Login

नंदिनी श्वास माझा ११

I Love Her
" काय पोरांनो , कसं वाटलं आपलं शेत ? आवडलं की नाही? " शरूचे मामा सगळ्यांसोबत गप्पा मारत होते. पण कोणीच बोलायच्या मूडमध्ये नव्हते.

" हो मामा , खूप छान आहे." रोहनने वेळ मारून नेली.


" काय रे पोरांनो , असे का शांत शांत बसले आहात?" मामी.

" ते दिवसभर फिरून फिरून थकलो ना म्हणून." राहुल.

जेवण करायची इच्छा नसून सुद्धा शरूने सगळ्यांसोबत जेवण केले . जेवण आटोपल्यावर शरू आणि शरूचे मित्र वरती रूममध्ये निघून आले.

शरू त्याच्या रूममध्ये येऊन खिडकीजवळ जाऊन उभा राहिला आणि बाहेर नंदूच्या रूमकडे बघत होता.

" नंदूच्या रूमचा लाईट बंद दिसतोय, झोपली बहुतेक?" शरु मनातच बोलत होता.


खिडकी जवळ उभा राहून शरू कसल्यातरी विचारात हरवला होता . आज दिवसभर जे घडलं ते वारंवार त्याच्या नजरेसमोरून जात होतं. ते आठवून त्याच्या डोळ्यात पाणी साचत होतं. आणि शेवटी एक अश्रू नकळतपणे त्याच्या गालावर ओघळला..

रोहन, राहुल , टीना ,सुजी, सगळे त्याच्यापाठोपाठ रूममध्ये आले.

" नको इतका विचार करू , सगळं ठीक होईल . उद्या सकाळपर्यंत ती सगळं विसरून सुद्धा जाईल." रोहन शरूच्या पाठीवर ठेवत म्हणाला.

शरूला माहित होतं आता नंदू ही गोष्ट खूप दिवस विसरू शकणार नाही. तिच्या हृदयावर खूप मोठा घाव झाला होता. शरू एकटक नंदूच्या रूमकडे बघत उभा होता.

" इतकं काहीही झालेलं नाहीये. तुम्ही लोकं उगाच तिचे इतके टेन्शन घेत आहात. उद्या सगळं विसरून ती परत तिच्या मुळ रूपावर येईल. परत ती सगळ्यांना त्रास देणे सुरू करेल." टीना शरू जवळ येत म्हणाली.

शरूला टिनाचे बोलणे एकूण आता राग येत होता.

" ओ रियली ?" टिनाचं बोलणं ऐकून शरू ताडकन तिच्याकडे वळला. त्याच्या डोळ्यांमध्ये आता खूप राग दिसत होता. तो एकटक रागाने टिनाकडे बघत होता.

" हे बघ, तू आधी शांत हो. मला माहिती आहे मी तिला थोडे जास्तच बोलले. पण तिला तिची जागा दाखवणं सुद्धा खूप गरजेचं होतं. ती तुला तिच्या जाळ्यात फसवत होती . सतत तुझ्या अवतीभवती करत होती. मला चांगलंच माहिती या मुली कशा असतात ते? चांगल्या मुलांकडून पैसा कसा काढून घ्यायचा, मुलांचा वापर कसा करायचा, हे या अशा मुलींना चांगलंच कळतं." टिना.

" टीना, जस्ट शट अप! मी आता तिच्याबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही. तू माझी गेस्ट, माझी फ्रेंड आहे म्हणून मी मगाशी पण चुप राहिलो , पण आता नाही. आता बिलकुल चूप बसायचं हा ?" शरु रागात , पण थोडा ओरडतच बोलला.

" वाह! आता तू सुद्धा मला बोल. तिनेच सुरुवात केली होती . तिलाच भांडायला आवडत होतं. तिच वाद घालत होती. असं काय बघितलं रे तिच्यामध्ये , जो तुला तिचा इतका पुळका येतोय? मान्य आहे की ती तुझी बालमैत्रीण आहे आणि मैत्रीण म्हणून तू तिच्यासाठी भरपूर करतोस. पण जरा आपल्या लेव्हलचे मित्र शोधावेत. हे काय गवार गावठी तुझ्या स्टॅंडर्डला पण शोभत नाही. तू इतका हुशार, ऑल राऊंडर, कॉलेजमध्ये सगळ्या मुली तुझ्या मागे मागे असायच्या. त्या कुठे आणि ही गावंढळ मुलगी कुठे? ही तुला कुठेच मॅच होत नाही."टिना.

" टिना, आता खूप झालं, खूप बोलली . आता चूप बसायचं, नाही तर माझ्यासारखा आता वाईट कोणी नाही . ऐकतोय म्हणून तिच्याबद्दल काहीही बोलायची अनुमती मी तुला दिलेली नाही." शरू.

" टिना , जा आता झोप, तू थकली असशील. " रोहन तिला तिथून घालवण्यासाठी बोलला.

" काय दिसलं तुला तिच्यामध्ये, जे तुला माझ्यासारख्या मुली मध्ये सुद्धा दिसल नाही? ती किती नाटकं करते आहे, इतका पण काही त्रास नाही झाला आहे. कोण आहे ती तुझी , जे तू तिला इतके इम्पॉर्टन्स देतो आहे?" टिना चिडत बोलत होती.


" शी इस माय लाईफ, आय लव्ह हर ! I can't even breathe without her ! नंदिनी....ती माझा श्वास आहे . मी माझं आयुष्य तिच्याशिवाय इमॅजीन सुद्धा करू शकत नाही. आताच नाही तर मी लहानपणापासून तिच्यावर प्रेम करतोय. फक्त आता मला हे प्रेम आहे, ते कळायला लागले. तेव्हा मी त्याला फक्त मैत्री समजत होतो. तिला झालेल्या त्रास मला बघवत नाही ,सहन सुद्धा होत नाही. तिला काही झालं तर मी जगू शकणार नाही. तिला थोडे जरी दुःख झाले तर माझा श्वास कोंडल्यासारखा होतो. लहानपणापासून जी गोष्ट ती विसरण्याचा प्रयत्न करते आहे, आज तीच गोष्ट तू तिला आठवण करून दिली. तिचे आई-बाबा एका एक्सीडेंट मध्ये गेले , त्यात ती वाचली .लहानपणापासून तिच्या आई-बाबांच्या प्रेमासाठी, मायेसाठी व्याकूळ होतांना मी तिला बघितलं आहे. आज तू तिला जे जे बोलली, ते तू बरोबर नाही केले. मान्य आहे तिने तुझी मस्करी केली. तूच म्हणत असते ना ती लहान आहे , तिला समजत नाही. पण तू तर मोठी होतीस ना , ते पण १-२ नाही तर ४ वर्षांनी मोठी होतीस. तुला नाही कळलं आपण काय बोलायला हवं , काय बोलायला नको? " शरू रागात बोलत होता पण त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्याचा गळा दाटून आला होता, आवाज कापरा झाला होता.

टीना आणि सुजी आ वासून त्याच्याकडे बघत होत्या.

रोहन आणि राहुलला त्याच्या प्रेमाबद्दल थोडी कल्पना होती म्हणून ते चूपचाप त्यांचे बोलणे ऐकत होते.

"आय थिंक, तुला आता तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. आता मला यावर जास्त काही बोलायचं नाहीये, तुम्ही जाऊन झोपा ." शरू.

रोहनने सुजीला इशारा केला , तसे सुजी टिनाला घेऊन त्यांच्या रुममध्ये निघुन गेली.

" चल ती झोपली. तू पण आता झोप. सगळं ठीक होईल." रोहन शरूला म्हणाला . तसे सगळे आपापल्या बेडवर जाऊन पडले.

शरूला मात्र झोप येत नव्हती. त्याच्या डोक्यात सतत नंदूचा विचार येत होता. कधीतरी पहाटे पहाटे त्याला झोप लागली.

सकाळी शरू लवकर उठला. सगळं आवरून तो नंदूच्या घरी गेला. त्याला खाली कोणीच दिसलं नाही म्हणून तो डायरेक्ट वरती नंदूच्या रूममध्ये गेला.

आजी नंदूच्या कपाळावर ओल्या पट्ट्या ठेवत असताना त्याला दिसली.

"आजी नंदूला काय झालं?" म्हणत तो पळतच नंदू जवळ येत, तिच्या कपाळाला हात लावून बघू लागला.

" बापरे ! आजी हिला तर ताप आहे. " शरू.

" हो बाळा , पहाटे-पहाटे तिला ताप चढला. सकाळी उठून खाली येत होते तर तिचा कन्हण्याचा आवाज आला म्हणून हात लावून बघते तर तिला खूप ताप चढला होता. तिला काहीतरी खाऊ घालते आणि औषध देते , म्हणजे मग बरं वाटेल आहे." आजी.

" हो !" शरू.

"पोरीनी मनाला फारच लावून घेतलं दिसते आहे तिचं बोलणं." आजी.

" हो !' शरू.

" आजी , आबासाहेब दिसत नाही आहेत? घरी नाहीत का?"शरू.

" हो रे बाळा , ते काल तालुक्याच्या गावी गेले. आश्रमाचं काही काम होतं, तर ते दोन-तीन दिवस तिथेच थांबणार आहेत." आजी.

" बर ठीक आहे , तू खायला काहीतरी घेऊन ये. नंदुला खाऊ घालून औषध दिलं म्हणजे तिचा ताप लवकर उतरेल." शरू.

" अरे पण, ही ... इथे एकटी ?" आजी.

" नको काळजी करू , मी आहे. मी ठेवतो तिच्या डोक्यावर पट्ट्या, तू जा ." शरू.


शरू नंदू जवळ जाऊन बसला आणि तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता. त्याला बघून आजी नंदूसाठी नाश्ता बनवायला खाली निघून गेली.

नंदू निपचीत पडली होती. तिचा चेहरा सुद्धा निस्तेज दिसत होता. तिच्याकडे बघून शरूला खूप वाईट वाटत होते.

"माझ्यामुळे झालं हे. मी तिला सोबत यायला हट्ट केला नसता तर हे सगळं झालं नसतं. " शरू तिच्याकडे बघत मनातच बोलत होता.

"सॉरी रे पिल्ल्या , माझ्यामुळे झालं हे. खूप मन दुखलं ना तुझं? नको रे राजा इतका विचार करु !" तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत मनातच बोलत होता. आता तो थोडा भाऊक झाला होता.

त्याने तिचा हात आपल्या हातात घेत , आपल्या ओठांजवळ आणला आणि तिच्या नाजूक हातावर एक किस केले. त्याच्या डोळ्यातल्या अश्रूच एक थेंब तिच्या हातावर पडला . त्याच्या अश्रुंच्या त्या गरम स्पर्शाने ती जागी झाली.

" तू कधी आलास ?" नंदू.

" हा....आत्ताच , थोडा वेळ झाला इथे येऊन. " शरू.

" तुझे फ्रेंड्स ?" नंदू.

" ह्म्म ते झोपले आहेत." शरू.

" तू का उठला इतक्या लवकर? थोडा आराम करायचा असतास ना. सकाळी सकाळी आला इकडे. " नंदू.

" लवकर जाग आली . मग काय करू लोळत पडून , म्हणून आलो इकडे." शरू.

" लवकर जाग आली की रात्रभर झोपच लागली नाही?" नंदू काळजीच्या सुरात म्हणाली .

" काय ग चिमणे , हे काय तापाचं नाटक घेऊन बसलीस? उठ आता लवकर." शरू तिचा मूड चेंज करायला म्हणाला .

" मी नाटक करते? मी तर कधीचीच उठली होती. ही आजी मला उठू देत नाहीये .तिने मला इथे बेडवर झोपवून ठेवले आहे. " नंदू डोळे मोठे करत म्हणाली.

" नी काय रे , मला तब्येत कशी आहे विचारायचं सोडून, नाटक करते बोलतो तू?" नंदू नाटकी स्वरात म्हणाली.

"तब्येतीचे काय, चांगली ठणठणीत तर दिसते आहे , तू 1-2 जणांना चांगले चोपून काढू शकतेस." शरू तिची मस्करी करत म्हणाला.

" हो काय? मग मगाशी तू का रडत होता?" नंदू.

" कुठे? काय ? कधी ? मला रडायला काय वेड लागलं आहे काय?" शरू.

" वेडाच आहेस तू ! एवढी काळजी कोण करतं का?" नंदू.

" हो आहे मी वेडा, तुझ्यासाठी. आणि मला वेडा बनून राहायला सुद्धा आवडेल. तुला काही प्रॉब्लेम आहे काय ? " शरू.

" पागल!" नंदू.
नंदूने बाजूची उशी उचलून त्याला मारून फेकली.

" तू..... पागल." शरूने परत ती उशी तिला मारून फेकली.

" पागल पागल पागल! तू पागल !" तिने परत ती उशी त्याच्याकडे फेकली. आता मात्र अशक्तपणामुळे तिचा थोडा तोल गेला.

" अग बाई आरामात! झाशीची राणी बनायची गरज नाहीये. तिथे तुझ्याजवळ बसतो. मार हवे तितके!" शरू काळजीने तिच्याजवळ बसत तिच्या डोक्यावर किस करत म्हणाला.

तेवढ्यात आजी नाश्ता घेऊन आली.

"अरे वाह ! उठली ही. नंदू आता बरं वाटतेय ना ? चला पोरांनो थोडंसं खाऊन घ्या. आणि तू ग , पटकन खाऊन घे , नाटक करू नको. खाऊन झालं की औषध घे, तुला बरं वाटेल. मी खाली जाते, ती रखमाबाई आली आहे." नाश्त्याची प्लेट नंदू आणि शरूच्या हातात देत आजी खाली निघून गेली.


" ई ssssssssssssssss उपमा sssss... मला नाही खायचे." नंदू नाटक करत म्हणाली.

" नंदु ,नाटकं करायची नाही हा, पटकन खाऊन घे."

" मला नको." नंदू तोंड मुरडत म्हणाली.

" अगं घे ना बाई , औषध खाल्ले की तुला लवकर बरं वाटेल." शरू विनवणीच्या सुरात म्हणाला.


"मग तू खाऊ घाल." नंदू लाडात येत म्हणाली.

शरूने तिला एक एक चम्मच करत उपमा खाऊ घातला. कौतुकाने त्याच्याकडे एकटक बघत तिने आनंदाने उपमा फस्त केला.

" हे मेडिसिन घे आणि झोप आता ,थोडा आराम कर." शरू तिला औषध देत म्हणाला आणि तिच्या शेजारी जाऊन बसला.


" हा, मी आता झोपते. तू पण घरी जा, सगळे तुझी वाट बघत असतील." नंदू.


" कोणी वाट बघत नाहीये , मी इथे बसतो. तू आराम कर. " शरू.

" जा रे बाबा, ते सगळे तुझ्यासाठी इथे आले आहे. मी आता ठीक आहे. तसं पण सगळं माझ्यामुळे झाले. मी तिची मस्करी करायला नको होते. " नंदू.

" तुझ्यामुळे काहीच झालं नाहीये ,शांत हो आता. " शरू.

नंदूच्या डोळ्यात कालच्या गोष्टी आठवून आता परत पाणी जमायला सुरू झालं होतं.

" हे बघ , मी म्हणतोय ना शांत हो. नाहीतर परत ताप चढेल." शरुने तिला आपल्या कुशीत घेतले आणि तिच्या डोक्यावर, पाठीवर हाताने थोपटत होता. रडत रडत कधीतरी ती त्याच्या कुशीत झोपी गेली. औषधामुळे ती आता गाढ झोपली होती.

तिचे उशीवर डोकं ठेवत त्याने तिला नीट झोपवले . तिच्या अंगावर पांघरूण घातले.
तो एकटक तिचा उतरलेला चेहरा बघत होता.
तिचे केस तिच्या चेहऱ्यावर उडत होते . त्याने ते नीट केले . तिच्या डोक्यावर किस केले. ती नीट झोपली आहे याची खात्री करून तो खाली आला.

" आजी, नंदूला मेडिसिन दिले आहे, ती आता गाढ झोपली आहे. काही लागलं तर आवाज दे . तसे मी अधून मधून येऊन बघून जाईल." शरू आजीला सांगत घरी निघून गेला.

दोन तीनदा शरु नंदू कडे येऊन, तिला बघून गेला होता. ती औषधांच्या ग्लानीत, गाढ झोपली होती .

शरूची आज कुठे फिरायला जायची इच्छा नव्हती, त्याने राम्या काकाला सांगून सगळ्या मित्रांना बाहेर फिरायला पाठवले.

शरू त्याचे जेवण आटपून नंदू जवळ येऊन बसला. रात्रीपासून आजी जागी होती म्हणून त्याने आजीला आराम करायला पाठवून दिले.

शरू नंदूजवळच खुर्चीवर काही पेपर वर्क करत बसला होता . तेवढयात त्याला नंदूचा काही बोलायचा आवाज आला. औषधाच्या गुंगीमध्ये ती झोपेतच बोलत होती.


" मी आई बाबांना त्रास नाही दिला. मी नाही दिला. " नंदू झोपेतच बोलत होती, तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. बहुतेक ती काही स्वप्नं बघत होती.


शरू धावतच तिच्याजवळ जाऊन बसला. तिला उचलून आपल्या मिठीत घट्ट पकडलं. तिच्या गालावर हाताने थोडं मारत तिला उठवत होता. तो खूप panic झाला होता. तो पटापट तिच्या कपाळावर, गालावर, डोक्यावर केसांवर खूप किस घेत सुटला. ती शांत झाली. तिने डोळे थोडे कीलकीले करून बघितले तर समोर शरू दिसत होता. त्याच्याकडे बघून स्मित हास्य करत , त्याला आपल्या हातांनी घट्ट पकडून ती परत त्याच्या मिठीत झोपी गेली. तिच्या त्या स्मितहास्यने त्याला थोडे बरे वाटले. त्याने तिला आपल्या छातीशी कवटाळून धरले होते .

" बघ , तुझ्या थोड्याशा जेलिसीमुळे काय हालत झालीय दोघांची?" रोहन टिनाला म्हणाला . ते नुकतेच फिरून आले होते. नंतर नंदुला भेटायला आले होते आणि दारातूनच हे सगळं बघत होते.