Login

नंदिनी श्वास माझा 21

मुस्कुराने की वजह तुम हो..
भाग 21: मुस्कुराने की वजह तुम हो


श्रीराज आणि नंदनी आता जवळपास मुंबईत पोहोचले होते. नंदिनी आतासुद्धा गाढ झोपली होती. घर जवळ यायला थोडाच वेळ उरला होता.. श्रीराजने नंदिनीला उठवले. ती आळस देत उठली.


" आपण कुठे आलो ?" खिडकीतून बाहेर बघत नंदीनी म्हणाली .

" आपण मुंबईला पोहोचत आलो आहे." श्रीराज म्हणाला .

" बापरे राज , इथे किती साऱ्या मोठ्या गाड्या आहे. किती मोठी मोठी दुकाने आहेत!" खिडकीतून बाहेर बघतांना तिथली रौनक बघून नंदिनीचे डोळे दिपून गेले होते. जे जे तिला दिसत होतं ते सगळं ती उड्या मारत राजला सांगत होती.

" कधीतरी आपण जाऊया फिरायला , तुला सगळं दाखवेल. " नंदिनीचे विस्कटलेले केस नीट करत राज बोलत होता. त्याने तिची साडी, दागिने , केस सगळं नीट करून दिले.

" नंदिनी , आता आपण घरी पोहचणार आहोत." श्रीराज म्हणाला.

श्रीराज सांगत होता त्यावर नंदिनी हो हो करत होती , पण तिचे सगळे लक्ष खिडकीतून बाहेर बघण्यात होते .

त्यांची कार त्यांच्या घराच्या मेन गेट जवळ येऊन पोहोचली. श्रीराज बाहेर उतरणारच की त्याला मिडीयावाले कॅमेरे घेऊन तिथे उभे असलेले दिसले , आफ्टर ऑल तो नावाजलेला बिजनेसमन , मोस्ट एलिजिबल बॅचलर होता आणि बरीच मुली त्याच्या मागे होत्या. .त्यामुळे अश्या अनपेक्षित लग्नामुळे ब्रेकिंग न्यूज तर होणारच होती.


" सगळं गोपनीय ठेवलं होतं , तरी यांना कसं काय कळलं?" रोहन मिडीयाला तिथे बघून म्हणाला.

" ह्म्म ! मीडिया आहे ती , आता त्यांना सामोरे तर जावंच लागेल.. मी थोडं बघतो , बाकी तू हँडल कर." श्रीराज म्हणाला.

सिक्युरिटी गार्ड आणि ड्रायव्हर तिथे आले. ते मीडियाला मागे सारण्याचा प्रयत्न करत होते .

श्रीराज नंदिनीला घेऊन कारच्या बाहेर उतरला. त्यांना बघून लगेच सगळे मीडियावाल्यांनी त्याच्याभोवती घोळका केला आणि फोटो काढायला सुरुवात केली.

" Wow! she is so pretty , they are looking made for each other." मीडियाच्या घोळक्यातून आवाज आला.

नंदिनीने लेमन येल्लो कलरची शिफॉन साडी नेसली होती, त्यावर तसेच मॅचिंग ब्लाऊज होते. केसांची लांब सडक एक वेणी घातली होती. त्यातल्या काही बटा समोर तिच्या गालावर, कानावर हवेने उडत होत्या. डोळ्यामध्ये काजळ, कपाळावर तिची आवडती चंद्रकोर, हातात हिरव्या बांगड्या , त्यात हट्टाने तिने आजीकडून साडीला मॅचिंग बांगड्या हिरव्या बांगड्यापुढे घातल्या होत्या आणि गळ्यात फक्त मंगळसूत्र , बाकी एकही दागिना घातला नव्हता. त्या साध्याशा रूपात सुद्धा ती फारच गोड दिसत होती. श्रीराजने सुद्धा कॉटनचा क्रीमिष व्हाईट शर्ट, शर्टच्या बाह्य फोल्ड केलेल्या होत्या आणि ग्रे कलरची ट्राऊजर, ब्लॅक लेदर शूज. एखाद्या मॉडेलला लाजवेल असं त्याचं राजबिंडे रूप दिसत होते. लग्नाचं एक वेगळेच तेज त्याचा चेहर्‍यावर झळकत होतं..


ते ऐकून राज गालात थोडासा हसला. पण ते सगळं बघून नंदिनी मात्र खूप घाबरली होती. तिच्यावर पडणारे सतत कॅमेऱ्याचे फ्लॅश लाईट, ते सगळं बघून ती घाबरली आणि तिने श्रीराजचा हात पकडून त्याच्या खंद्यामागे आपला चेहरा लपवला. त्याने तिच्या डोक्यावर थाप मारत तिला एका हाताने आपल्या जवळ घेतलं.

" प्लिज थोडे दूर रहा, शी इस नोट फॅमिलिर विथ मीडिया अँड लाइट्स. शी इज व्हेरी uncomfortable विथ यू गाईस.. प्लीज, आय अम रिक्वेस्टइंग यू." म्हणत त्याने नंदिनीला त्याच्या मिठीत पकडत तिला थोडं मागे घेतले.

" सर , वी हर्ड टुडे यु गॉट मॅरीड ?" एका पत्रकाराने प्रश्न विचारला .

" येस!" श्रीराज उत्तरला .

" मॅम तुमच्या लहानपणीच्या मैत्रीण आहे काय ?" पत्रकाराने दुसरा प्रश्न विचारला.

" सर , शी ह्याड लॉस्ट हर मेमरी?" पत्रकाराणे विचारले .
असे बरेच खाजगी प्रश्न पत्रकार श्रीराजला विचारत होते..

आता मात्र श्रीराजला राग आला होता. एवढी सगळी माहिती यांना कुठून मिळाली असावी , याचाच तो विचार करत होता. त्याने त्याचा राग कंट्रोल केला आणि पत्रकारांच्या प्रशांनाची उत्तरं देऊ लागला..

" शी इज परफेक्टली फाईन. नाव नो मोर पर्सनल क्वेश्चन्स प्लीज, एक्सक्यूज अस !" म्हणत तो नंदिनीला घेऊन निघायला लागला..

" सर..... सर..... प्लीज वन कपल फोटो." पत्रकार म्हणाला.

" नंदिनी , थोड्यावेळ तिकडे कॅमेराकडे बघ , काही होणार नाही." श्रीराजने त्याच्या कुशीत असलेल्या नंदिनीला सांगितले.

ती मानेनेच नाही म्हणत होती आणि त्याला अजून अजून घट्ट बिलगत होती.

" नंदिनी , फक्त एकदा बघ तिकडे , ते आपला फोटो काढतील. आपला फोटो छान आला पाहिजे ना? तिकडे त्यांच्याकडे बघ आणि फक्त छोटीशी स्माईल दे, बस मग आपण आतमध्ये जाऊ. नाही तर ते आपल्याला फोटो काढल्याशिवाय जाऊ नाही देतील." श्रीराज नंदिनीला समजावत होता . तिने होकार भरला.

" मीट माय चाईल्डहूड फ्रेंड अँड नाऊ माय वाईफ , नंदिनी देशमुख. "श्रीराज.

नंदिनीने समोर बघितलं आणि घाबरतच त्यांनाच छोटीशी स्माईल दिली. श्रीराजने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतलं होतं आणि त्याने पण एक स्माईल दिले.

" काँग्रॅच्युलेशन्स सर अँड मॅम....."

" थँक्यू !" म्हणत श्रीराज नंदिनीला आतमध्ये घेऊन गेला.

" तर तुम्ही बघितलं फेमस यंग बिझनेस आयकॉन मिस्टर श्रीराज देशमुख हे आज त्यांची बालमैत्रिण नंदिनी देशमुख यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले आहे.." मीडियावाले न्यूज देत होते.


आता श्रीराज नंदिनी गेटच्या आतमध्ये आले होते. नंदिनीला आता थोडं कम्फर्टेबल वाटत होतं.

" राज , तू इथे राहतो ? हे तर एकदम चित्रात असते तसे राजवाड्या सारखेच दिसत आहे. " नंदिनी घर , बाकी सगळा परिसर बघत बोलली. तिने इतके मोठे घर कधीच बघितलं नव्हतं.

" मी नाही , आपण. आपण इथे राहणार आहोत. आता हे तुझं घर आहे." श्रीराज म्हणाला.

" खरंच? आता मी इथे राहणार? बापरे ! हे घर किती मोठं आहे. इथे किती छान बगीचा आहे . मला खूप आवडलं." नंदिनी आपले दोन्ही हात तिच्या गालांवर ठेवत डोळे मोठे करत बोलली.

त्याने मानेनेच हो सांगितले...

ते दोघ घराच्या दाराजवळ पोहोचले. आतमध्ये जाणार होते की आजीसाहेबांनी त्यांना दारातच अडवले.

" तिथेच थांबा . कधीची वाट बघत बसलोय आम्ही, तुम्ही यायला खूप उशीर केला. सुनबाई, आता आरतीचे ताट लवकर आणा." आजीसाहेब म्हणाल्या .

आजीसाहेबांचा आवाज ऐकून नंदिनीने घाबरून श्रीराजचा हात घट्ट पकडला.

" घाबरू नको , मी आहे ना."श्रीराज नंदिनीला म्हणाला.

श्रीराज सरळ उभा होता , नंदिनी मात्र दारातून वाकून आतमध्ये घर बघण्याचा प्रयत्न करत होती..

घरी सगळ्यांच्या मनाविरुद्ध लग्न झाले असल्यामुळे घरात तशी काही सजावट केली नव्हती की कसला उत्साह नव्हता .

आई आरतीचे ताट घेऊन आली. काकीने तांदळाचा कलश आणला आणि दाराच्या उंबरठ्या जवळ खाली ठेवला. आईने त्या दोघांवरून भाकरीचा तुकडा ओवाळून बाजूला टाकला. नंतर दोघांना तिलक लावून त्यांचे औक्षवाण केले. नंदिनीला ते सगळं बघून खुप गंमत वाटत होती.

" माझ्या वाढदिवसाला सुद्धा आजी अशीच आरती करते." नंदिनी म्हणाली .

" बरं , आता आपल्या उजव्या पायाने हे खाली ठेवलेल्या कलशाला धक्का दे आणि गृहप्रवेश कर !" आई म्हणाली .

" मी त्याला पाय नाही मारणार." नंदिनी म्हणाली .

" असं नाही म्हणायचं , चल आता लवकर आतमध्ये ये. "आई म्हणाली .

" त्यामध्ये तांदूळ आहेत . ते अन्न असते आणि आजीने सांगितले आहे अन्नाला आणि भांड्यांना कधीच पाय मारायचा नसतो, देव बाप्पा रागावता. मी त्याला पाय मारणार नाही. "नंदिनी म्हणाली .

श्रीराजला तिचे बोलणे ऐकून हसायला आले . " किती निरागस आहे ही , अगदी आधी सारखीच !"तो मनातच पुटपुटला.

नंदिनीचे बोलणे ऐकून आजीसाहेबांनी डोक्यावर हात मारून घेतला. " घ्या , आणा अशी सूनबाई, समोर आणखी काय काय दाखवेल, माहीत नाही." आजीसाहेब म्हणाल्या.

" श्रीराज, तिला माप ओलांडून घरात यायला सांग." नंदिनी ऐकत नाही आहे बघून आई श्रीराजला म्हणाली.

"ती बरोबरच तर बोलते आहे . लॉजिकली तिचं म्हणणं बरोबर आहे." नंदिनीकडे बघत राज हसत म्हणाला.

" आता यांचं पण डोकं फिरलं. नंदिनीच्या संगतीत राहून हे अजून वेगळं काय शिकतील ? आधीच फार उशीर झाला आहे , आटपा पटापट." आजीसाहेब म्हणाल्या .

" बाळा , तशी पद्धत असते. आज सकाळी तुमचं लग्न झालं ना , मग आज तू आमच्यासाठी देवीच झाली आहे.. आपण फार मोठी पूजा केली ना , तर आता तू या घराची लक्ष्मी आहे आणि पहिल्यांदा या घरात येत आहे , म्हणून असं करायचं असते." आई म्हणाली.


" पण ते तांदूळ खाली जमिनीवर पडतील ना , मग ते खराब होतील. आजी म्हणते अन्न वाया घालवायचे नाही . तिथे घराजवळ , त्या कोपऱ्यावर एक म्हातारे आबा असतात ना , ते फार गरीब आहे , त्यांना खायला काहीच नसतं . आपण जर अन्न असं वाया घालवलं तर त्यांना कुठून मिळणार ?" नंदिनी म्हणाली.

"वाया नाही जाणार , आपण ते परत पातेल्यात भरून, धूवून टाकू. आणि आपण त्या आबांना खूप सारं अन्नदान करूया , आता खुश ना ? आपण देव बाप्पाची पूजा झाल्यावर देवावर अक्षद वाहत असतो ना लग्न झाल्यावर जेव्हा नववधू घरी येते , तेव्हा असं घरात अक्षदा टाकायची असते , म्हणजे घर खूप सुख-समृद्धी धान्य आधी सगळ्यांनी भरभरून राहते. आता चल, पटकन कर." आई म्हणाली .

नंदिनीने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या पायाने कलशाला धक्का दिला. पण ते कलश काही खाली पडत नव्हते. दोन-तीनदा ती तसंच करत होती तरीसुद्धा कलश खाली पडायचं काही नाव घेत नव्हते , ते जागच्या जागीच हलत होते..
सगळ्यांना आता खूप हसायला येत होते.

" अगं थोड्या जोराने पाय मार." काकी म्हणाली .

नंदिनीने जोराने मापट्याला पाय मारला , तसे ते घरंगळत आजीसाहेबाच्या पायाला जाऊन लागले.

" अगं हळू.." ते बघून आई डोक्यावर हात मारत म्हणाली .

" घ्या , पहिल्याच दिवशी आम्हाला मारायला निघाल्या आहेत .. देवा आणखी काय काय दाखवणार आहे", म्हणत आजीसाहेब बाजूला चेअरवर जावून बसल्या.

ते ऐकून काकीच्या आणि बाकीच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटले पण आजीसाहेबांसमोर सगळ्यांनी आपले हसू कंट्रोल केले.

" दोघंही आतमध्ये या आणि देवाजवळ नमस्कार करा." म्हणत काकीने दोघांना देवघरामध्ये नेले.

देवाला नमस्कार करून श्रीराज नंदिनी आजीसाहेबांजवळ नमस्कार करायला आले.

" आजीसाहेब , सॉरी ते चुकून झालं." म्हणत श्रीराजने आजीसाहेबांना नमस्कार केला.

" बरं बरं , ठीक आहे.. चला सगळेजण झोपा, बराच उशीर झाला आहे." आजीसाहेब म्हणाल्या .

लग्नाच्या थकव्यामुळे कोणाला भूक तर नव्हती , पण नावासाठी म्हणून सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घेतले आणि सगळे आपल्या रूमकडे जायला निघाले.. श्रीराज सुद्धा नंदिनीला घेऊन त्याच्या रूमकडे जात होता.


" हे काय, नंदिनी आज नीतीच्या रूम मध्ये झोपेल.. अजून सत्यनारायणाची पूजा व्हायची आहे.. त्यामुळे तिला तुम्ही तुमच्या रूम मध्ये घेऊन जाऊ शकत नाही." आजीसाहेब म्हणाल्या .


" ती इथे नवीन आहे . इथे कोणाला ओळखत नाही.. तिला भीती वाटेल आणि अनकंफर्टेबल फील होईल म्हणून माझ्या रूम मध्ये घेऊन जातो. "श्रीराज म्हणाला.

" आता तुम्ही आपल्या सगळ्या चालीरीती पण मोडून काढा." आजीसाहेब रागाने म्हणाल्या.

" आजीसाहेब , आमचं लग्न हे नॉर्मल लग्नासारखं नाही आहे , तुम्हाला तर सगळं ठाऊक आहे. आमचं नवरा बायको सारखं नातं सरू व्हायला अजुन भरपुर वेळ आहे. ते होणार की नाही ते पण माहिती नाही."बोलता बोलता त्याचा आवाज खोल गेला.. " त्यामुळे आता असं काही होणार नाही आहे ज्याने तुमच्या चालीरीती माझ्यामुळे मोडल्या जाणार आहेत . मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की ती इथे नवीन आहे , इथे ती फक्त मलाच ओळखते.. मी तिला माझ्या रूममध्ये घेऊन जातो आहे." श्रीराज म्हणाला.

" आईसाहेब , मला पण त्याचं बरोबर वाटते आहे." नीती घाबरतच बोलली.

" जसं वाटते, तसं करा. " आजीसाहेब बोलल्या.

सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. श्रीराज सुद्धा नंदिनीला त्याच्या रूम मध्ये घेऊन आला.

" बापरे राज , किती सुंदर आहे तुझी रूम आणि किती मोठ्ठी सुद्धा आहे.." ती दारात आल्या-आल्या उड्या मारतच आत मध्ये गेली .

" अगं हो हो , हळू , नाहीतर साडीत पाय अडकून पडशील." राज म्हणाला.

" बरं तू इथे बेडवर बस , मी फ्रेश होऊन येतो."श्रीराज बाथरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेला.

नंदिनी बेडवर बसून, बसल्याबसल्या उड्या मारत होती. " किती मऊ आहे ना ही गादी , मज्जा आहे !" नंदिनी बेडवर खेळत स्वतःशीच बोलली.

श्रीराज फ्रेश होऊन आला तर नंदिनी खेळताना दिसली. थोड्यावेळ तो तिथेच उभा तिची मस्ती बघत होता .

" चल , आता तू पण चेंज करून घे. खूप रात्र झाली आहे , लवकर झोपूयात." श्रीराज नंदिनीला म्हणाला.

" हो , मला पण हे कपडे आवडले नाही. दुसरे घालूया." नंदिनी साडीचा पदर ओढत म्हणाली.

" राज , इथे पदर अडकला आहे . निघत नाही. काढून दे ना मला , माझा हात दुखायला लागला." ती आरशासमोर उभी होती आणि खांद्यावरील साडीचा पदर काढायचा प्रयत्न करत होती.

राज तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. खांद्यावरच्या तिच्या पदराची पिन काढायचा प्रयत्न करत होता. त्याला असं तिला टच करताना अवघडल्यासारखे वाटत होते. पण आता त्याला या सगळ्याची सवय करून घ्यायला लागणार होती.

नंदिनी आरशात बघून वेडेवाकडे तोंड करत होती. त्यामुळे तिची खूप हालचाल होत होती .


" नंदिनी सरळ उभी राहा, मला पिन काढता येत नाही. " श्रीराज म्हणाला. तरीसुद्धा नंदिनीचे हलनेडूलने सुरूच होते.

" आऊच !" पीन काढताना राजला ती टोचली. तो हात झटकत होता.

" काय झालं, काय झालं ? दाखव?" म्हणत नंदीनीने त्याचा हात आपल्या हातात घेतला.

" बापरे ! किती लागलं ? खूप दुखत आहे का ?" ती त्याच्याकडे बघत केविलवाणा चेहरा करत म्हणाली.

" नाही.मी ठीक आहे." राज म्हणाला.

" तुझ्या बोटातून तर रक्त येत आहे. थांब , मी औषध लावून देते.. तू इथे बेडवर बस. "म्हणत ती काहीतरी शोधायला गेली. तिच्यासाठी असं थोडंसं पण लागणं म्हणजे खूप मोठं होतं .

" माझी प्रस कुठे आहे ? आजीने त्यात औषध ठेवले होते." ती आपली पर्स आजूबाजूला शोधत बोलत होती.

" नंदिनी, प्रस नाही पर्स , ती बघ तिथे चेअर वर आहे." राज म्हणाला.

तिने लगेच ती पर्स बेडवर घेऊन आली आणि त्यात हात टाकून काहीतरी शोधत होती. पण तिला ते काहीच सापडत नव्हतं . नंतर तिने ती पर्स पूर्ण उलटी करून बेडवर उपडी केली. सगळ सामान बेडवर पडले. ते बघून राजने डोक्यावर हात मारला.

" हा सापडली." तिने त्यातली बोरोलीनची ट्युब काढली आणि ती उघडून त्यातले क्रीम आपल्या बोटावर घेत राजच्या बोटावर फुंकर मारत लावू लागली.

"आजीनी सांगितलं , काहीपण लागलं की हे औषध लावायचं म्हणजे लवकर बरं होते." नंदिनीची अखंड बडबड सुरू होती. पदराची पिन काढल्यामुळे तिचा पदर सुद्धा अंगावरून खाली घसरला होता. नंदिनी मात्र क्रीम लावण्यात मग्न झाली होती..

राजला तिची बडबड एकूण हसू येत होतं.. " वेडाबाई , माझ्याबद्दल प्रेम आणि काळजी तर आता सुद्धा खूप आहे , पण आठवत काहीच नाही. " हवेवर उडणारे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते, तिच्या ओठांची सतत हालचाल सुरू होती . राज तिचे ते रूप बघण्यात बिझी झाला होता..

" श्रीराज , उद्या पूजा ठेवली आहे .." आवाज देत आई त्याच्या रूममध्ये येत होती.

आईच्या आवाजाने श्रीराज भानावर आला. तो लगेच बेडवरून उठला. त्याचं लक्ष नंदिनीकडे गेलं, त्याने पटकन तिचा पदर नीट करत तिच्या खांद्यावरुन दिला.

" काय रे काय झालं? हाताला काही लागलं आहे काय ?" आईने रूममध्ये येत विचारले.

" काही नाही, ठीक आहे." राज म्हणाला.

" काकी, ते साडीची पिन काढताना त्याला पिन टोचली . त्यातून खूप रक्त येत होते , म्हणून औषध लावून देत होती . " बोलता-बोलता परत नंदिनीचा पदर खाली घसरला. आईचं लक्ष नंदिनीकडे गेलं.तिला तसं बघून आईने राजकडे बघितलं, त्याने ओशाळून लाजेने मान दुसरीकडे फिरवली.

" नंदिनी, हे बघ , साडी नेसली की हा पदर असा पकडून ठेवायचा असतो. हे बघ माझा कसा मी पकडून ठेवला आहे. कर बघू नीट तो." आई नंदिनीला प्रेमाने म्हणाली.

" हो काकी." म्हणत ती खाली पडलेला पदर घ्यायला खाली वाकली आणि पदर पकडायचा प्रयत्न करत होती. पण तिच्या हाती पदर काही लागत नव्हता. स्वतःभोवती गोल गोल फिरत ती साडी पकडण्याचा प्रयत्न करत होती.. त्यामुळे अजून तिची उरलीसुरली साडी सुद्धा सुटली.

तिची चाललेली करामत बघून आईने राजकडे बघितले आणि डोक्यावर हात मारून घेतला.

" आयुष्याची खूप मोठी परीक्षा द्यायला निघालास बाळा , देव तुला या परीक्षेत पास करू दे.' त्याच्या डोक्यावर हात ठेवत आई बोलली. राजने आईचा हात हातात पकडून त्यावर त्याने डोके ठेवले.

आईने नंदिनीला साडी नीट करून दिली..
नंदिनी आईकडे बघून खूप गोड हसली..." काकी आजी पण अशीच करून देत असते."

" काकी नाही , आता मला आई म्हणायचं." नंदिनीच्या गालावरुन हात फिरवत आई म्हणाली.

" खरंच ? तुम्ही माझी आई आहात? ही माझी आई आहे ? " राजकडे बघत नंदिनी आनंदाने बोलत होती..

राजने हसतच मानेने होकार दिला..

" हो, मला राज म्हणाला होता मुंबईला गेले तर तुला आई भेटेल. ये......ये...... माझी आई sss !" म्हणत ती उड्या मारतच नीतीच्या गळ्यात पडली. तिने आईच्या गालावर कीस केले.

" माझी आई खूप छान आहे...सुंदर पण आहे." नंदिनी बडबड करत होती. तिला तसे आनंदी बघून राजला सुद्धा खूप आनंद झाला. आईने सुद्धा तिला मिठीत घेतले आणि तिच्या पाठीवर प्रेमाने थोपटले..

" थँक्यू आई." राजचे डोळे आनंदाने पाणावले.

" ये तू पण."म्हणत दुसऱ्या हाताने आईने राजला आपल्या मिठीत घेतले. त्यानेसुद्धा दोघींना आपल्या मिठीत घट्ट पकडले.

आज नव्या आयुष्याची एक पायरी तो यशस्वीपणे चढला होता.