मुसाईदी लोक मेहनती , सुशिक्षित आणि उद्योगी स्वभावाचे होते. याउलट वसाईदी लोकांना मुसाईदीचे अस्तित्वच मान्य नव्हते. एकीकडे मुसाईद राष्ट्र विकसित होत होते. तर दुसरीकडे वसाईद राष्ट्रात विविध दहशतवादी संघटना जन्म घेत होत्या. दोन्ही राष्ट्रांमध्ये विविध युद्धे झाली. सातत्याने पराभव होऊनही वसाईद मुसाईदीचे प्रभुत्व मान्य करायला तयार नव्हते. अमेरिकेतील एका प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या संपादकाने वसाईदचा नेता सुलशकिर याची मुलाखत घेण्याचे ठरवले.
" तुम्ही मुसाईदसोबत शांतता का प्रस्थापित करत नाही ?" संपादकाने निर्भीडपणे मूळ प्रश्नालाच हात घातला.
" शांतता ? उद्या मी तुमच्या घरी रहायला येतो. तुम्ही शांतता प्रस्थापित कराल का ?"
" म्हणजे ?"
" मुसाईद लोकांनी इंग्रजांना द्वितीय महायुद्धात आर्थिक मदत केली. त्या बदल्यात इंग्रजांनी वासव भूमी मुसाईद लोकांना दिली. मुसाईद लोक इथे येण्यापूर्वी वसाईद लोक इथे गुण्यागोविंदाने राहत होते. पण मुसाईद लोकांनी आमच्या जमिनी बळकावल्या. आमच्या लोकांना आमच्याच भूमीत निर्वासित बनवले. कितीतरी लोकांची कत्तल केली. लहान मुलांनाही सोडले नाही. आमची दहशतवादी म्हणून जगभर बदनामी केली. "
त्या नंतर सुलशकिरने रुमालाने आपले डोळे पुसले. तिथे उपस्थित एका लहान गोंडस वसाईदी मुलाला जवळ बोलावले.
" या लहान मुलाच्या निरागस डोळ्यात बघा. तुम्हाला दहशतवादी दिसतोय ?"
संपादकाचे लक्ष डोळ्यांपेक्षा त्या लहान मुलाने गळ्यात घातलेल्या चांदीच्या लॉकेटकडे गेले. मध्यभागी षटकोनी आकार असलेली प्लेट होती. ज्यावर वसाईदीच्या ईश्वराचा फोटो होता.
◆◆◆
दुसऱ्या दिवशी क्रिकेटची प्रॅक्टिस होती. योग्य वेळ बघून पवनकुमारने शेहजादला एकांतात गाठले.
" शेहजाद.."
" बोला कॅप्टन. "
" वहिनीचा काल रात्री फोन आला होता. तू मारहाण करतोस त्यांच्यासोबत ?"
" काय ? तस काही नाही. "
" हे बघ खोटे नको बोलू. मीच नाही तर क्रिकेट कमिटीच्या सर्व मेम्बर्सला तुझ्याबद्दल समजले आहे. घरगुती हिंसाचार हा एक गंभीर गुन्हा आहे. पुढे जर वहिनीने काही तक्रार केली तर तू संघात नसशील." इतके बोलून कॅप्टन निघून गेला.
◆◆◆
कविताचा लहान मुलासोबतचा फोटो ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला होता. कुणीतरी तो फोटो रिपोस्ट केला आणि ट्विट केले ,
" मुख्यमंत्रीसाहेब , या निरागस मुलाने तुमचे काय बिघडवले होते ?"
थोड्या वेळाने कविताचा नवरा समीरही तिथे पोहोचला. तो दारूच्या नशेत होता. समोर धुळीचे साम्राज्य बघून त्याला एक क्षण वाटले की आपण आपला रस्ता चुकलोय. पण नंतर तो भानावर आला. आपले घर आता उध्वस्त झाले आहे हे त्याला कळून चुकले. एका क्षणातच सारी नशा उतरली. तो भूमीवर आदळला. त्याने आक्रोश केला. कविताही त्याच्या जवळ आली. दोघे मिळून उध्वस्त झालेल्या घराकडे बघत होते. तेवढ्यात तिथे मीडिया आली. रिपोर्टरने कॅमेरा ऑन करायला सांगितला.
" जरा बघा या दृश्याकडे. होय आपण स्वतंत्र भारतातच आहोत. मुख्यमंत्रीसाहेबांनी समीर-कविता यांच्या घरावर बुलडोझर चालवण्याचा हुकूम सोडला. या निष्पाप नवरा-बायकोची अवस्था बघा. या लहानग्या मुलाकडे बघा. "
मग कॅमेरा त्या रडणाऱ्या लहान मुलाच्या दिशेने फिरवण्यात आला. रिपोर्टरने समीरला काही प्रश्न विचारले.
" या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या जातीचा आहे. आम्ही खालच्या जातीचे आहोत. त्याच द्वेषापोटी मुख्यमंत्री सूड उगवत आहेत. "
***
मुख्यमंत्र्यांनी सायलीच्या धाडसाचे प्रचंड कौतुक केले. सायलीला स्वतःच्या पक्षात प्रवेश मिळवून दिला. दहा वर्षे उलटली. सायली प्रदेशाध्यक्ष झाली होती. राजकारणात असल्यामुळे तिच्या संपत्तीतही प्रचंड वाढ झाली होती.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा