लघुकथा
'चला आता एमबीबीएस लास्ट इअरची परिक्षा संपली, की गावी जाऊन अधूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं.'
राज मनाशी बोलतचं खुश होतं होता. कित्येक दिवसांपासून राज या स्वप्नाची वाट पाहत होता. लहानपणापासून शिक्षणासाठी नेहमीच घरापासून लांब राहत असलेला राज आपल्या आई - बाबांना भेटायला लवकरच जाणार होता.
आई वडील आणि भाऊ बहिणींजवळ त्याला कधीच राहता आले नाही. राजचे आई वडील गावी राहत होते. घरची परिस्थिती हलाखीची होती. तसा राज अभ्यासात खूप हुशार होता. शिष्यवृत्ती आणि पार्ट टाईम काम करून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. राजचं गावचं घरं एका डोंगराळ भागात डोंगऱ्याच्या कडेला होते. गावात फक्त मोजकीच घरे होती. कोणतीच सुखसुविधा नाही की दवाखाना नव्हता. कोणी आजारी पडले तर गावापासून लांब दूरच्या गावात उपचारांसाठी जावं लागत होतं. कधी कधी असं व्हायचं, की पेशंटला दुसऱ्या गावात दवाखान्यात घेऊन जातानाच त्याचा मृत्यु व्हायचा. या सगळ्याची राजला कल्पना होती. हे सर्व पाहताना राजचे मन खूप दु:खी व्हायचे. हे सर्व दूर करण्यासाठी त्याने मनाशी बाळगलेलं स्वप्न आता सत्यात उतरत होत.
एमबीबीएसची परिक्षेचा पास होऊन राज एक चांगला डॉक्टर बनला होता. आज तो कितीतरी दिवसांनी आपल्या मित्रांना भेटला, कारण यानंतर तो कधीच शहराकडे परतणार नव्हता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो गावीच राहणार होता. त्याच्या शिक्षणाचा उपयोग त्याला त्याच्या गावाच्या विकासासाठी करायचा होता. आपलं एक स्वप्न पूर्ण करायला. आज तो खूप खुश होता, पण त्याला हे नव्हत माहित, की पुढे गावी जाताना किती अडचणी येणार आहेत.
लहानपणापासून गावापासून लांब राहत असलेला राज आज कित्येक दिवसांनी घरी निघाला. चार डोंगराच्यामध्ये एका डोंगराच्या कडेला अल्लाड असं गाव होतं. डोंगराच्या दुसऱ्या बाजूला पल्ल्याड असं गावं. गावात जायला घनदाट जंगलातून जावं लागतं असे. रस्ता कच्चा असल्यामुळे वाट पक्की नव्हती. रस्त्याला जास्त वर्दळ नसते. ती वाट एकदम शांत आणि भयानक वाटायची. दिवसा जरी त्या वाटेने गेलो तरी आपल्या मागे कोणीतरी चालत आहे असं वाटतं. चालताना ती वाटच चालते की काय आपल्यासोबत असा भास होत राहतो.
एकदा स्टॅण्डला उतरल्यावर घराकडे जायला कच्च्या रस्तानेच जावं लागायचं. कधी कधी रस्ता पार करता करता रात्रही व्हायची.
राज सकाळी आपल्या मित्रांना भेटून बाराच्या एसटीने गावी जायला निघाला. एसटीने प्रवास म्हणजे एसटी थांबत थांबत जाणार. खूप वर्षांनंतर घरी जाणार होता. 'घराची ओढ जो दूर राहतो त्यालाच कळते.' असं राज मनाशीच बोलत होता.
राजला असं झालं होतं कधी एकदा घरी पोहोचतोय आणि आई बाबांना कडकडून मिठी मारतोय. एसटीमध्ये खिडकी जवळ बसून कानात हेडफोन घालून बाहेरचा परिसर बघण्यात रमला होता. एसटीने प्रवास म्हणजे खूप लांबचा प्रवास. या विचारातच राजला कधी झोप लागली कळलेचं नाही. एका स्टॉपला गाडी थांबल्यावर त्याला दचकून जाग आली. तो गाडीतून खाली उतरून आजूबाजूचा परिसर बघू लागला. गाडी फक्त पंधरा मिनिटे थांबणार होती. थोडासा नाष्टा करून राज पुन्हा गाडीकडे वळू लागला. त्यातच राजला एका आजीने अडवलं.
"बाळा थोडं पैसे देतोस का?" राजला कधीच या गोष्टी पटत नव्हत्या. कोणी पैसे मागितले तर तो कधीच द्यायचा नाही. एकतर तो त्या व्यक्तीला खायला घेऊन द्यायचा.
"आजी, मी तुम्हांला पैसे नाही देऊ शकत, पण खायला घेऊन देतो." राजने पळत जाऊन आजीसाठी दोन वडापाव आणि काही बिस्किटे आणून दिली.
"देव तुझं भलं करो, खूप मोठा हो." असा आजीने आशिर्वाद दिला आणि पुन्हा राजचा प्रवास सुरू झाला.
गाडीत बसल्या बसल्या राज पुन्हा जुन्या आठवणींमध्ये रमला. लहानपणीच्या गमती जमती मजा मस्ती अशा आठवणीमध्ये तो रमला. गावी त्याची खूप लहानपणीची मैत्रिणी होती. त्याला आता तिचा चेहराही आठवत नव्हता. तिच्या विचारात त्याचा प्रवास चालू झाला. 'आता कशी दिसत असेल? कुठे असेल? काय करत असेल? आता भेटली तर आपण ओळखू शकतो का? लहानपणी सुंदर दिसायची. आता तर ती खूपच सुंदर दिसत असेल?'
या विचारातच तो गुंतला. प्रवासातही तो तिचा विचार करु लागला. तिच्या विचारातही त्याला तिचा भास होत होता. पुढे काय घडेल याची त्याला कल्पना ही नव्हती.
या विचारातच तो गुंतला. प्रवासातही तो तिचा विचार करु लागला. तिच्या विचारातही त्याला तिचा भास होत होता. पुढे काय घडेल याची त्याला कल्पना ही नव्हती.
गाडी बस स्टॉपवर पोहचली तोवर संध्याकाळ झाली होती. बराच अंधार पडला होता. राजने इकडे तिकडे बघितले. संध्याकाळ झाली होती; म्हणून माणसांची जास्त वर्दळ पण नव्हती. घराच्या दिशेने तो चालू लागला. अंधाऱ्या सुमसान रात्री फक्त किर् किर् आवाज आणि राजच्या पावलांचा आवाज येत होता. लगबगीने घराच्या ओढीने तो चालला होता. कधी घरी जातो असं राजला झालं होतं. कधी एकदा भेटतो सर्वांना असं झालं होतं. गावच्या वेशीवर पोहोचायला बरेच अंतर होतं.
अंधारी रस्ता पार करत एकदाचा राज घरी पोहचला. इतक्या दिवसांनी आईवडिलांना भेटून त्याला खूप छान वाटत होतं. आईने तर राजला कडकडून मिठी मारली. डोळ्यात समाधानाचे पाणी आणि आपल्या लेकराला आपल्याजवळ पाहून तिला हा आनंद कुठे साठवून ठेवू असे झाले होते. छोट्या चिंगीला आणि समीरला पाहून राज खुश झाला होता. आज खूप दिवसानंतर सर्व कुटुंब एकत्र आलं होत. मस्तपैकी सर्वांनी गप्पा मारत मारत जेवण उरकले.
"अरे सगळया गप्पा आजचं मारणार आहेस का? एवढ्या लांबून पोरगं दमून आलंय, त्याला आराम करू द्या."
वडील असे म्हणातच सगळे हसायला लागले.
वडील असे म्हणातच सगळे हसायला लागले.
जेवण झाल्यावर राज उठून अंथरूणावर पडायला गेला. आज खूप दिवसांनी आईच्या हातचे खायला मिळाले होते; त्यामुळे पोट जरा जास्तीच भरले होते.
तो गेल्यावर राजची आई त्याच्या वडिलांना बोलत होत्या.
"राजला प्रियाबद्दल काही कळता कामा नये. तो खूप दु:खी होईल. तो पूर्णपणे खचून जाईल. जवळची व्यक्ती दूर झाली तर खूप त्रास होईल त्याला."
राज झोपायला गेला हे बघून त्याची आई वडिलांना बोलल्या.
"हे खरं आहे गं! पण तिला भेटायला गेल्याशिवाय तो राहणार नाही.
चलं आता झोपूया. बघूया आता पुढे काय ते."
वडिलांनी पण काळजीने म्हटले आणि ते सगळे झोपी गेले.
इकडे राज जून्या आठवणींमध्ये रमून कधी झोपी गेला त्याचे त्याला कळले सुद्धा नाही.
"आई मी गावातून जाऊन येतो. जून्या मित्रमैत्रिणींना भेटून येतो. खूप दिवस झाले त्यांनाही भेटून बरे वाटेल. प्रियाला ही भेटून येतो. किती दिवस झाले आम्ही भेटलो नाही."
सकाळी मस्त तयार होऊन राज आईला बोलला.
आईने मन घट्ट करून राजला सांगितले,"तू नको जाऊ तिला भेटायला."
"का पण आई?"
राज अगदी आश्चर्याने बोलला.
राज अगदी आश्चर्याने बोलला.
आई बोलली,"राज याचं उत्तर नाही माझ्याकडे पण जाऊ नकोस. मी सांगते ते ऐक."
"आई नक्की काय झालं? मला खरं खरं सांग या आधी तू मला कधीच असं बोलत नव्हती. तुला माहित आहे ना! ती माझी किती जवळची मैत्रीण आहे."
राज तिच्याबद्दल जाणून घेण्यात उत्सुक होता.
"हो माहित आहे. राज आपली प्रिया.. आपली प्रिया कायमची हे जग सोडून निघून गेली. जी परत कधीच येणार नाही आपल्याकडे."
आईने अगदी धीर एकवटून सांगितले.
आईने अगदी धीर एकवटून सांगितले.
"काय? केव्हा झाले हे? आणि कसे झाले?"
राजला हे ऐकून धक्काच बसला.
"प्रियाला कॅन्सर झाला होता. खूप उपचारही केले. आपल्या गावात दवाखान्याच्या इतक्या मोठ्या सुविधाही नाही. तिला इथून शहराकडे घेऊन जाण्याची तिची स्थिती नव्हती. तुला तर प्रियाची घरची परिस्थिती माहितच आहे."
आई सांगत होती आणि राज सुन्न मनाने ऐकत होता.
आई सांगत होती आणि राज सुन्न मनाने ऐकत होता.
हे सगळं ऐकून खरतर राजला खूप मोठा धक्का बसला होता. त्याला काहीच सुचेनासे झाले होते. राजचं प्रियावर लहानपणापासून प्रेम होतं. लहानपणापासून दोघेही सोबतच मोठे झाले होते. राज शिक्षणासाठी बाहेर गेला होता; म्हणून दूर होते दोघेजण.. पण आता मनाने एकमेकांच्या कायम जवळ राहतील.