Login

नणंदबाई येती घरा भाग -2

सगळ्या नणंद सारख्या नसतात
नणंदबाई येती घरा – भाग २
जलद कथा – ऑक्टोबर २००५

“अहो… घरी चला ना, ताई आल्या असतील. आई परत मलाच बोलतील. स्नेहा येणार आहे. तूच उशिरा घरी आलीस. तुम्हांला पण येऊ दिले नाही. आजचे काम झाले आहे,” उर्मी म्हणाली.

“तुला माहिती आहे, आई कशी आहे. मनाला लावून नको, घेत जाऊ नको,” अजय म्हणाला.

उर्मीने सगळा सामान भरला. अजय पण आला. त्यांनी आणलेले सामान घेतले आणि घरी जायला निघाले.

स्नेहा घरी पोहोचली. अजयची आई वाटच बघत होत्या.

“स्नेहा आली… किती बारीक झालीस! आता इथे मस्त राहा. खूप काम असेल का? मस्त आराम कर,” अजयची आई म्हणाली.

“आई, मी कशाला बारीक होईन? मी तर मस्त जास्त झाली आहे. घरात सगळे खूप छान आहे,” स्नेहा म्हणाली.

“जावई बापू चांगले आहे ना?” अजयची आई विचारली.

“हो, खूप छान आहे,” स्नेहा म्हणाली.

अजय आणि उर्मी पण घरी आले.

अजय आणि उर्मी स्नेहासोबत बोलत होते. हात-पाय धुवायला निघून जातात.

उर्मी किचनमध्ये गेली. सगळ्यांसाठी चहा ठेवला.

स्नेहा सगळं बघत होती. वहिनी आताच शेतातून आली.
लगेंच किचनमध्ये गेली. आई वहिनीला किती बोलते असते, स्नेहा मनात विचार करते, “मला वहिनीसाठी काही तरी करायला हवे.”

रवी पण शाळेतून आला. त्याला माहिती नव्हते की स्नेहा येणार आहे. त्याला खूप आनंद झाला. तो स्नेहाकडे गेला.

“आतु कधी आली?” रवी स्नेहा जवळ बसून म्हणाला.

स्नेहाने पण रविचे लाड केले. त्याला खाऊ आणले, तो त्याला दिला, आणि चॉकलेट पण दिली. रवी लगेच चॉकलेट खातो.

रवी रूममध्ये निघून गेला.

अजय येतात. स्नेहासोबत बोलतात. त्यांचे गप्पा चालू असतात. उर्मी चहा घेऊन येते. सगळ्यांना देते. ती पण चहा घेतली. रवीला हाक मारते; त्यालाही देते.

उर्मी आणि स्नेहा बोलत असतात.

“स्नेहा, कशी आहेस? घरी खूप काम असते का?”
“थोडं थोडं काम करायचं,” उर्मी म्हणाली.

“वहिनी, तू किती काम करतेस, मला सांग. माझ्या घरी सासू पण काम करते. सगळे छान आहे,” स्नेहा म्हणाली.

“मग चांगले आहे. तुला काय बनवू खायला? खूप महिन्यांनी आलीस,” उर्मी म्हणाली.

“मी पण तुला मदत करेल. मला काय खायचं ते सांग,” स्नेहा म्हणाली.

स्नेहाचे डोके फिरले आहे. तिने बनवले असते ना? स्नेहा शांत बसवत नाही, असं अजयची आई मनात म्हणाल्या.

अजयला खूप छान वाटले. तो स्नेहाला खायला आणायला गेला.

स्नेहा आणि उर्मी गप्पा मारत जेवण बनवले.

“स्नेहा, घरी ड्रेस घालतेस का?” उर्मी विचारली.

“आमच्याकडे सगळं चालते. मी तर जीन्स, वन पीस पण घेतले आहे. इथे नाही आणले… गावात वेड्यासारखे बघतात,” स्नेहा म्हणाली.

“आता तू बाहेर बस, बाकी मी आवरते,” उर्मी म्हणाली.

स्नेहा बाहेर निघून गेली. विचार करायला लागली.