" कशी असेल माझी होणारी सुन ? माझ्या सोबत कशी वागेल ? माझ्या आणि कैवल्यच्या नात्याचा सन्मान ठेवेल का ? "
आज निर्मला काकूंना या प्रश्नाने विचारात अडकवल होत. संध्याकाळ झाली होती. कैवल्यची वाट बघत त्या बाल्कनीत बसल्या होत्या. हातात त्यांच्या आवडीचा चहा होता. लेकाने नुकताच फोन करुन सांगितलं होत रस्त्यावर पाणी साचलं असल्याने ट्रॅफिक आहे. घरी यायला उशीर होईल.
" आई घरी यायला उशिर होईल. तू चहा आणि काहितरी खाऊन घे. औषध घ्यायची आहेत.न विसरता."
कैवल्य निर्मला बाईंचा एकुलता एक मुलगा आहे. वडिलांचे छोटेसे मोबाईल रिपेअर आणि विक्री करण्याचे दुकान आहे. कैवल्यचे आणि त्याच्या वडिलांच्या सोबत बाप लेकाचं नातं आहे. पण ते तितकं मोकळं नाही. कैवल्य त्याच्या आई सोबत जास्त जवळ आहे. त्याची आई त्याची पाहिली मैत्रीण आहे. दिवसभरात काय घडलं हे सगळं जो पर्यंत तो आईला संगात नाही तो पर्यंत त्याचा दिवस पुर्ण होत नाही. अगदीं रुमाल कोणत्या रंगाचा घेऊ पासून ते ईन्वेस्टमेंट कुठे करू हे सगळं काही आईच्या सल्ल्याने घेतो.
निर्मला काकूंना मुलगी नव्हती.त्या दोघांना मुलीची हौस होती. त्या दोघांनी ठरवल आहे, त्यांची सून त्यांची मुलगी असेल. मागच्या आठवड्यात त्यांना त्यांची मैत्रीण भेटली होती.त्यांच्या मुलाचं लग्न झालं होतं. लग्नानंतर सध्याचं घर लहान पडत म्हणून लेकाने नविन फ्लॅट घेतला. तर ती मैत्रीण सध्या लेकाच्या सोबत राहते. पण लेकाची आणि सुनेची गट्टी जमल्या पासुन ती एकटी पडली होती. नवरा आधीच अबोल. त्यामुळे तिला सगळं जमवून घेणं अवघड झालं होतं. एकदा तर तिने बोलून पण दाखवल,
" लग्न झाल्यापासून गौरव बदलला. मिताली शिवाय त्याला काही सुचतच नाही. आजकाल माझ्याशी बोलायला वेळच नसतो. दुरावला माझा मुलगा."
डोळ्यातल पाणी टिपत ती म्हणाली. त्यामुळे निर्मलाच्या मनात त्या प्रश्नाने उचल खाल्ली होती. डोअर बेलच्या आवाजाने त्या वर्तमानात परतल्या.
कैवल्य आला तोच भिजून आला होता. फेश झाल्यावर चहा घेताना त्याची नेहमीची बडबड चालू होती.
कैवल्य आला तोच भिजून आला होता. फेश झाल्यावर चहा घेताना त्याची नेहमीची बडबड चालू होती.
एक दिवस त्याने सांगितल संध्याकाळी कोणीतरी भेटायला येणारं आहे. आधी तर आश्र्चर्य वाटलं. पण बघू असं विचार करुन त्यांनी तयारी केली. संध्याकाळी पाच वाजता डोअर बेल वाजली. समोर एक मुलगी उभी होती. अंगात जीन्स स्लिवलेस टॉप. केस क्लच लावून मोकळे सोडलेले. गळयात स्कार्फ खांद्याला पर्स गळयात नाजूक चेन, हातात मोठ्या गोल डायलच घड्याळ. चेहेऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळयात निरागसता यांचा संगम होता.
" आई ही तन्वी आहे. माझी .."
कैवल्य बोलताना अडखळला. पण आई आहे. त्याचं बोलणं मला समजलं. न बोलता. तिच्या सोबत तिची आई होती. साधारण निर्मला काकूंच्या वयाची. निर्मला बाईंनी त्यांना घरात बोलवलं.
तिची आई म्हणली,
तिची आई म्हणली,
" तनु अग नमस्कार तरी कर."
तशी तनुच्या कपाळाला हलकीशी आठी पडली. ती नमस्कार करायला खाली वाकली.
" अग असु दे. मनापासून आदर दे. इतकचं महत्वाचं आहे."निर्मला काकु म्हणल्या.
तिच्या आईने कैवल्य आणि तन्वी बद्दल सांगितल. दोघं एकाच कॉलेज मध्ये शिकत होते. पण तेव्हा जुजबी ओळख होती. नोकरीला एकच कंपनी मध्ये आहेत. तेव्हा त्यांच्यात मैत्री झाली. हळू हळू मैत्री प्रेमात बदलली.
तन्वीची फॅमिली पण कैवल्यच्या फॅमिली प्रमाणे. तन्वीला एक मोठा भाऊ आहे. त्याचं लग्न झालं आहे. तो आणि त्याची बायको बंगलोरला असतात. तन्वीचे वडिल प्रायव्हेट कंपनी मध्ये नोकरीला होते. अजुन नोकरी करतात. रिटायर मेंट साठी दोन वर्ष शिल्लक आहेत.
सगळं काही जुळून आलं. त्याचं लग्न झालं. साखरपुड्याला तन्वीच असं मोठ्याने हसणं, मोकळ्या विचारांचं असणं, तिच्या कपड्यांची स्टाईल निर्मालाच्या मनात अनामिक भीती वाढवत होते.
' माझ्या मनात मी आधी पासूनच माझी सुन कशी असेल याचं चित्रं रंगवल होत. एकदम नाजुक बाहुली सारखी दिसणारी, मोठ्या डोळ्याची , हलकेच हसणारी, सकाळी माझ्या हातात आयता चहा देणारी. पण तनु तशी नव्हती. दिसायला सुंदर होती. पण स्वभाव, तिचा पोषाख, मी रंगवलेल्या सुनेच्या चित्रात बसत नव्हता. हेचं मनाला शांती देत नव्हत.' निर्मला काकु स्वतः शी म्हणल्या.
मनात धाकधूक असायची,
तनु मला कधी आई समजेल का तिची ? मला आईचा मान देईल का ? माझ्या सोबत तरी राहिलं का ?
तनु मला कधी आई समजेल का तिची ? मला आईचा मान देईल का ? माझ्या सोबत तरी राहिलं का ?
लग्न झाल्यावर ती आमच्या घरी आली. सुरुवातीचे दिवस सगळं काही छान चालु होत. दोघं मिळून फिरून पण आले. तनु ने महिनाभर सुट्टी घेतली होती. माझ्या सोबत नातं सुरू करण्याच्या आधी एक दिवस तिने सांगितल,
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा