Login

नंदिनी श्वास माझा ७

शरू ची मैत्रीण
शरूने मित्रांची घरात सगळ्यांसोबत ओळख करून दिली.
त्याने सगळ्यांना त्यांची राहायची सोय दाखवली.
वरतीच मुलींना वेगळी रूम दिली होती. रोहन आणि राहुलची सोय शरूच्याच रूममध्ये केली होती. सगळे फ्रेश झाले, खाली येऊन सगळ्यांनी मस्त जेवणावर ताव मारला.

उन्हाळ्याचे दिवस, त्यात झालेला प्रवास , सगळे थकले होते , त्यामुळे सगळ्यांनी आराम करायचं ठरवलं. सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन बिछान्यावर आडवे झाले.

संध्याकाळी ६ ला सगळे फ्रेश होऊन खाली आलेत. मामींनी त्यांना मस्त थंड थंड सरबत दिले.

सरबत घेऊन सगळे बाहेर आलेत. आज शरूने त्यांना त्यांचा वाडा दाखवायचा प्लॅन केला होता. तसे ते वाडा फिरत होते. गोठा, गाई, बागीचा असे सगळे तो दाखवत होता. बगीचामधे बाहेर झुला लावला होता आणि काही खुर्च्या ठेवल्या होत्या. तिथे जाऊन हे सगळे बसले. त्यांच्या गप्पा सुरू होत्या. शरू त्यांना गावाकडील लाईफ स्टाईलची माहिती देत होता. संध्याकाळचा गारवा पसरला होता.


" शरू sssssss......" आवाज देत नंदू फाटकातून आत आली.


" हे इकडे, नंदू इकडे ये , आम्ही इकडे बसलोयत." शरूने तिला ते बसले होते तिथे बोलावले.

नंदू पळतच त्यांच्याकडे गेली. शरू जवळ जाऊन उभी राहिली.


"hey hey wait, अरे राज ही ती, तीच मगाचीच मुलगी आहे जिने आम्हाला लांबचा पत्ता सांगितला होता. तुझी हिम्मत कशी झाली ग आमच्या सोबत असे वागायची?"टिना.

" का? का नाही, मी गवार ना ? का विश्वास ठेवला तुम्ही माझ्यावर मग?" नंदूने पण तिला तिच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले.


" guys, guys pls stop. तुमचा काहीतरी गैसमज होतोय. तिने मस्करी केली असेल , मी म्हणालो होतो ना ." शरू.

" नंदू सॉरी बोलून घे, त्यांना किती फिरावं लागलं. ते आपले पाहुणे आहेत." शरू.

" सॉरी , माझ्या मुळे तुम्हाला त्रास झाला "नंदू शरूच्या दंडाला दोन्ही हातांनी पकडत म्हणाली.

" hey , सॉरीची गरज नाहीये. infact आम्हाला मजाच आली. आम्ही संपूर्ण गाव बघून आलो." रोहन राहुलला एका हाताने टाळी देत म्हणाला.
तसे सगळे हसायला लागले. टिनाला अजिबात हसू आले नव्हते. तिला नंदूचा राग येत होता. नंदू पण कसानुसा चेहरा करत हसली.


" okay guys.. ही नंदू, माझी लहानपणापासूनची मैत्रीण." शरू सगळ्यांना नंदुची ओळख करून देत म्हणाला.

" ईsss हे कसं नाव आहे मुलासारखे, .नंदू.!" टिना.

" नंदिनी. नंदिनी नाव आहे माझं. जवळची लोक मला प्रेमाने नंदू म्हणतात. तुम्ही नंदिनीच म्हणा." टिनाकडे बघत नंदू म्हणाली.

" नंदू हे रोहन, राहुल, सुजी आणि ही टिना. हे माझे फ्रेंड्स. आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो." शरू.

सगळ्यांनी तिला हाय हॅलो केले.

" हाय!" नंदू.

" hey हे ' शरू' कोण आहे? मघाशी ही आवाज देत होती?"सुजी..

" हाहाहा, तो मीच आहो. ती मलाच शरू म्हणते."शरू.

" इवss त्याचं किती छान नाव आहे, श्रीराज. हवं तर राज म्हण. हे शरू कसे वाटते?" टिना.

" ती लहान होती , तेव्हा तिला श्रीराज म्हणता यायचं नाही. मग ती शरूच म्हणायला लागली." शरू.

" पण आता तर म्हणता येत असेल ना ? की नाही म्हणता येत या बाळाला अजून पण?" टिना नंदुला चिडवत म्हणाली.

" मी शरूच म्हणणार. ज्यांना नाही आवडत त्यांनी आपले कान बंद कराव" नंदू टिनाकडे रागात बघत बोलली

" अरे बाबा बंद करा हे . आल्यापासून तुम्ही दोघींनी हे काय लावून ठेवलंय. आणि मला नंदूने शरू म्हटलेले आवडते,
झालं. " शरू.

" मी कुठे, हिने सुरू केले ते ." टिना.

" मी नंतर सॉरी बोललेले ना." नंदू.

दोघींचं परत सुरू झालं.

त्यांची ही न बंद होणारी नोकझोक बघून, " एक मिनिट guys" म्हणत शरू नंदूला दुसरीकडे घेऊन गेला..

" काय ग चिमणे, काय चिवचिव चाललेली तुझी?" शरू.

" मी काय केले? .तू पण मलाच बोल. एक तर ती सारखी आल्यापासून तुला चीपकते आहे, सकाळपासून बघतेय मी." नंदू रुसत म्हणाली.

शरूला हसायला आले. " येडपटच आहे हे माझं ध्यान." तिच्या डोक्यावर किस करत तो म्हणाला.

" चालली मी घरी, तू बस त्या टिना फिना सोबत गप्पा मारत." तोंड वाकडं करत नंदू घरी जायला वळली.

" बरं , मामींनी तुला संध्याकाळी जेवायला बोलावलं आहे.. येशील आहे"शरू तिला आवाज देत म्हणाला.

" ह्म्म....." नंदू. आणि ती घरी गेली.


*******

रूममध्ये सगळे उद्याचा प्लॅन डिस्कस करत बसले होते. तेवढयात नंदू तिथे आली.

" नंदू उद्या आपण सगळे आपल्या शेतावर जाऊया. नंतर बीचवर जाऊया." शरू.

" ही कशाला?" टिना डोक्यावर आठ्या पाडत बोलली.
" I mean तिला बोर होईल ना ...म्हणून म्हणाले.."

" मी आहो ना, नाही होणार ती बोर.don't worry.. हो ना ग नंदू.?" कोणाचं लक्ष नाही बघून शरू नंदूला डोळा मारत म्हणाला.

" मीनाला पण घे सोबत." शरू.

" ह.पण आबा?" नंदू (तिला मघाचा राग होताच...)

" मी विचारतो. नको काळजी करू."शरू.

" ठीक आहे."नंदू.

" बरं काकी सगळ्यांना खालीजेवायला बोलावत आहे." नंदू.

सगळे खाली येत डायनिंग टेबल वर बसले. मोठ्या लोकांचे जेवण आधीच आटोपले होते.

शरू जवळ नंदू बसणार तेवढयात टिना तिथे जाऊन बसली. नंदुला तिचा राग आला. ती आतमध्ये मामी, काकिंना मदत करायला गेली.

" मी पण मदत करते, काय करू मी?"नंदू.

" ह्म्म्म या. आम्ही वाढायला घेतो, तोपर्यंत तू ती खीर बाउल मध्ये भर आणि सगळ्यांना आणून दे." शरूची आई.

" ठीक आहे काकी." नंदू.

वाटीमध्ये खीर भरतांना नंदूला एक आयडिया सुचली. तिने टिनाच्या खीरमध्ये मीठ कालवून ठेवले.
" मला बसू देत नाही काय शरु जवळ?होऊन जाऊ दे मग पाहुणचार." मनाशीच बोलत तिने सगळ्यांना खीरीचे बाउल नेऊन दिले आणि सुजी जवळ , टिनाचा पुढे जाऊन बसली.

सगळ्यांनी जेवण सुरू केले.

" काकी , काय भाजी केली आहे, वाह ! " रोहन.

" हो काकी खूप छान जेवण बनवले आहे. सकाळी पण खूप छान बेत केला होता तुम्ही." सुजी.

" हो खरंच, अन् ही खीर तर माझी फेवरेट आहे." टिना.
तिने एक चम्मच तोंडत घातला आणि तिला ठसका लागला.

" काय झालं ग? छान नाही का झाली?" तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत मामी म्हणाल्या.

सगळे खूप आवडीने खीर खात होते. ते बघून टिनाच्या लक्षात आले की आपल्याच खीरमध्येच काहीतरी गडबड आहे.
" नक्कीच या नंदूने गडबड केली आहे "तिच्या लक्षात आले कारण तिनेच वाट्या आणून दिल्या होत्या.


" ह नाही नाही, छान झालीय खीर." टिना.

" मग घे , वाढू परत?" मामी.

" मामी इतके सगळं आहे ताटात, आधी हे सगळं फिनिश करू द्या. मग मीच मागते तुम्हाला." टिनाने कशी तरी वेळ मारून नेली होती.

सगळ्यांचे जेवण आटोपले. सगळे टेरेस वर जाऊन बसले.
आणि उद्याच प्लॅनिंग करत होते.
भविष्यात काय करायचे, जॉब , अशा सगळ्या त्यांच्या गप्पा सुरू होत्या. नंदू शरू शेजारी झुल्यावर बसली होती. तिला त्यांच्यात खूप बोर होत होते, पण शरू सोबत वेळ घालवता यावा म्हणून ती बसली होती. आणि थोड्या वेळात तिचा डोळा लागला. तिची मान आपोआप शरूच्या खांद्यावर पडल.

नंदूला शरूच्या जवळ बघून टिनाला फार जेलस फिल होत होते. पण ती कशीतरी स्वतःला आवरून होती.

" किती गोड आहे ना ही. डोळे कसले भारी आहेत तिचे, खूप निरागस." रोहन.

" हम्म....हळवी पण आहे तेवढीच. खूप लवकर कोणती पण गोष्ट मनाला लाऊन घेते." स्वतःचा हात तिच्या डोक्याच्या मागून टाकत तिला स्वतःच्या खांद्यावर नीट एडजस्ट करत शरू तिच्या खांद्यावर थोपटत होता.

" हळवी, निरागस? खरंच?" टिना डोळे मोठे करत त्यांच्याकडे बघत होती. तसे सगळे हसायला लागले.

" बरं चला झोपुया आता, उद्या सकाळी पण लवकर निघायचं आहे." सुजी.

" हो हो चला." राहुल.

" तुम्ही व्हा पुढे , मी हिला घरी पोहचवून येतो." शरू.

" okay." सगळे आपापल्या रूममध्ये गेले.

" नंदू, बाळा उठ.." शरू तिला उठवत होता.

" उम्म्म.. झोपू दे ना शरू." नंदू.

" अगं हो , चल घरी जाऊन झोप. रात्र झालीय. उद्या निघायचं ना आपल्याला लवकर. " शरू.

ती त्याला अजून घट्ट आवळत होती. " ५ च मिनिट झोपू दे ना तुझ्या कुशीत." म्हणत परत तिने त्याच्या शर्ट मध्ये आपले तोंड खुपसले. त्याने पण त्याची मिठी घट्ट केली.

१५-२० मिनिट तो पण तसाच झुल्याला टेकून शांत बसून तिचा गोड स्पर्श अनुभवत राहिला. ती पण स्वस्थ त्याच्या कुशीत झोपली होती.
.
.
.
.
.
.

" पिल्लु , चल ना बाळा, नाहीतर आबासाहेब रागवायचे आता. आणि मला उद्यासाठी विचारायचं पण आहे ना. चल उठ आता. "शरू .

" ह्म्म्म ... चल." नंदू.

त्याने तिच्या डोक्यावर किस केले आणि तिला घरी पोहचवले. आबासाहेब सोबत बोलून घरी परत आला आणि त्याच्या रूममध्ये गेला.

राहुल झोपला होता, रोहन जागा होता.

" झोपला नाही अजून?" शरू.

" हा...झोप नाही आली." रोहन.

शरू पण बेडवर पडला.

" खूप प्रेम करतो ना तिच्यावर?"रोहन.

शरू ताडकन उठून बसला.." तुला कसं कळलं?"

" दिसते तुझ्या डोळ्यात ते. " रोहन.

" हो खूप. तिच्याशिवाय आता लाईफ इमॅजिन पण होत नाही." शरू.

" किती काळजी घेतोस?"रोहन.

" ह्म्म लहान आहे रे ती, खूप अल्लड आहे. आता इतकी वर्ष अमेरिकेला राहायचे, कसा राहू शकेल तिच्याशिवाय माहिती नाही. बघुया कसं होतंय मॅनेज. चल झोप. good night." शरू.