नसतेस घरी तू जेव्हा : भाग ४

नवरा बायकोच्या प्रेमाची गोष्ट!
"नर्स कायं झालं? ती ठीक आहे ना?" अद्वैतने नर्सला विचारले.

"हे बघा त्यांचे श्वास वर खाली होतं आहेत आम्ही प्रयत्न करतोय डॉक्टर येत आहेत तुम्ही बाहेर थांबा प्लीज" असे म्हणतं नर्सने जवळ जवळ वॉर्ड बॉयला सांगून अद्वैतला बाहेर पाठवले. तो बाहेर गेला आणि डॉक्टर आतमध्ये गेले. अद्वैत बाहेरच्या काचेमधून राधिकाचे वर खाली होणारे शरीर पाहत होता नुसता.

त्या एका क्षणांत त्यांच्या प्रेमापासून ते लग्नाचे सगळे क्षण त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागले.
'राधिका तू अशी नाराज नाही राहू शकतं माझ्यावर हे तुला पण माहीत आहे. प्लीज यार उठं ना मी नेहमीचं रागात बोलतो पण तू कधी अशी चिडत नाहीस. मी वचन देतो पुन्हा कधी नाही रागावणार गं तुझ्यावर प्लीज उठं ना गं. मुलं वाट बघत आहेत घरी तुझी.' काचेतून आतमध्ये पाहत अद्वैत राधिकाला आर्जव करू पाहत होता.

काही वेळात आतमध्ये असलेली धावपळ शांत झाली आणि डॉक्टर बाहेर आले.
"डॉक्टरऽऽऽ" अद्वैतला पुढे काही बोलायची हिंमतच झाली नाही.

"मिस्टर हे बघा काळजीचे कारण नाही काहीच आता. तुमची बायको शुद्धीवर आली आहे." हे ऐकताच अद्वैतने आनंदाने डॉक्टरांना मिठी मारली.

"खूप खूप उपकार झाले तुमचे डॉक्टर."

"हे बघा मी फक्त माझं कर्तव्य बजावलं आहे. तुमची बायको शुद्धीवर आली असली तरीही त्यांच्या मेंदूला मार लागल्यामुळे त्यांना पुढचे तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल बाकी काळजीचे कारण नाही आता."

"ओके डॉक्टर" डॉक्टरांशी बोलून अद्वैत राधिका जवळ गेला. तिने त्याच्याकडे पाहिले आणि हसली तसा अद्वैत तिच्याजवळ गेला आणि तिच्या कपाळावर ओठं टेकवले त्याने.

" अद्वैत अरेऽऽ" राधिकाने त्याला तिथे नर्स वगैरे आहेत असा इशारा केला पण अद्वैतने तिच्या ओठांवर बोट ठेवले.

" शुऽऽ काहीही बोलू नकोस तू. किती घाबरवलं होतं मला काल. हे असं वागतात का?" अद्वैतच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून राधिकाच्या डोळ्यातून ही पाणी आले तसे अद्वैतने तिला मिठी मारली तिथे नर्स आहे याचेही त्याला भान नव्हते.

काही वेळाने त्याने घरी फोन करून कळवले आणि राधिका तिच्या सासर्‍यांसोबत बोलली तेव्हा कुठे त्यांची काळजी दूर झाली. अद्वैतने राधिकाच्या बुटीकमधल्या मैत्रीणीला तिच्या अपघाताबद्दल फोन करून कळवले.

"राधिका मला एक सांग तू हायवे साईडला कायं करायला गेली होती काल?" अद्वैतने राधिकाला विचारले.

"ते मी काल सकाळी बोललेले तुला बघं आपल्यासाठी काहीतरी प्लॅन केले होते तर ज्या कॅफेमध्ये तू तुझे प्रेम व्यक्त केले होते तिथेच छोटे सरप्राईज देणार होते पण तूला काम असेल असे वाटले म्हणून कॅन्सल करायला गेले आणि येताना समोरून एक बाईक चुकीच्या दिशेने आली आणि अपघात झाला. " राधिकाने उत्तर दिले त्यावर अद्वैत काही बोलणार इतक्यात राधिकाची बुटीक मधली मैत्रीण सायली तिथे आली.

सायली आल्यावर राधिकाने बळजबरीने अद्वैतला घरी पाठवले. अद्वैतने घरी आल्यावर पाहिले तर मुलं शाळेत गेली नव्हती, 'आईऽऽ' च्या नावाने अगदी धोसरा काढत होती. अद्वैतने मुलांना जवळ घेऊन समजावले. ऑफिसमध्ये तीन - चार दिवसांसाठी त्याने सुट्टी टाकून दिली. अंघोळ वगैरे उरकून तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायला निघाला तेव्हा त्याच्या आईने राधिकासाठी गरमागरम उपीट करून दिले. मुले ऐकणार नाहीत हे त्याला माहीत होते म्हणून डबा घेऊन तो मुलांना ही घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये.

मुले आईला पाहून बिलगली अगदी. अद्वैतने राधिकाला उपीट भरवले आणि गोळ्या दिल्या. राधिकाने मुलांना व्यवस्थित समजावले आणि ती घरी येईपर्यंत त्रास द्यायचा नाही, शाळेत जायचे असे बजावले. मुलांनी शहाण्यासारखे 'हो' म्हणून मान डोलावली.

अद्वैत मुलांना घेऊन घरी गेला आणि तिच्यासाठी जेवणं घेऊन आला पुन्हा. राधिकाने मात्र हट्टाने अद्वैतला रात्री घरी थांबायला सांगितले. सुरूवातीला तो तयार नव्हताचं पण राधिकाने मुलांची आठवण करून दिली शिवाय रात्री त्याच्या वडिलांना ही त्रास होतो कधी कधी हे ठाऊक होते त्याला म्हणून शेवटी नाईलाजाने त्याने सायलीला राधिका जवळ थांबायची परवानगी दिली आणि तो घरी गेला.

घरी गेल्यावर मात्र अद्वैतला नाकीनऊ आले होते अगदी. मुलांच्या शाळेची बॅग भरून, त्यांना गोष्ट सांगून झोपवताना रात्रीचे अकरा वाजून गेले. आदल्या रात्री देखील झोप नव्हती त्यामुळे तो झोपून गेला.

सकाळी उठल्यावर त्याने सवयीप्रमाणे चहासाठी राधिकाला आवाज दिला आणि त्याच्या लक्षात आले राधिका हॉस्पिटलमध्ये आहे तसे तो उठला आणि स्वयंपाकघरात गेला आणि त्याने स्वतःसाठी चहा बनवला.

चहा घेऊन तो मुलांना उठवायला जाणार इतक्यात त्याच्या ऑफिसमधून फोन आला.

क्रमशः

कायं होईल पुढे? हे जाणून घेण्यासाठी कथा वाचत रहा.

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all