नंदिनी श्वास माझा 17

नववधू प्रिया मी बावरते
भाग-17: नववधू प्रिया मी


नंदिनीला नववधूच्या रुपात बघून श्रीराजला खूप आनंद झाला होता. त्याबरोबरच चार दिवसापूर्वीचा तो तिथे आला होता तो दिवस आठवून श्रीराजला गहिवरून आले होते. त्यामुळे त्याच्या डोळ्यातून काही अश्रू बाहेर पडलेच.


नंदिनीला तिच्या लग्नाची किती आवड होती. तिच्या लग्नाचे कितीतरी गोड, रंगीबिरंगी स्वप्न तिने रंगवले होते. श्रीराज अमेरिकेला असताना, कोणाच्या लग्नावरून आले की ती फोन वरती त्याच्याशी लग्नाच्या गप्पा करायची. काय काय , कसे कसे झाले सांगत असायची.

" शरू , आपण दोघं ना , आपल्या लग्नात मॅचींग मॅचींग कलर घालूया . मला रेड कलर फार आवडतो , तर आपण रेड कलरचेच कपडे घालूया." नंदू फोन वर म्हणायची.

" ये , नाही हा , ते बँडपार्टीसारखे मला काय घालायचं नाही. आपण वेगवेगळे मस्त कलर्स घेऊया." तो नेहमी तिची अशी मस्करी करायचा ..

"ए बाबा , असं काही नाही हा. मी म्हणेल तसेच होणार. माझं लग्न आहे ना मग माझ्याच मताने सगळं होणार . मी तर तुला मेहंदी सुद्धा लावून देणार आहे, ते पण खूप मोठी." नंदू आपला सगळा हट्ट त्याचाकडे करत .

" ये बाई , मी असं बिस काही करणार नाहीये . मुलांना कधी मेहंदी लावलेले बघितले आहे काय तू ? उगाच त्रास नाही द्यायचा हा नंदू , लग्न माझं पण असणार आहे. मी सगळं माझ्या मताने करणार आहे." शरू तिला परत चिडवत.

" ए शी बाबा , तू ना तिकडे जाऊन फारच खडूस झाला आहेस .अजिबातच तू माझं ऐकत नाही." नंदू म्हणायची .

" खडूस काय? थांब मी आलो की तुला माझा खडूसपणा दाखवतोच." शरू म्हणायचा.

नंदूला त्याचा बोलण्याचा अर्थ कळला की ती लगेच लाजतच विषय बदलायची .

" आणि , ते ना टीव्ही सिरीयलमध्ये, मुव्हीजमध्ये दाखवतात ना , मला अगदी तसंच नटायचे आहे. मला माझ्या डोक्यापासून नखापर्यंत दागिने घालायचे आहेत. मी खूप गजरे लावणार आहे." तिची अशी अखंडपणे बडबड चालू असत.

" शरू , लवकर येना रे , आता मला तुझी खुप आठवण येते . किती दिवस झाले , तुला बघितले सुद्धा नाही . बघ , आता मी कुठलाच हट्ट करणार नाही. तू म्हणशील तसेच सगळं करू आपण . पण प्लीज आता लवकर ये ना, मला आता तुझ्याशिवाय रहावलं नाही जात रे." बोलता बोलता तिला तिचे अश्रू अनावर व्हायचे आणि मग शरू तिची समजूत काढायचा .

श्रीराजला तिचे सगळे बोलणे जसे lच्या तसे आठवत होते. त्याने तिला आवडत होते , सगळी अरेंजमेंट तशीच केली होती.

" नंदू , माझ्याकडे एकदा बघ ग, बघ तू म्हणाली होती त्याप्रमाणे मी रेड कलरचा ड्रेस घातलेला आहे. तुझ्यासोबत रंग मॅच केला आहे . बघ तुझ्या आणि माझ्या मुंडावळ्या देखील सेम सेम आहेत. माझ्या हातावर मी मेहंदी सुद्धा काढली आहे. त्यात आपल्या दोघांचं नाव सुद्धा लिहिलं आहे ' शरू- नंदू '." तो आपल्या हातावर काढलेल्या मेहंदीकडे बघत मनातच बोलत होता .

" बाळा, असं लग्न मला कधीच करायचं नव्हतं. सगळं तुझ्या आवडीने करणार होतो. तुझे सगळे हट्ट मला पुरवायचे होते ग राणी . कर ना ग हट्ट ,मला मारायला धाव ना माझ्या मागे. नंदू मला सगळं पूर्वीसारखे हवे आहे ग ." त्याच्या डोळ्यात पाणी दाटले आणि त्याला चार दिवसांपूर्वी घडलेल्या गोष्टी डोळ्यासमोर दिसू लागल्या.

अमेरिेका वरून परत आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकरच उठला. त्याने आपली बॅग भरली दोन-चार कपडे काय ते त्यात कोंबले .

" श्रीराज , इतक्या घाईने जायची खरंच गरज आहे काय ? कालच इतका लांबचा प्रवास करून आला आहे. तुझा आराम सुद्धा नीट झाला नाही आहे. इतक्या दूर ड्राईव्ह कसा करशील?" आई त्याचा काळजीने बोलत होती .

" आई , नंदू माझी वाट बघत असेल . मला आता जायलाच हवे. डोन्ट वरी , मी ड्राईव्ह करणार नाही. मी ड्रायव्हर काकांना सोबत घेऊन जातो आहे , पण प्लिज आता मला थांबवू नको." श्रीराज बॅग भरत म्हणाला .

" बाळा , तिथे कोणीच तुझी वाट बघत नाही आहे , विश्वास ठेव माझ्यावर." आई कळकळीने सांगत होती .

"आई , तू तरी अशी नको बोलू . तुला तर सगळं माहिती आहे ना, लहानपणापासूनच नंदू मला खूप आवडते . तुम्ही सगळे समजत आहात, ती तशी मुलगी नाही आहे. ती फक्त माझ्यासाठी थांबली आहे . मला माहिती आहे ती माझी वाट बघत असेल." शरू म्हणाला.

" आई , मी ऑफिसला चाललो आहे आणि तिथूनच परस्पर मी तिकडे गावी जाईल . नाश्ता आणि जेवण सुद्धा मी तिकडेच करेल. काळजी करू नको. चल येतो ." म्हणत तो बॅग घेऊन बाहेर पडला.

ऑफिसमध्ये येऊन त्याने थोड्या फाईल चेक केल्या. मिस्टर शहा आणि शैलाला काय बदल हवे ते समजावून सांगितले . रोहन त्याचा मित्र त्याने सुद्धा त्याची कंपनी जॉईन केली होती. रोहन वर ऑफिसची सगळी जबाबदारी सोपवून तो नंदूला भेटायला तिच्या गावी जायला निघाला.

श्रीराजची कार वाड्या समोर येताच , समोर नंदूला बघून त्याने करकचून गाडीला ब्रेक मारला. तिला सुखरूप बघून आता कुठे त्याच्या जीवात जीव आला होता. रस्त्याने पूर्ण वेळ नंदू त्याच्या डोक्यात होती. ' खरंच ती माझी वाट बघत नसेल का ?', असे अनेक विचार त्याच्या डोक्यात येत होते आणि त्याच्या जीवाची घालमेल सुरू झाली होती. आता प्रत्यक्षात नंदूला समोरबघून त्याने सुखाचा श्वास घेतला होता. लगेच तो गाडीचे दार उघडत गाडीबाहेर उतरला.

नंदूने लाईट येलो कलरचा पटियाला कुर्ता घातला होता. केस मोकळे आणि थोडे विस्कटलेले होते. ती पायजमा सलवार हातात पकडून तिथे तीन-चार लहान मुलींसोबत लंगडीचा खेळ खेळत होती. तिला नेहमीच लहान मुलांसोबत खेळायला आवडायचे. श्रीराज तिथेच गाडीला टेकून थोड्यावेळ भान हरपून तिला बघत होता. तिचे ते हसणे, ओरडणे एन्जॉय करत होता.

" ओ काका, ही अशी मध्येच कोणी गाडी लावतात काय ? आम्ही इथे खेळत आहोत, तुम्हाला ते दिसत नाही काय ?" नंदू दोन्ही हात कमरेवर ठेवून श्रीराजकडे बघत बोलत होती. तिच्या आवाजाने तो भानावर आला आणि तिला जवळ आलेले बघून त्याने छान स्माईल केले.

" अग ए, जर मी काका, तर तू काकूबाई झालीस की." तो हसतच तिचे नाक ओढत म्हणाला.


" हात लावायचा नाही हा , नाहीतर आजी जवळ तुमचं नाव सांगेल." ती आपलं नाक चोळत म्हणाली.

" लावेल. जा , काय करशील? आणि हे नेहमी नेहमी मला आजीच्या नावाची धमकी नाही द्यायची हा?" श्रीराज तिची मस्करी करत म्हणाला.

" तुम्ही पहिले ती गाडी तिथून हटवा, आम्ही तिथे खेळत आहोत. आणि तुम्ही इथे का आले आहात? हो अच्छा, आबांना भेटायला आले आहात काय?" नंदू चिडत म्हणाली.


" हो आबांना तर भेटायला आलोच आहे, तुला सुद्धा भेटायला आलो आहे."शरू म्हणाला.

" मला? मला काबरं ? " नंदू प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती .

" ए बाई, बस कर ना आता मस्करी. तुला माझा राग आला आहे , ते मला माहिती आहे . मला यायला थोडा उशीर झाला , त्यासाठी खूप मोठं सॉरी. पण आता पुरे कर ग मस्करी" श्रीराज तिचे गाल ओढत म्हणाला.

" तुम्हाला सांगितलं ना , मला हात लावायचा नाही म्हणून, तुम्ही इतके मोठे आहात , तरी एकदा सांगून तुम्हाला कळत नाही का? मी आता खरंच आजी जवळ जाऊन तुमचं नाव सांगेल आहे आणि पहिले ती गाडी बाजूला करा. आबाआतमध्ये बसले आहेत , तुम्ही आतमध्ये जा." नंदू चिडतच बोलली.

" बरं! आता जास्ती रागावू नको , मी आतमध्ये जातो, ये तू.. पण हा लवकर ये , तुला डोळेभरून बघायचे आहे." म्हणत त्याने गाडी साईडला पार्क केली आणि तो आतमध्ये निघून आला .

" आबाssss , आजी ssss !"आवाज देत तो आतमध्ये गेला.

आजी आतमध्ये काही काम करत होती , त्याचा आवाज ऐकून आजीच्या हातातले पातेले खाली पडले . त्या धावतच बाहेर आल्या तर डोळ्यांसमोर श्रीराज उभा होता. त्या त्याच्याकडे पाणी भरल्या डोळ्याने एकटक बघत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर तो आल्याचा आनंद स्पष्ट दिसून येत होता.

" आला बाळा तू ! किती वाट बघत होते तुझी ." आजी त्याच्या केसांवरून, चेहऱ्यावरून तिचे दोन्ही हात फिरवत , त्याचा आपल्या हाताने मुका घेत बोलत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते.

त्याने आजीला आपल्याजवळ मिठीत घेतले.
"आजी , आबा कुठे आहेत ?" श्रीराज म्हणाला.


" हे , हे काय तिथे बैठकीत बसले आहे . चल , तुला बघून त्यांना खूप आनंद होईल."म्हणत आजी त्याला आतमध्ये घेऊन गेली.

" अहो नंदिनीचे आबा , बघा कोण आलंय " आजी आबांना आवाज दिला. आबा कुठेतरी शून्यात नजर हरवून बसले होते. त्यांचं तिच्या आवाजाकडे लक्ष नव्हतं.

श्रीराज आबांच्या पायाजवळ खाली जाऊन बसला.

" आबा, आबा!" श्रीराजने स्वतःचा हात आबांच्या हातावर ठेवला. त्याचा हाताच्या स्पर्शाने आबा भानावर आले आणि त्यांचं लक्ष श्रीराजकडे गेले.


" आला बाळा तू ! मला माहित होतं , तू नक्की येशील , तू नक्कीच येशील , मला माहित होतं! " आबा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले आणि त्यांच्या डोळ्यात सुद्धा आता पाणी दाटून आले होते .

श्रीराजला पहिल्यांदाच आबा एवढे हतबल दिसत होते. त्याने आबांना या आधी कधीच असं बघितलं नव्हतं.


" आबा तुम्ही ठीक आहात ना ? काय झालं? तब्येत वगैरे ठीक तर आहे ना ? आणि हे काय तुमची तब्येत अशी का दिसते आहे ? या नंदिनीने तुम्हाला फार त्रास दिला काय?" तो काळजीने विचारपूस करत म्हणाला.


"हो हो , सगळं ठीक आहे !"आबा आपल्या भावनांना आवर घालत म्हणाले.

" अमेरिकेहून कधी आला ?" आबा त्याची विचारपूस करत होते .

" कालच आलो."श्रीराज म्हणाला .

" आबा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अभ्यासात खूप यश मिळाले आहे. बिजनेसच्या दुनियेमध्ये चांगलं नाव झालं आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी मला यंगेस्ट बिझनेसमनचा अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे." तो आबांना आतापर्यंतचे झालेले सगळं खूप उत्साहाने सांगत होता.

" हो हो बाळा, तुझ्यावर पूर्ण विश्वास होता . तू खूप मेहनती आहेस , हुशार आहेस , हे तर होणारच होतं." आबा कौतुकाने म्हणाले.

" आबा, माझं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. आता फक्त एकच स्वप्न पूर्ण करायचं उरलं आहे. तुमचा आशीर्वाद द्या , म्हणजे ते सुद्धा मला लवकरात लवकर पूर्ण करता येईल." श्रीराज म्हणाला.


त्याच्या या वाक्यावर आबा काही बोलले नाही , ते फक्त त्याच्याकडे बघत होते.

" अहो आबा , तुम्ही असं काय करत आहात? अमेरिकेला जायच्या आधी तुम्हाला बोलून गेलो होतो की आता नेक्स्ट टाईम आलो की नंदनीला नेहमीसाठी स्वतःसोबत घेऊन जाईल. आता मागे हटायचं नाही. मी तुम्हाला तेव्हाच बोललो होतो , तिचे जितके लाड करायचे आहेत , करून घ्या . आल्यावर मी काहीही ऐकणार नाही म्हणून. विसरले काय ?" श्रीराज आबा काही बोलत नाहीये बघून पुढे म्हणाला.

त्याच्या अशा बोलण्याने आजी आबा दोघांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आले.

" अहो नंदूच्या आजी , पोरगं लांबून आलं आहे. आधी त्याचा खाण्यापिण्याचं बघा?" आबा विषय बदलत म्हणाले.

" आबा , तुम्ही विषय बदलू नका . मला आत्ताच तुमची परवानगी हवी आहे." आबा विषय बदलत आहे बघून त्याच्या जीवाची घालमेल सुरू झाली होती.


" अरे हो, इतकी काय घाई आहे? आपण नंतर आरामात बोलूया." आबा म्हणाले .

तेवढ्यात नंदिनी आतमध्ये आली..

" आजी , बघ ना ग ती पिंकी , मला मारत होती ..खेळतांना नुसती माझ्यासोबत भांडत असते." नंदू रडक्या आवाजात बोलत आतमध्ये आजी जवळ आली. बघते तर श्रीराज तिथे आबांजवळ बसला होता. त्याला बघून ती रडायची चूप झाली आणि आजीजवळ जाऊन उभी राहिली.

" आजी , हे काका कोण आहेत ग ?मघाशी मला बाहेर भेटले होते . माझं नाक सुद्धा ओढत होते. त्यांना मला हात नका लावू सांगितलं तरी माझा ऐकत नव्हते." नंदिनी एका डोळ्याने श्रीराजकडे बघत आजीच्या कानामध्ये खुसुर पुसुर करत होती.


"ए चिमणे, तिथे काय आजीजवळ जाऊन माझी कम्प्लेंट करते ग ?" म्हणत तो त्या दोघींजवळ गेला.

" आजी , हे कोण आहे ? यांना सांग ना , मघापासून हे मला खूप चिडवत आहेत. मी खेळत होते , तिथे मध्येच त्यांनी आपली गाडी आणून उभी केली होती." नंदिनी म्हणाली.

" नंदू , आता बस झालं हा हे नाटकी नाटकी वागणं . आलोय तेव्हाचा बघतोय, काय मला काका बोलतेस , हात लावू नको म्हणतेस . आजी बघ ग , ही किती रुसून बसली आहे . आलोय तेव्हापासून मला काहीच ओळख दाखवत नाहीये. आधी नेहमी आलो की पहिले गळ्यात पडायची. आता साध हात लावला तरी ओरडते आहे." म्हणत तो नंदूच्या अगदी जवळ गेला.

त्याला असे तिची आजीजवळ कंप्लेंट करतांना आणि जवळ येनातांना बघून तिने रागाने त्याला धक्का मारला आणि तिथून पळत आतमध्ये गेली. तिचे तसे वागणे त्याच्या खूप जिव्हारी लागले होते. तो पण पळतच तिच्यामागे आतमध्ये गेला.

पळत असताना त्याने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढत स्वतःच्या मिठीत घेतले .

" सॉरी ना ग पिल्लू, मला माहिती आहे तुला माझा खूप राग आला आहे, पण आता तू अशीच दूर दूर पळणार आहेस काय? आपण किती वर्षांनी भेटतो आहे. प्लीज ना बाळा एकदाच अशी मिठीत ये. तुला मन भरून मला मिठीत अनुभवायचे आहे. नको ना आता दूर जाऊ , तुझ्याशिवाय आता रहावल्या जात नाही . तू म्हणशील ते सगळं करेल आहे , फक्त आत थोड्या वेळ शांत बस." म्हणत त्याने तिच्या कपाळावर, केसांवर कीस केले.

तिने रागाने, आपला पुर्ण जोर लावून त्याला स्वतः पासून दूर ढकलले आणि धावतच ओरडत आजीजवळ आली.

तिच्या असे अनपेक्षित वागण्याने त्याला खूप राग आला आणि त्याला वाईट सुद्धा वाटले.

" आजी , हे बघ मला त्यांच्या कुशीत घेत होते. त्यांना माझ्या दूर राहा म्हणून सांग आधी. मला ते काका अजिबात आवडले नाही." नंदिनी म्हणाली.

तिचं हे बोलणं ऐकून श्रीराज आश्चर्यचकित झाला. थोडे नर्वसपणे तो आजीकडे बघत होता. ती हे असं काही आजीजवळ येऊन सांगेल, त्याने तिच्याकडून अशी काही अपेक्षाच केली नव्हती. आजी सुद्धा एकटक त्याच्याकडे बघत होती. तिच्या अशा वागण्याने आता त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी जमा झाले होते.


" हो सांगते, तू आतमध्ये जा." आजी नंदिनीला म्हणाली, तसे नंदिनी आतमध्ये गेली . तो तिच्याकडे बिचाऱ्या, केविलवाण्या नजरेने बघत होता.

" आजी, ती मला ओळख का दाखवत नाही आहे? इतकं काय कोणी रुसून बसते काय ? " श्रीराज हतबल होत म्हणाला.

आता त्याला सगळं खरं सांगावं लागेल , हे आजी-आजोबांच्या लक्षात आले.

" श्रीराज , ती आता तुला ओळखत नाही. ती तुला विसरली आहे. तिच्यासाठी तू आता परका व्यक्ती आहेस." आजी म्हणाली.

आजीचे ते शब्द श्रीराजच्या हृदयावर शेकडो वार करत होते . त्यांचे ते बोलणं एकूण तो मटकन खाली बसला. आणि त्याला त्याचा आईचे शब्द आठवले , ' तुझी आता तिथे कोणीही वाट बघत नाही आहे ' , त्याच्या डोळ्यांतून पाणी व्हायायला लागले . आजी आबांना सुद्धा त्याच्याकडे बघून खूप वाईट वाटत होते.

*********

काय झालं असे की नंदू श्रीराजला अजिबात ओळख दाखवत नाही आहे ? बघुया पुढे.

क्रमशः

**********

🎭 Series Post

View all