Login

नराधम ( भाग तिसरा )

काहीवेळा डॉक्टरांच्या रूपात आपल्याला आशेचा किरण दिसतो. पण हाच डॉक्टर जीव घ्यायला निघाला तर..


नराधम ( भाग तिसरा )

विषय: आशेचा किरण

त्यांनी तो जाहिरातीचा कागद काळजीपूर्वक  जपून ठेवला.  जेव्हा ते पुढच्या फॉलोअप साठी मुंबईला आले तेव्हा त्यांनी त्या आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटायचे ठरवले.

खरं म्हणजे त्यावेळी त्या बाईंची चालण्याची अवस्था नव्हती. तरीदेखील मोठ्या कष्टाने ते त्या डॉक्टरच्या दवाखान्यात पोहोचले. खरं म्हणजे डॉक्टर अपार्टमेंट शिवाय पेशंट बघत नसतं. परंतु त्यांची ती अवस्था पाहून डॉक्टरांनी उपकार केल्यासारख त्यांना तपासण्याची तयारी दाखवली. आणि थोडा वेळ बाहेर बसायला सांगितले.

डॉक्टर आपल्याला बघणार आहेत या विचारांनी त्यांना खूप आनंद झाला. ते दोघे बाहेर येऊन बसले. त्या बाईंना बसवलं जात नव्हत. त्या बेंचवर झोपून गेल्या.

त्यांचे मिस्टरांनी बघितलं . दवाखान्यात खूप पेशंट होते. दवाखाना खूप आधुनिक होता. बरेच लोक तिथे काम करत होते. दवाखान्याच्या भिंतीवरती डॉक्टरांचे अनेक सर्टिफिकेटस लावलेले होते . त्याशिवाय कितीतरी मंत्र्यांसोबत काढलेले त्यांचे फोटो भिंतीवर  लावलेले होते.

अतिशय गंभीर चेहरा असलेले डॉक्टर पेशंटला बराच वेळ तपासत असत. त्याचे रिपोर्ट बघत . पेशंटशी चर्चा करत आजार जाणून घेत. नंतर औषधाचा पेपर तयार  करत.

त्यांची औषधं बाहेर कोणत्याही मेडिकल स्टोअरवर मिळत नसत. डॉक्टरांच्या दवाखान्याजवळच त्यांची औषधाची प्रयोगशाळा होती. त्या ठिकाणी ही औषध पेशंटच्या आजारानुसार तयार केली जात.

पेशंटला एक रजिस्ट्रेशन नंबर दिला जात असे. तो नंबर कायमचा असायचा. त्या नंबर समोर त्या औषधांची नोंद केली जायची. नंतर कधीही तो नंबर सांगितला की  पेशंटला तीच औषध बरोबर मिळायची. औषध देणारे पथ्य पाणी सांगायचे. कित्येक पेशंट त्या औषधांमुळे बरे झाले होते. जे बरे झाले नव्हते त्यांचा आजार कितीतरी पटीने कमी झालेला होता. त्यांच्या वेदना बऱ्याच कमी झालेल्या होत्या. असं तिथं आलेल्या पेशंट आणि सांगितलं.

तेंव्हा आपण योग्य ठिकाणी आलो आहोत. याबद्दल त्या जोडप्याची खात्री झाली. आणि आता लवकरच आपण नक्की बरे होऊ याबद्दल त्यांचा विश्वास पक्का झाला .

हळूहळू पेशंट कमी झाल्यानंतर यांचा नंबर लागला. त्या डॉक्टरांनी त्यांचे टाटाचे सगळे रिपोर्ट पाहिले , ट्रीटमेंट पाहिली. त्यांच्याकडे बघून हसत ते म्हणाले,

" तुमचा आजार लवकरच पूर्ण बरा होईल. मी लिहून देतो. तुम्ही फक्त माझी ट्रीटमेंट या ट्रीटमेंट सोबत चालू ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवा. त्या ट्रीटमेंटच्या अगोदरच माझ्यामुळे तुम्हाला शंभर टक्के बरे वाटेल. हा माझा शब्द आहे. असे कितीतरी पेशंट मी पूर्णपणे बरे केले आहे." डॉक्टरांचे इतके आत्मविश्वासपूर्वक वाक्य ऐकून पेशंटला खूप बरे वाटले. आणि त्यांनी त्या डॉक्टरांनी दिलेली ट्रीटमेंट सुरू केली. डॉक्टर म्हणाले होते की जवळजवळ एक वर्ष हे ट्रीटमेंट त्यांना घ्यावी लागेल. डॉक्टरांची फी देखील काही फार जास्त नव्हती. ऍलोपॅथीपेक्षा कितीतरी पटीने कमी होती.

त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. डॉक्टरांचे आभार कोणत्या शब्दात मानावे हे त्यांना कळेना. त्यानंतर डॉक्टरने दिलेली औषध आणि पथ्य पाणी त्यांनी अतिशय नियमितपणे घेतली. त्यावेळी आपण शंभर टक्के बरे होणार याबद्दल त्यांना पूर्णपणे खात्री होती. आणि खरोखरच ते पूर्णपणे बरे झाले. हळूहळू  डोक्यावरती केस आले, भूक वाढली, वजन वाढले आणि ते नॉर्मल पेशंट सारखं जीवन जगायला लागले.

खरी गोष्ट पुढेच आहे. नंतर  याच पेशंटने पेपर मध्ये एक धक्कादायक बातमी पाहिली. ती  याच डॉक्टरच्या संदर्भात होती. त्या बातमीत लिहिलं होतं की हा डॉक्टर खोटा असून त्याने आतापर्यंत हजारो पेशंटला फसवलेले आहे. या डॉक्टर जवळ कोणतेही प्रकारची डिग्री नाही. तरीसुद्धा तो पेशंटला औषध देत होता कोणती औषधे देत होता याबद्दल चौकशी सुरू आहे. सदर दवाखान्याला आणि त्यांच्या प्रयोगशाळेला सरकारने सील लावलेले आहे. सध्या डॉक्टर जेलमध्ये आहे.

मृत्यूच्या मृत्यूच्या सावलीत प्रत्येक क्षण घालवत असलेल्या पेशंटला  फसवून त्याच्याकडून पैसा उकळणाऱ्या डॉक्टराला डॉक्टरला नराधम म्हणावे की नाही ते तुम्हीच सांगा. सुदैवाने पेशंट बरा होत होता तो त्याच्याच इच्छाशक्तीने हे नशीब. प्रत्यक्षात हा डॉक्टर औषधाच्या नावाखाली काय देत होता देव जाणे.

( ही एक सत्य घटना आहे. एकेकाळी डोंबिवली सारख्या उपनगरामध्ये या डॉक्टरने आपला चांगलाच जम बसवला होता. आजही तो डॉक्टर जेलमध्ये आहे )