Login

नणंदबाई येती घरा भाग -1

सगळ्या नणंदा खराब नसतात
नणंदबाई येती घरा – भाग १
जलद कथा – ऑक्टोबर २००५

उर्मी सकाळी लवकर उठली. तिने स्वतःला आवरून घेतले. नंतर ती अंगणात पाणी शिपली, तुळशीला पाणी टाकले. तुळशीची पूजा केली, अगरबत्ती लावली. दिवा लावून घरातून निघून गेली. गावात सकाळ लवकर झाली होती. उर्मी पण लवकर उठते. सगळे काम आवरून घेते. तिच्या मुलाला उठवायला जाते.

“रवी, उठ बाळा… शाळेत जायचे आहे ना?”
उर्मी त्याला प्रेमाने उठवते.

तिचे सासू-सासरे पण उठले होते. उर्मी त्यांना चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली.

“अजय दूध देऊन आला का?” अजयची आई विचारते.

“हो, आई, आताच देऊन आलो. आज चांगले दूध दिले होते. चांगला भाव मिळाला,” अजय म्हणाला.

“चांगले झाले. तू आवरून ये, सुनबाई चहा ठेवायला गेली आहे. तिला येईपर्यंत तू आवरून ये,” अजयचे बाबा म्हणाले.

अजय आवरायला निघून गेला.

रवी पण आवरून आला. उर्मीने त्यांचा डब्बा भरून दिला आणि दप्तरात ठेवले. त्याला चहा आणि नाश्ता दिला. घरातील इतरांसाठीही नाश्ता आणला.

अजय पण तयार होऊन आला.
उर्मी त्याला पण नाश्ता देते. सगळे सोबत नाश्ता करून घेतात. रवी शाळेत निघून जातो.

अजय शेतात जायला निघतो. उर्मी पण त्यांच्या सोबत जाणार असते. तिने जेवण डब्ब्यात भरून घेतले आणि सासू-सासऱ्याचे तिथे नीट ठेवले.

अजय शेतात जायला निघतात की अजयचा फोन वाजतो.
अजय बघतो, त्यांच्या बहिणीचा फोन आला आहे.
तो लगेच उचलतो.

“हॅलो, तायडे,” अजय म्हणतो. त्यांची आई लगेच त्यांच्या जवळ येते.

“हॅलो, दादा. मी येते आहे. आईला सांगशील,” स्नेहा म्हणाली.

“तू किती वाजता येणार आहेस? आम्ही शेतात जात आहोत,” अजय म्हणाला.

“मी चार वाजता येईन. तेव्हा माझी ट्रेन येईल,” स्नेहा म्हणाली.

“बरं, चालेल,” अजय म्हणाला.

“मी आता ठेवते. गाडीत आवाज येत नाहीये,” स्नेहा म्हणाली आणि कॉल कट केला.
अजयने मोबाईल ठेवला.

“स्नेहा केव्हा येणार आहे?” अजयची आई विचारली.

“चार वाजता येऊन जाईल. आम्ही शेतात जाऊन येऊ. लवकर येऊ, शेतातून येताना भाज्या घेऊन येतो,” अजय म्हणाला.

उर्मी आणि अजय शेतात निघून गेले.

“आजी, आजोबा, मी पण शाळेत जातो,” रवी म्हणाला. तो शाळेत जायला निघाला.

“तुम्ही ऐकले ना? स्नेहा येत आहे. आपण तिच्यासाठी काही तरी घेऊ, किती महिन्यांनी येत आहे,” अजयची आई म्हणाल्या.

“आपल्याकडे पैसे कुठे आहेत? तू काय घेणार आहेस?” अजयचे बाबा विचारले.

“मला अजय देतो. ते मी सांभाळून ठेवले आहे,” अजयची आई म्हणाली.

“उर्मीला कधी काही घेत नाही. स्नेहासाठी घेणार आहे,” अजयचे बाबा म्हणाले.

“तिला का घेऊ? माझ्या मुलीसारखीच घेईल. उर्मी आपली मुलगी आहे का?” अजयची आई रागात म्हणाली.

“तू तिला कधी मुलगी मानली का? आपले सगळे करते. स्नेहाच्या लग्नात पण उर्मीने सगळं काम केलं. तू कधी उर्मीचं कौतुक केलं नाही. सोन्यासारखा नातू तिने आपल्याला दिला. तिचं काहीच लाड तू केला नाही. आता पण तिच्याबाबत तू नीट बोलत नाहीस,” अजयचे बाबा म्हणाले.