळ्यांनीच तिला अडवलं.


अदितीचा गैरसमज दुर होईल का?
Kramash
0

🎭 Series Post

View all