भाग-1४ : नंदिनी चे लग्न , श्रीराज सरप्राइजड
पाच वर्षानंतर..........
S&N ग्रुप ऑफ कंपनीजच्या भव्य बिल्डिंग समोर एक ब्लॅक ऑडी येऊन थांबली.
" वेलकम बॅक टू इंडिया मिस्टर देशमुख."
" थँक्यू मिस्टर शहा."
" वाव ! ही इस सो हँडसम , व्हेरी डॅशिंग. मला तर वाटलं डायरेक्टर येणार आहे तर कोणी एजेड पर्सन असेल. बट ही इज सो यंग यार." शैला रियाला म्हणाली .
ऑफिस मधला सगळा ऑफिस स्टाफ त्याला बघत उभा होता आणि मुलींची तर त्याला बघून आपापसात खुसुरपुसुर सुरू होती. तो गाडी मधून उतरला , तेव्हाच त्याला बघून ऑफिस स्टाफमध्ये कुजबुज सुरू झाली होती.
ऑफिस मधला सगळा ऑफिस स्टाफ त्याला बघत उभा होता आणि मुलींची तर त्याला बघून आपापसात खुसुरपुसुर सुरू होती. तो गाडी मधून उतरला , तेव्हाच त्याला बघून ऑफिस स्टाफमध्ये कुजबुज सुरू झाली होती.
चेहऱ्यावर आत्मविश्वासाने भरपूर असा , 5.11fit उंची, वेल मेन्टेन फिजिक्स , बहुतेक रोज जिम करत असावा. ब्लॅक ब्लेझर त्याने हातावर काढून घेतले होते. व्हाईट शर्ट , ब्लॅक ट्राऊजर, गोरा रंग , धारदार नाक, धनुष्य बाणच्या आकारासारखे रेखीव ओठ , हसला की डाव्या गालावर एक खळी पडत होती. छोटे केस जेल लावून प्रॉपर सेट केलेले, ट्रिमड शेव , डोळ्यांवर फ्रेमलेस स्क्वेअर शेप स्पेक्ट्स , शर्टच्या स्लीवस फोल्ड करत त्याने खूप पोलाईटली मिस्टर शहाला ग्रिट केले.
" सो गाईज , मिट यंग बिझनेसमॅन आयकॉन , अवर MD मिस्टर श्रीराज देशमुख. काही दिवसांपूर्वीच यांना अमेरिकेमध्ये यंग बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळालेला आहे. चार वर्षापासून शिकत असतानाच अमेरिकेमध्ये यांनी यांचा बिजनेस सुरू केला होता आणि आता तो मल्टिनॅशनल लेव्हलवर स्प्रेड सुद्धा केला आहे. आता देशोदेशी त्यांच्या बऱ्याच ब्रांचेस आहे. लास्ट मंथ यांनी आपली कंपनी टेकओव्हर केली . सो नाऊ ही इज अवर न्यू बॉस!" मिस्टर शहा ओळख करून देत म्हणाले.
सगळ्या स्टाफने त्याचं टाळ्या वाजवून स्वागत केले. श्रीराज सगळ्यांना हाताने हॅलो आणि थँक्यू म्हणाला..
" मिस्टर देशमुख , या मिस शैला, तुमच्या पी ए." शहा पर्सनल असिस्टँसची ओळख करून देत म्हणाले.
शैलाने फ्लावर बुके देऊन श्रीराजचे स्वागत केले .
" थँक्यू मिस शैला." श्रीराज म्हणाला.
" सो गाईज , मला शिस्तीत आणि वेळेत काम पूर्ण पाहिजे, बाकी एन्जॉयमेंटच्या वेळी तुम्ही फूल एन्जॉयमेंट करू शकता. ओके देन , आता रोज भेटीगाठी होईलच." एक सकारात्मक स्मायल ओठांवर आणत तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला आणि केबिनकडे वळला. मिस्टर शहा आणि शैला त्याला त्याचे केबिन दाखवायला घेऊन गेले.
श्रीराज त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला.
" हॅव अ सीट मिस्टर शहा अंड मिस शैला." त्यांना उभे असलेले बघून श्रीराज म्हणाला.
" मिस शैला , पूर्ण झालेले आणि सुरू असलेल्या सर्व प्रोजेक्टच्या फाइल्स मला आता हव्या आहेत." श्रीराज म्हणाला.
" ओके सर." शैला म्हणाली.
" मी उद्या ऑफिसला येणार आहे , त्यानंतर आठ दिवस मी पर्सनल लिव्हवर आहो. तर मला इंपॉर्टन्ट फाईल्स स्टडी करायच्या आहेत. त्याप्रमाणे आपण आपल्या गाईडलाईन्स तयार करू म्हणजे गेचच त्या इम्प्लेमेंट करता येतील." श्रीराज म्हणाला.
" ओके सर."शहा.
शहा आणि शैला केबिन मधून बाहेर आपापल्या कामासाठी निघून गेले.
शैलाने सगळ्या फाईल श्रीराजला आणून दिल्या आणि सगळे प्रोजेक्ट समजावून सांगितले.
"ओके गुड ! काम तसे व्यवस्थित आहे, थोडेसे चेंजेस हवे आहेत, ते मी उद्या सांगेल. उद्या सगळ्या स्टाफ सोबत एक मीटिंग अरेंज करा." श्रीराज म्हणाला.
" ओके सर." शैला.
श्रीराज डायरेक्ट विमान तळावरून ऑफिसमध्ये आला होता. त्याला लवकरात लवकर काम हातात घ्यायचं होतं आणि सगळे नीट सेट करायचं होतं. बेसिक गोष्टी डिस्कस करून तो घरी जायला निघाला.
गाडी एक मोठ्या बंगल्या समोर येऊन थांबली. श्रीराज कार मधून उतरून आतमध्ये गेला. त्याची आई दारातच आरतीचे ताट घेऊन उभी होती. जवळपास ५-६ वर्षांनी त्याला आपल्या डोळ्यांपुढे उभे बघून त्याच्या आईचे डोळे आनंदाने पाणावले होते आणि कौतुकाने ती त्याच्याकडे बघत होती. आज ५-६ वर्षानंतर तो घरी आला होता.. पाच वर्ष तो अमेरिकेतच होता पहिले दोन वर्ष त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि शिकत असतांनाच एका कंपनीमध्ये काम करून बिजनेसचा एक्सपिरीयन्स घेत होता. त्यानंतर त्याने पार्टनरशिपमध्ये तिथेच बिझनेस सुरू केला. बिजनेस चांगला सुरू होता. नंतर त्याने त्याच्या पर्सनल लेव्हलवर S&N ग्रुप ऑफ कंपनीज नावाने बिझनेस सुरू केला. त्याची अतोनात मेहनत आणि कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे त्याने त्याचा बिजनेस टॉप लेवल वर नेऊन पोहोचला होता आणि आता भारतात मुंबई मधील एक कंपनी त्याने टेक ओवर केली होती . म्हणून आता तो भारतात परत आला होता. आता त्याला भारतामधून त्याचं काम बघता येणार होतं. याचीच तो खूप वर्षापासून वाट बघत होता.
श्रीराज देशमुख अँड सन्स कंपनीचा वारसदार होता . त्याचे वडील सुद्धा टॉपच्या बिझनेसमॅनच्या लिस्ट मध्ये येत होते. पण श्रीराजला स्वबळावर सगळं करायचं होतं म्हणून त्याने त्याच्या वडिलांचा बिझनेस जॉईन न करता स्वतःचा बिजनेस उभा केला होता. तसा तो घरच्या बिजनेसमध्ये सुद्धा त्याच्या वडील आणि काकांना मदत करत होता.
श्रीराजची फॅमिली मुंबईमध्ये एक प्रतिष्ठित बिजनेस फॅमिली मध्ये येत होती. त्याची जॉइंट फॅमिली होती. आजी आजोबा , आई नीती, वडील शशिकांत देशमुख, लहान काका रविकांत देशमुख, काकू रेवती देशमुख आणि त्यांचा मुलगा राहुल देशमुख. सगळी फॅमिली त्यांच्या स्टेटसला जपणारी होती.
शशिकांत देशमुख आणि रविकांत देशमुख दोघे मिळून बिजनेस सांभाळायचे. श्रीराजची आई गृहिणी होती. काकू काही सोशल काम बघायची आणि तिच्या किटी पार्टीज मध्ये बिझी असत. राहुल , त्याचे शिक्षण पूर्ण झाले होते. अधून-मधून तो बिजनेसमध्ये मदत करत होता , पण जास्तीत जास्त तो मित्रांमध्ये रमत होता .
श्रीराजच्या घरी एकदम कडक शिस्तीचं वातावरण होतं , त्यातही श्रीमंतीचा थाट होता . श्रीराजची आजी थोडी जुन्या वळणाची होती. परंपरा , चालीरीती , श्रीमंतपणा जपणारी होती. घरात त्यांचाच दबदबा होता. त्यांचा शब्द न शब्द पाळल्या जात होता. श्रीराजची आई साध्या घरातून आली होती , त्यामुळे देशमुख फॅमिलीचे तिच्या माहेरी फार काही संबंध लावून घेतले नव्हते. त्यांना ते त्यांच्या स्टेटसचे वाटत नव्हते , त्यामुळे तिकडे कोणीच जास्त जायचे नाही . फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये श्रीराज आणि त्याची आई जायचे . श्रीराजची आई स्वभावाने गरीब आणि साधी होती. तिचा श्रीराज वर खुप जीव होता. श्रीराजने अमेरिकेला जावे अशी तिची इच्छा नव्हती , पण मुलाच्या भविष्यापुढे आणि हट्टापुढे तिने परवानगी दिली होती.
आईने श्रीराजचे औक्षवाण करत त्याला घरात घेतले. घरात आल्याआल्या त्याने सगळ्यांना वाकून नमस्कार केला.
" अरे वाह, आपले संस्कार विसरला नाहीत तर !" आजीसाहेब त्याच्या पाठीवर एक धबुकडा देत म्हणाल्या.
" आजीसाहेब , मी शुद्ध भारतीय आहो , काळजी नका करू." हसत तो म्हणाला.
आता सगळ्यांसोबत भेटीगाठी घेत घरात नॉर्मल गप्पा रंगल्या होत्या.
" बरं आई , मी फ्रेश होऊन येतो."असं म्हणत तो त्याच्या रूममध्ये गेला. त्याची रूम जशीच्या तशी त्याच्या आईने व्यवस्थित ठेवली होती. तो तर आपली रूम बघून खूप आनंदी झाला. फ्रेश होऊन तो खाली आला. सगळे जेवायला डायनिंग टेबलवर बसले होते. तो पण तिथे जाऊन बसला.
" काय रे तू इथे आल्यावर आधी ऑफिसमध्ये गेला होता? आधी घरी यायचं ना बाळा !" आई जेवण वाढता वाढता म्हणाली.
" अगं हो, थोडं महत्त्वाचे काम होते. ते उद्यापर्यंत आटोपायचे आहे." श्रीराज म्हणाला.
" आता तर आला आहेस , आरामात कामं कर. कसली एवढी घाई आहे ?" आई म्हणाली.
" अगं मला मामाच्या गावाला जायचं आहे. म्हणून इथल्या ऑफिसचा चार्ज लवकरात लवकर हातात घ्यायचा होता. एकदा काम समजवून सांगितले की मग आराम आहे." श्रीराज म्हणाला.
मामाच्या गावाला जायचं , नाव काढताच सगळे एकमेकांकडे बघायला लागले. श्रीराज आणि नंदिनीच्या मैत्रीची घरात बहुतेक सगळ्यांनाच कल्पना होती.
" तिकडे जायची काही गरज नाही आहे. आत्ताच आला आहात , आता इथेच राहायचं." आजीसाहेब म्हणाल्या .
" पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना मला लवकरात लवकर नंदिनीला भेटायला जायचं आहे. दोन वर्षापासून तिच्यासोबत काही नीट कॉन्टॅक्ट झालेला नाही. त्यामुळे मी परवाच गावी जाणार आहो. आणि हो , मी आठ दिवस सुट्टीवर आहो." श्रीराज जेवता जेवता म्हणाला.
" हे बघा , आम्ही तुम्हाला वाईट वाटेल म्हणून फोनवर सांगितलं नाही, पण नंदिनीचं लग्न झालेलं आहे . त्यामुळे आता तिला भेटायची तुम्हाला गरज नाही." आजीसाहेब म्हणाल्या.
श्रीराजची आई हे सगळं बोलणं मान खाली घालून ऐकत होती.
आजीसाहेबांनी नंदिनीच्या लग्नाबद्दल सांगितले , ते ऐकताच श्रीराजचा हातातला घास हातातच राहिला.
" काय ?इम्पॉसिबल ! मला अशी मस्करी आवडत नाही." श्रीराज थोडा रागात म्हणाला.
" नंदिनीच्या आबांचा दोन वर्षापूर्वीच फोन येऊन गेला होता, तेव्हा त्यांनी आम्हाला तिच्या लग्नाबद्दल कळवले होते . त्यानंतर त्यांच्यासोबत आपला काहीही कॉन्टॅक्ट राहिला नाही !" आजीसाहेब म्हणाल्या.
" असं, असं होऊ शकत नाही." श्रीराज ठामपणे म्हणाला .
" सुनबाई, त्यांना नंदनीच्या लग्नाची पत्रिका दाखवा." आजीसाहेब म्हणाल्या.
श्रीराजच्या काकूने त्याला पत्रिका आणून दाखविली.
त्याने ती पत्रिका हातात घेतली आणि त्यावरील मजकूर वाचू लागला . ती पत्रिका खरंच नंदिनीच्या लग्नाची पत्रिका वाटत होती. पण पत्रिका बघून सुद्धा त्याला नंदिनीचे लग्न झाले आहे, यावर विश्वास बसत नव्हता.
त्याने ती पत्रिका हातात घेतली आणि त्यावरील मजकूर वाचू लागला . ती पत्रिका खरंच नंदिनीच्या लग्नाची पत्रिका वाटत होती. पण पत्रिका बघून सुद्धा त्याला नंदिनीचे लग्न झाले आहे, यावर विश्वास बसत नव्हता.
" ही पत्रिका खोटी असू शकते. असं काहीही झालेलं नाही आहे. उगाच मला तिच्याबद्दल काहीही सांगू नका." श्रीराज चिडत म्हणाला. पण बोलतांना त्याचे डोळे थोडे पाणावले होते.
" हे बघ राज, चांगले मुलाचे स्थळ चालून आले असेल.. ती विना आई-वडिलांची मुलगी होती . तिच्या आजी-आजोबांना स्थळ चांगलं वाटलं असेल, म्हणून त्यांनी तिचं लग्न करून दिलं असेल. आणि तसे पण ते लोकं आपल्या स्टेटसचे कधीच नव्हते. पण तुला नेहमी मामाकडे जायला आवडायचे , म्हणून तुझ्या आवडी खातिर मी काही बोलत नव्हतो. मी इकडे तुझ्यासाठी एक चांगली , तुला शोभेल अशी शिकलेली, वेल करियर असलेली मुलगी शोधलेली आहे . ती माझ्या बिझनेस पार्टनरची मुलगी आहे. आम्ही तिचा हात तुझ्यासाठी मागितला आहे. तू एकदा तिला भेट म्हणजे, ही नंदिनी वगैरे काय तू सगळं विसरशील."शशिकांत त्याला समजावण्याचा भाषेत बोलत होते .
" अहो , आपण या विषयावर नंतर बोलूया. तो आत्ताच आला आहे , त्याला आराम करू द्या."आई म्हणाली.
जेवणाच्या ताटाला नमस्कार करून श्रीराज तिथून उठून त्याच्या रूममध्ये चालला गेला. बेडवर पडल्या पडल्या त्याने नंदिनीचा फोटो हातात घेतला आणि तिला न्याहळू लागला.
अमेरिकेला गेल्यापासून तीन वर्ष त्याचा नंदिनीसोबत फोनवर कॉन्टॅक्ट होता. पण नंतर फोनला रेंज नाही, वगैरे असे काही कारण सांगून त्याचा तिला फोन लागत नव्हता आणि तो सुद्धा बिझनेसच्या कामात बिझी झाला होता. दिवस रात्रीचा घोळ असल्यामुळे बोलायला सुद्धा मिळत नव्हतं.
नंदिनीचा फोन लागत नाही म्हणून त्याने मामांना फोन करून तिचा हालचाल विचारला होता. मामाने सगळं ठीक आहे असं कळवलं होते. त्यामुळे मग तो निश्चिंत झाला होता.
नंदिनीचा फोन लागत नाही म्हणून त्याने मामांना फोन करून तिचा हालचाल विचारला होता. मामाने सगळं ठीक आहे असं कळवलं होते. त्यामुळे मग तो निश्चिंत झाला होता.
" जर तू नाही तर दुसरी कोणीच नाही. नंदू मी येतोय , उद्याच. मला इथे यांच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास नाही. मला माहिती आहे तू माझी वाट नक्कीच बघत असणार." तिचा फोटो बघत त्याच्या डोक्यात बरेच विचार सुरू होते .
तिच्या विचाराने श्रीराजचे मन खूप दाटून आलं होतं. असे काही घडेल , त्याच्या मनी सुद्धा नव्हते . त्याने अशा कोणत्याच गोष्टीची अपेक्षा केली नव्हती. त्याला त्याची आणि नंदूची शेवटची भेट आठवत होती. ते आठवून त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते . नंदिनीचा विचार करताना कधीतरी रात्री त्याचा डोळा लागला आणि तो झोपी गेला.
******
नंदिनीचे खरंच लग्न झाले असेल काय ? तिच्यावर असलेला श्रीराजचा विश्वास तुटेल काय ? श्रीराज त्याचा बाबांच्या मित्राच्या मुलीसोबत लग्न करेल काय ? नियती ने काय ठरवले आहे ... बघुया पुढल्या भागात.
*******
क्रमशः
*******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा